vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन

जिल्हा परिषद कृषी विभागाकडून खरीप हंगामाचे नियोजन

प्रतिनिधी, ठाणे (जिल्हा परिषद, ठाणे) : जिल्हा परिषद ठाणेच्या कृषी विभागामार्फत आगामी खरीप हंगामासाठी निविष्ठा नियोजन करण्यात आले असून आवश्यक निविष्ठा उपलब्ध करून देण्यासाठी जिल्हा प्रशासन सज्ज झाले आहे.

खरीप हंगामाच्या पार्श्वभूमीवर भात व तूर बियाण्यांची मागणी करण्यात आली आहे. तसेच शेतकऱ्यांच्या अडचणी तत्काळ सोडवण्यासाठी जिल्हास्तरीय नियंत्रण कक्ष, तालुकास्तरीय तक्रार निवारण समित्या आणि भरारी पथके स्थापन करण्यात आली आहेत.ठाणे जिल्ह्यात खरीप हंगामाखाली सरासरी सुमारे ६०,००० हेक्टर क्षेत्र असून त्यापैकी भात पिकाखालील सरासरी क्षेत्र ५५,००० हेक्टर आहे. मागील वर्षी ५५,१४३ हेक्टर क्षेत्रावर भात पिकाची लागवड करण्यात आली होती. यंदाच्या हंगामातही सुमारे ५५,००० हेक्टर क्षेत्रावर भात लागवडीचे नियोजन करण्यात आले आहे.

खत उपलब्धतेबाबत कृषी विभागाने ११,०८८ मेट्रिक टन रासायनिक खतांची मागणी केली असून शासनाकडून जिल्ह्यासाठी ११,५५० मेट्रिक टन खतसाठा मंजूर करण्यात आला आहे. त्यामध्ये युरिया ९,७०० मेट्रिक टन, डीएपी २०० मेट्रिक टन, एमओपी ५० मेट्रिक टन, एसएसपी १०० मेट्रिक टन तसेच संयुक्त खते १,५०० मेट्रिक टन यांचा समावेश आहे.

बियाणे उपलब्धतेच्या दृष्टीने जिल्ह्यासाठी एकूण २२ हजार क्विंटल बियाण्यांच्या आवश्यकता असून महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ व खाजगी बियाणे उत्पादक कंपन्या साधारणपणे १५ हजार ते १६ हजार क्विंटल बियाणांचा पुरवठा करणार आहेत. उर्वरित सहा हजार क्विंटन बियाणे शेतकरी स्वतः कडील वापरणार आहेत. बियाणांची कोणत्याही प्रकारची कमतरता पडणार नाही हे सर्व बियाणे सुधारित व संकरीत दोन्ही प्रकारचे असेल.

खरीप हंगाम सुरळीत पार पाडण्यासाठी कृषी विभागामार्फत सर्व आवश्यक उपाययोजना करण्यात येत असून शेतकऱ्यांनी शासनाच्या योजनांचा लाभ घ्यावा, असे आवाहन जिल्हा परिषद ठाणेचे कृषी विकास अधिकारी मुनीर बाचोटीकर यांनी केले आहे.

०००

संबंधित पोस्ट

सांगलीच्या जिल्हाधिकारीपदी डॉ. मैनाक घोष रुजू-मावळते जिल्हाधिकारी अशोक काकडे यांची पदोन्नतीने बदली

vishwatmaklokswamivarta

सर्व खाजगी आस्थापनांमध्ये अंतर्गत तक्रार समिती स्थापन करण्याचे-जिल्हा महिला व बाल विकास विभागाचे आवाहन

अन्न सुरक्षा प्रशिक्षण कार्यक्रमांतर्गत एफएसएसएआय आणि बृहन्मुंबई महानगरपालिका संयुक्तपणे मुंबईतील 10000 स्ट्रीटफूड विक्रेत्यांना देत आहेत प्रशिक्षण

इतर मागासवर्गीय, विमुक्त जाती-भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी मुंबईत शासकीय वसतिगृह सुरू

जिल्हाभरात पोळा सणापासून ते दीपावलीपर्यंत दुध व दुग्धजन्य पदार्थांची भेसळ रोखण्यासाठी मोहीम

तृतीयपंथीयांनी शासनाच्या योजनांचा लाभ घेऊन  : सहाय्यक आयुक्त देवीदास नांदगावकर