vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे ‘जागतिक होमिओपॅथी दिवस’ उत्साहात साजरा

जिल्हा रुग्णालय बुलढाणा येथे ‘जागतिक होमिओपॅथी दिवस’ उत्साहात साजरा

 बुलढाणा प्रतिनिधी: होमिओपॅथीचे जनक सर सॅम्युएल हॅनेमन यांच्या जयंतीनिमित्त केंद्र शासनाच्या आयुष मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार, बुलढाणा जिल्हा रुग्णालय येथे ‘जागतिक होमिओपॅथी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. “शाश्वत आरोग्यासाठी होमिओपॅथी” या संकल्पनेवर (Theme) आधारित या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. दत्तात्रय बिराजदार यांनी तर जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. अमोल राम गिते हे प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित होते.

आपल्या अध्यक्षीय भाषणात डॉ. दत्तात्रय बिराजदार म्हणाले की, केंद्रीय आयुष तथा आरोग्य व कुटुंब कल्याण राज्यमंत्री प्रतापरावजी जाधव यांच्या खंबीर नेतृत्वात जिल्ह्यात आयुष मंत्रालयामार्फत सामान्य नागरिकांसाठी अनेकविध आरोग्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जात आहेत. होमिओपॅथीसह आयुषच्या इतर सर्व चिकित्सा पद्धतींचा लाभ तळागाळातील जनतेपर्यंत पोहोचवण्याचे काम सध्या युद्धपातळीवर सुरू आहे. भविष्यात जिल्ह्यात आयुष विभागामार्फत येणाऱ्या विविध अद्ययावत सेवा-सुविधांची सविस्तर माहितीही त्यांनी यावेळी दिली.

कार्यक्रमात डॉ. स्वाती धारस्कर यांनी होमिओपॅथी चिकित्सा पद्धतीचे मानवी आरोग्यावरील सकारात्मक परिणाम आणि या उपचार पद्धतीचे महत्त्व यावर सखोल मार्गदर्शन केले.

या कार्यक्रमाला जिल्हा आयुष अधिकारी डॉ. प्रशांत तांगडे, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. भागवत भुसारी, निवासी वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रवीण घोंगटे, अधिसेविका श्रीमती कुलकर्णी, आयुष सल्लागार डॉ. मोहम्मद शफाअत, वैद्यकीय अधिकारी डॉ. सय्यद अरषद, डॉ. शीतल ठाकरे, डॉ. कमर खान, औषध निर्माण अधिकारी रेखा भुसारी शिंदे यांच्यासह जिल्हा रुग्णालयातील अधिकारी, कर्मचारी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. प्रशांत तांगडे यांनी केले, तर सूत्रसंचालन डॉ. पंकज राठोड यांनी केले. उपस्थितांचे आभार वैभव उबरहंडे यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी शांता अंभोरे, सौरभ कुलकर्णी व इतर कर्मचाऱ्यांनी परिश्रम घेतले.

000000

संबंधित पोस्ट

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ महिलांसाठी आरोग्य शिबीर१७ सप्टेंबर ते २ ऑक्टोबर २०२५ या कालावधीत विशेष अभियान

vishwatmaklokswamivarta

कुटुंबाचा सामाजिक उपभोग : आरोग्य या विषयावर देशव्यापी पाहणी,सर्वेक्षणासाठी येणाऱ्या कर्मचाऱ्यांना माहिती देवून सहकार्य करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

जागतिक महिला दिनानिमित्त स्त्रीरोगतज्ञ विशेषज्ञ प्राध्यापिका डॉ. राजश्री दयानंद कटके एक अविस्मरणीय किमयागार…

vishwatmaklokswamivarta

ठाणे जिल्ह्यात “कुष्ठरोग शोध मोहीम सुरूविना निदान कुष्ठरुग्ण शोधण्यावर भर; २,४३२ पथके करणार सर्वेक्षण..

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार” अभियानाचा जिल्ह्यात शुभारंभ जिल्हा स्त्री रुग्णालय येथे थेट प्रक्षेपणाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

राजूर येथील कावीळ साथ रोखण्यासाठी तात्काळ उपाययोजना करा – पालकमंत्री राधाकृष्ण विखे पाटील