vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु

रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष
संपर्क नंबर व व्हॉट्सअप हेल्पलाईन सुरु

रायगड प्रतिनिधी:- जिल्हास्तरीय कक्षा मार्फत अनेक दुर्धर व गंभीर स्वरुपाच्या आजारांवरील उपचारांसाठी येणाऱ्या खर्चाकरीता रुग्णांना संबधीत रुग्णालयामार्फत आर्थिक सहाय्य देण्यात येते. आपत्ती प्रसंगीही आर्थिक मदत देण्यात येते. नागरीकांना या सेवा सहजपणे जिल्हास्तरावर उपलब्ध व्हाव्यात यासाठी रायगड जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी कक्ष संपर्क व व्हॉट्सअॅप हेल्पलाईन क्र. 8265000789 सुरु करण्यात आला आहॆ. या क्रमांकाच्या माध्यमातून जिल्ह्यातील गरजू रुग्ण/लाभार्थ्यांनी जास्तीत जास्त लाभ घ्यावा, असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी संदेश शिर्के यांनी केले आहे.

तसेच कक्षाचा ईमेल आयडी cmrfraigad@gmail.com हा आहे. जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहायता निधी व धर्मादाय रुग्णालय मदत कक्ष मा.मुख्यमंत्री यांच्या निर्देशानुसार जिल्हाधिकारी कार्यालय, अलिबाग-रायगड येथे जिल्हास्तरीय कक्ष सुरु करण्यात आलेला असून सदरच्या कक्षाचे उद्घाटन महाराष्ट्र दिनी दि.01 मे 2025 रोजी महिला व बालविकास, मंत्री कु.अदिती तटकरे यांच्या शुभहस्ते झालेले आहे.
0000000

संबंधित पोस्ट

घनकचरा व्यवस्थापन नियम 2026’ चे पालन करून एकत्रित प्रयत्नांतून नवी मुंबईचे ‘देशातील सुपर स्वच्छ शहर मानांकन’ कायम राखण्याचा निर्धार

vishwatmaklokswamivarta

गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी जलयात्रेतून जलसंवर्धनाच्या कार्याला नवसंजीवनी देण्याचा संकल्प – पालकमंत्री डॉ. राधाकृष्ण विखे पाटील-गोदा ते नर्मदा अहिल्यादेवी जलयात्रा’ ही प्रभावी ठरणार – प्रा. राम शिंदे

राष्ट्रीय चर्मकार संघाच्या धारावी तालुकाप्रमुख दिलीप गाडेकर यांची निवड…

vishwatmaklokswamivarta

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे शेतकऱ्यांच्या बांधावर-बुलढाणा जिल्ह्यातील दुष्काळसदृश परिस्थितीचा घेतला आढावा; शेतकऱ्यांना दिली मदतीची हमी..जिल्ह्यातील कोलारी, खडकी खामखेड, रोहिणखेड, टाकळी येथे केली पाहणी

vishwatmaklokswamivarta

हिंद दी चादर श्री गुरु तेग बहादूर” यांच्या 350 व्या शहिदी समागम वर्षानिमित्त 21 डिसेंबर रोजी खारघर येथे कार्यक्रमाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

शतायुषी शिक्षणव्रतीचा गौरव–ग्रंथतुला आणि धान्यतुला करून जपली सामाजिक बांधिलकी…