vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट:कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना..

जिल्हाधिकाऱ्यांची नागोठणे प्राथमिक आरोग्य केंद्रांला सरप्राईज भेट:कामकाजाची केली पाहणी, रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या केल्या सूचना..

 

रायगड प्रतिनिधी– रायगड जिल्ह्यातील नागोठणे येथील प्राथमिक आरोग्य केंद्रांला जिल्हाधिकारी किशन जावळे यांनी अचानक भेट देऊन पाहणी केली. या केंद्रात येणाऱ्या रुग्णांना तातडीच्या आरोग्य सेवा देण्याच्या सूूचना त्यांनी यावेळी केल्या.

यावेळी जिल्हाधिकारी श्री जावळे यांनी रुग्णालयाच्या कामकाजाची पाहणी केली. तसेच दररोज किती रुग्णांची तपासणी केली जाते, किती रुग्णांना संदर्भाकित केले जाते, त्याची कारणे योग्य आहेत किंवा नाहीत याची पाहणीही केली. या शिवाय काही रुग्णांशी संवादही साधला.

दरम्यान, ग्रामीण भागातील रुग्णांना तातडीने आरोग्य सेवा मिळण्यासाठी अधिकारी व कर्मचाऱ्यांनी मुख्यालयी राहून काम करण्याच्या सूचना दिल्या, विनाकारण रुग्णांना संदर्भाकित करू नये त्यांच्यावर आरोग्य केंद्र स्तरावर उपचार करावेत. तसेच रुग्णांना तसेच त्यांच्या नातेवाईकांना योग्य वागणुक द्यावी. एकही रुग्ण उपचाराविना परत जाऊ नये याची दक्षता घेण्याच्या सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

यावेळी वैद्यकीय अधिकारी डॉ. आदित्य शिरसाट,आरोग्य सहाय्यक राजेंद्र पवार, भरत क मारकड,औषध निर्माण अधिकारी श्रीम. अपर्णा साजेकर आदी कर्मचारी उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

स्त्रीभ्रूण हत्या रोखण्यासाठी कायद्यात आवश्यक सुधारणा करणार- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

जिल्हा रुग्णालयात 0 ते १८ वयोगटातील 115 बालकांचे मोफत टू डी इको तपासणी*

१ डिसेंबर : ३७ वा जागतिक एड्स दिन — अकोला जिल्ह्यात विविध उपक्रमांचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

जिल्हा रुग्णालयात जागतिक कर्करोग दिवस साजरा

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

vishwatmaklokswamivarta

सिरोंचा येथे दिव्यांग तपासणी शिबिर उस्फुर्त प्रतिसाद ; ८१६ लाभार्थ्यांची आरोग्य तपासणी  कडक ऊन अन लाभार्थ्यांचा ओघ… तरीही थकली नाही डॉक्टरांची टीम;