vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्यास्थानिक बातम्या

ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर साकोरे यांच्याकडून आढावा

ऊर्जा विभागातील भरती प्रक्रियेचा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर साकोरे यांच्याकडून आढावा

मुंबई, प्रतिनिधी ऊर्जा विभागातील भरती प्रक्रिया व प्रतीक्षा यादी संदर्भातील आढावा ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे – बोर्डीकर यांनी घेतला. भरती प्रक्रियेबाबत आवश्यक सुधारणा करण्याबाबत योग्य ती कार्यवाही करण्याच्या सूचनाही त्यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या.

एमएसईबी होल्डिंग कंपनी कार्यालयात झालेल्या या बैठकीस महानिर्मितीचे कार्यकारी संचालक नितीन वाघ, महावितरणचे कार्यकारी संचालक राजेंद्र पवार, महापारेषणच्या कार्यकारी संचालक सुचिता भिकाने यांच्यासह संबंधित अधिकारी उपस्थित होते.

ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर म्हणाल्या, भरती प्रक्रियेच्या अंतर्गत निकाल आणि प्रतिक्षा यादीबाबत स्पष्ट सूचना देण्यात याव्यात. तिन्ही कंपन्यांच्या भरती धोरणामध्ये एकसमानता (युनिफॉर्मिटी) आणण्यात यावी. दिव्यांग, एसइबीसी/ईडब्ल्यूएस तसेच प्रकल्पग्रस्त उमेदवारांच्या भरती प्रक्रियेमध्ये पारदर्शकता सुनिश्चित करण्यात यावी आणि आयबीपीएस कंपनीमार्फत भरती प्रक्रिया राबविताना उमेदवारांचे गुणांसह निकाल अधिकृत संकेतस्थळावर प्रदर्शित करण्यात यावेत.

तसेच ऊर्जा विभागातील रिक्त पदांचा नियमित आढावा घेऊन त्यानुसार विभागातील भरती प्रक्रिया राबवावी अशा सूचना ऊर्जा राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांनी महानिर्मिती, महावितरण आणि महापारेषणच्या अधिकाऱ्यांना दिल्या.

00000

संबंधित पोस्ट

पणन हंगाम 2024-25 योजनेंतर्गत धान खरेदी करण्यासाठी दि.31 मार्च 2025 रोजी पर्यंत मुदतवाढ..

vishwatmaklokswamivarta

विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर यांनी केली पाणीपुरवठा योजनेची पाहणी,पाणीपुरवठा योजनेची प्रलंबित कामे विहित कालमर्यादेत पूर्ण करा – विभागीय आयुक्त जितेंद्र पापळकर

विधानसभा सदस्य शिवाजी कर्डीले यांच्या आकस्मिक निधनामुळे रिक्त झालेल्या २२३-राहुरी विधानसभा मतदारसंघाची #पोटनिवडणूक लवकरच होण्याची शक्यता

vishwatmaklokswamivarta

सातारा-कोल्हापूर व कराड-चिपळूण रस्त्याचे काममुदतीत पूर्ण न झाल्यास फौजदारी गुन्हे दाखलकरणार- पालकमंत्री शंभूराज देसाई

नद्या या भारतीय संस्कृतीच्या साक्षीदार – माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद “एक भारत, श्रेष्ठ भारत” संकल्पना अधिक दृढ करावी

दसऱ्याच्या शुभ मुहूर्तावर सोन्याने गाठला उच्चांकी दर; 14 वर्षात पहिल्यांदाच.. पहा 24 कॅरेटचा भाव…

vishwatmaklokswamivarta