vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांच्या बांधकामांचा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला आढावा

 

मुंबई : प्रतिनिधी. : राज्यातील वैद्यकीय शिक्षणाच्या पायाभूत सुविधांना गती देण्यासाठी वाशिम, अमरावती आणि धाराशिव शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व संलग्न रुग्णालयांच्या बांधकामांचा आढावा वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी घेतला .या बैठकीत वाशिम, अमरावती आणि धाराशिव येथील प्रकल्पांच्या प्रगतीचा सविस्तर आढावा घेऊन मंत्री श्री मुश्रीफ म्हणाले, वाशिम येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयाच्या बांधकामास नियमानुसार परवानगी देण्यात आली आहे. यामुळे या प्रकल्पाच्या प्रत्यक्ष कामांना लवकरच सुरुवात करण्यात यावी. अमरावतीतील प्रकल्पाबाबत कंत्राटदार नियुक्तीसाठी निविदा प्रसिद्ध करण्यात आले आहे. निविदा प्रक्रियेला प्रतिसाद मिळाल्यानंतर पुढील टप्प्यात कंत्राटदार निवडून बांधकामास गती दिली जाणार आहे. धाराशिव येथील प्रकल्पासाठी कंत्राटदार नियुक्तीच्या दृष्टीने निविदा उघडण्यात आली असून सध्या तांत्रिक पडताळणीची प्रक्रिया सुरू आहे. ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर लवकरच प्रत्यक्ष कामाला प्रारंभ होणार आहे.

मंत्री हसन मुश्रीफ यांनी संबंधित अधिकाऱ्यांना सर्व प्रकल्प वेळेत पूर्ण करण्याच्या सूचना देत, दर्जेदार बांधकाम आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्यावर भर दिला. राज्यातील आरोग्य सेवा सक्षम करण्यासाठी ही महाविद्यालये महत्वाची भूमिका बजावतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.

या बैठकीस आमदार संजय खोडके, आमदार सुलभा खोडके, वैद्यकीय शिक्षण व संशोधन संचालनालयाचे आयुक्त अनिल भंडारी, वैद्यकीय शिक्षण विभागाचे संबंधित अधिकारी उपस्थित होते तसेच संबंधित वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता दूरदृष्य प्रणालीद्वारे उपस्थित होते.

 

संबंधित पोस्ट

मातोश्री मागासवर्गीय वसतिगृहात प्रवेशासाठी 20 सप्टेंबरची मुदत

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते आणि उपमुख्यमंत्री सुनेत्राताई पवार यांच्या उपस्थितीत टेक-महाइम्पॅक्ट कॉन्क्लेव्ह २०२६ चा उद्घाटन सोहळा संपन्न

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने (#एमपीएससी) महाराष्ट्र गट-ब (अराजपत्रित) सेवा संयुक्त पूर्व परीक्षा-२०२६ साठी अर्ज सादर करण्याच्या मुदतीत वाढ

चिखलदरा येथे पंडित दीनदयाल उपाध्याय रोजगार मेळाव्यात 142 उमेदवारांची प्राथमिक निवडआदिवासी तरुणांनी जागतिक स्तरावर झेप घेण्याचे आमदार केवल कुमार काळे यांचे आवाहन

भारतदुर्गा मंदिर नवचेतना जागृत करून प्रेरणा देईल- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नॅशनल कॅन्सर इन्स्टिट्यूट परिसरात भारतदुर्गा मंदिराचा शिलान्यास

ज्येष्ठ साहित्यिक, कलाकारांनी मानधन योजनेच्यालाभासाठी 31 जुलैपर्यंत अर्ज करावा- उपमुख्य कार्यकारी अधिकारी (ग्रामपंचायत) शशिकांत शिंदे