vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या मायलेकींच्या बॅगेत २५ कोटींचे हेरॉइन..

मुंबई -कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या मायलेकींच्या बॅगेत २५ कोटींचे हेरॉइन…

मुंबई प्रतिनिधी

कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या होत्या. दोघीही भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी आल्या होत्या.मुंबई विमानतळावर कस्टम विभागाने केलेल्या कारवाईत ४.९५ किलो हेरॉइन जप्त केलं आहे. या हेरॉइनची किंमत २५ कोटी रुपये इतकी असल्याचं सांगण्यात येत आहे. जोहान्सबर्गहून आलेल्या मायलेकींकडून हे हेरॉइन जप्त करण्यात आलं आहे. सध्या गुजरातमधील मुंद्रा बंदरात जप्त करण्यात आलेल्या तीन हजार किलो हेरॉइनची चर्चा असतानाच मुंबईत विमानतळावर करण्यात आलेल्या कारवाईने अंमली पदार्थांच्या तस्करीचा मुद्दा चर्चेत आला आहे.

कतार एअरलाइन्समधून प्रवास करणाऱ्या मायलेकी जोहान्सबर्गहून मुंबईत आल्या होत्या. दोघीही भारतात फुफ्फुसाच्या कर्करोगावर उपचारासाठी आल्या होत्या असं सांगण्यात येत आहे. ट्रॉली बॅगमध्ये हेरॉइन लपवण्यात आलं होतं. विमान प्रवाशांकडे इतक्या मोठ्या प्रमाणावर ड्रग्ज सापडत नाही अशीही माहिती अधिकाऱ्यांनी दिली.

संबंधित पोस्ट

सिकल सेल रुग्णाच्या चेहऱ्यावर ‘मुस्कान’ आणणे हेच आपले ध्येय मुख्य कार्यकारी अधिकारी आयुषी सिंह जागतिक सिकलसेल दिन जनजागृती रॅलीने साजरा

हिंद-दी-चादर” श्री गुरु तेग बहादुर साहिबजी यांच्या ३५० व्या शहीदी समागम वर्षानिमित्त पूर्वतयारीचा आढावा

26 तलावाच्या मासेमारी ठेक्यासाठी निविदा आमंत्रित

अभियांत्रिकी, वैद्यकीय प्रवेश परीक्षा मार्गदर्शन योजना राबविण्यासाठीमुख्याध्यापकांना प्रस्ताव सादर करण्याचे आवाहन..

कसभा सार्वत्रिक निवडणूक-2024, 44- सांगली लोकसभा मतदार संघात तिसऱ्या दिवशी तीन उमेदवारांची तीन नामनिर्देशन पत्रे दाखल

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु