vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा

महाराष्ट्र राज्यातील निवासी डॉक्टरांचा संपाचा इशारा…

प्रतिनिधी मुंबई: कोविड काळातील  शैक्षणिक शुल्क माफ करण्याचे आश्वासन देण्यात आले होते. मात्र, या आश्वासनाची पूर्तता न झाल्याने मार्डच्या निवासी डॉक्टरांनी राज्य सरकारला संपावर जाण्याचा इशारा दिला आहे.  शैक्षणिक शुल्क माफीची मागणी मान्य न झाल्याने संप अटळ आहे. राज्यातील 5 हजारांहून अधिक निवासी डॉक्टर संपावर जाणार आहेत. वारंवार पाठपुरावा करूनही मागणी मान्य न झाल्याने संपाचे हत्यार उपसावे लागले आहे, अशी माहिती मार्डकडून (MARD) देण्यात आली आहे. त्यानुसार पुढच्या आठवड्यात संपावर जाण्याचा इशारा देण्यात आला आहे.

मार्डच्या निवासी डॉक्टर संपाच्या तयारीबाबत सेंट्रल मार्डच्या रा ज्यस्तरीय बैठकीत निर्णय घेण्यात आला. कोविड काळातील निवासी डॉक्टर यांनी रुग्ण सेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षणमंत्र्यांनी शैक्षणिक शुल्क माफीचे आश्वासन दिले होते. मात्र, कोविडची लाट ओसरताच याचा राज्य सरकारला विसर पडला आहे. हे शुल्क माफ करावे, अन्यथा संप पुकारला जाईल, असा इशारा मार्डने दिला आहे कोरोना काळातील निवासी डॉक्टरांची रुग्णसेवा आणि झालेले शैक्षणिक नुकसान लक्षात घेऊन वैद्यकीय शिक्षण मंत्र्यांनी शैक्षणिक फी माफीचे आश्वासन दिले होते. पण, अजूनही फी माफीचा निर्णय झाला नसल्याने 5 हजारहून अधिक मार्डच्या निवासी डॉक्टरांनी राज्यस्थरीय संपाचा इशारा दिला आहे, असे पत्रक मार्डकडून जारी करण्यात आले आहे.

संबंधित पोस्ट

नव्या वर्षाच्या पहिल्याचं दिवशी हरियाणात ३.८ रिश्टर स्केलचा भूकंप तर राजधानी दिल्लीतही भूकंपाचे हादरे

अफगाणिस्तानच्या हिंदुकुश पर्वतरांगेत नुकत्याच झालेल्या ६.० किंवा ६.३ रिश्टर स्केलच्या भूकंपामुळे अनेक घरे कोसळली असून, या भूकंपाच्या धक्क्यांमुळे किमान ८०० लोकांचा मृत्यू झाला आहे आणि अंदाजे २५०० हून अधिक लोक जखमी

vishwatmaklokswamivarta

नाशिक शहरातील अनधिकृत बांधकामावर कारवाई करणार- मंत्री उदय सामंत

राज्यात ४० हजार कोटी गुंतवणुकीच्या विशाल प्रकल्पांना मान्यता,१ लाख २० हजार रोजगार निर्मिती होणार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे

पंतप्रधान नरेंद्र मोदी अयोध्येत दिवाळीपूर्वी पूजा करण्याची शक्यता…

vishwatmaklokswamivarta

पर्यायी बाजार व्यवस्था, कृषी उत्पन्न बाजार समित्यांच्या अभ्यासासाठी गठीत दांगट समितीचा अहवाल शासनास सादर

vishwatmaklokswamivarta