vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ,महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

 

गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ,महाराष्ट्रात वाघाच्या हल्ल्यात सर्वाधिक मृत्यू

नागपूर प्रतिनिधी  : मानव आणि वन्यप्राणी यांच्यातील संघर्ष दिवसेंदिवस वाढत आहे. गडचिरोली जिल्ह्यात एकाच वाघाने दहापेक्षा अधिक जीव घेतल्याच्या घटनेने खळबळ उडाली आहे. मागील आठ महिन्यात राज्यात ५५ जण मृत्यू वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात झाले आहेत. त्यात सर्वाधिक ४१ मृत्यू वाघाच्या हल्ल्यातील असून गेल्यावर्षीच्या तुलनेत ही आकडेवारी १५ टक्के अधिक आहे.

 

राज्यात वाघांच्या संख्येत वाढ होत असताना त्याचा अधिवास कमी झालेला आहे. वन विभागाने संवर्धनासाठी केलेल्या उपाययोजनांमुळे वाघासह इतरही वन्यप्राण्यांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. मात्र, विकासकामे, रस्त्याचे रुंदीकरण आणि वाघाचा अधिवास शोधण्यासाठी होणारी भटकंती. यामुळेही वाघ आणि मानव यांच्यातील संघर्ष वाढलेला आहे. त्यामुळेही वाढलेली वन्यजीवांची संख्या आता वन विभागासाठी डोकेदुखी ठरु लागले आहे. गेल्या आठ महिन्यात मनुष्यावर हल्ले केलेल्या दोन ते तीन वाघांना जेरबंद करण्याचे आदेश प्रधान मुख्य वनसंरक्षक (वन्यजीव) यांनी दिलेले आहेत. दोन वाघांना जेरबंद करण्यात यशही आलेले आहेत. आता गडचिरोली जिल्ह्यातील मनुष्यावर हल्ला केलेल्या वाघाला पकडण्यासाठी वन विभागाने आदेश दिलेले आहेत. त्याला बेशुद्ध करून पकडण्यासाठी वन विभागाचे पथक प्रयत्न करीत आहेत. अद्यापही त्याला यश आलेले नसले तरी कर्मचारी दिवस-रात्र त्या वाघाचा मागोवा घेत आहे. आता पुन्हा मनुष्य हानी होऊ नये म्हणूनही प्रयत्न करीत आहेत. गेल्यावर्षी राज्यात नऊ महिन्यात वन्यप्राण्यांच्या हल्ल्यात ५३ जणांनी जीव गमावले होते. यंदा आठ महिन्यातच ५५ जणांचे जीव गेल्याची उघडकीस आले आहे. वाघामुळे ४१, बिबट्याने १०, जंगली डुकरांमुळे तीन आणि एकाचा हत्तीच्या हल्ल्यात मृत्यू झालेला आहे. यामध्ये सर्वाधिक ४९ मृत्यू विदर्भात आहेत. देशात सर्वाधिक वाघाच्या हल्ल्यात मृत्यू राज्यातच झाल्याचे सूत्रांनी सांगितले.

संबंधित पोस्ट

गिरणी कामगारांच्या घरांसाठीच्या अर्जांची छाननी तीन महिन्यांत पूर्ण करावी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे निर्देश.

महाराष्ट्राच्या अमृत महोत्सवाकडे वाटचाल करताना रचनात्मक कार्यासाठी एकत्र येऊया – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राज्याचा विकास थांबणार नसल्याचे मुख्यमंत्र्यांचे विधानसभेत अंतिम आठवडा प्रस्तावावर प्रतिपादन

vishwatmaklokswamivarta

मुंबईत ५० एकरपेक्षा मोठ्या भूखंडांवर‘क्लस्टर रिडेव्हलपमेंट’ राबवणार; पहिल्या टप्प्यात १७ प्रकल्पांची निवड मुंबई झोपडपट्टीमुक्तीसाठी राज्य शासनाचे मोठे पाऊल; उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची विधान परिषदेत घोषणा

vishwatmaklokswamivarta

पोलीस आयुक्तालय कार्यक्षेत्रात ड्रोन व तत्सम उड्डाणांना मनाई

vishwatmaklokswamivarta

शिवसेनेला धक्का; माजी खासदार आनंदराव अडसूळ यांच्या घरी ईडीचं पथक

vishwatmaklokswamivarta

नागपूर अधिवेशनाच्या उर्वरित कालावधीसाठी जयंत पाटील निलंबित; विधानसभा अध्यक्षांबद्दलचं ‘वक्तव्य’ भोवलं…

vishwatmaklokswamivarta