vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

राष्ट्रीय नमुना पाहणीः कुटुंबांचे आरोग्य सर्व्हेक्षण

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- भारत सरकारच्या अधिपत्याखालील राष्ट्रीय सांख्यिकी कार्यालयाच्या धर्तीवर ‘कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च’ या विषयावर राष्ट्रीय पातळीवर होणाऱ्या पाहणीत राज्यात अर्थ व सांख्यिकी संचालनालय सहभागी होत आहे. या पाहणीमध्ये जानेवारी ते डिसेंबर २०२५ ह्या कालावधीत माहिती गोळा करण्यात येणार आहे. निवड झालेल्या कुटुंबांकडून मागील ३६५ दिवसांमध्ये कुटुंबाच्या आरोग्यविषयक होणाऱ्या खर्चाबाबत विस्तृत माहिती गोळा करण्यात येत आहे. या पाहणीचे निष्कर्ष आरोग्य सेवा क्षेत्रात सुधारणा तसेच केंद्र व राज्य शासनाला नियोजनासाठी व धोरणे राबविण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. ही पाहणी राज्यातील सर्व जिल्ह्यांमध्ये होत असून या सर्वेक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे शासकीय आणि खाजगी रुग्णालय/दवाखान्यातून मिळणाऱ्या उपचारांवर होणारा खर्च, कुटुंबांचा आरोग्यविषयक होणारा खर्च, सर्व वयोगटातील लसीकरण, गर्भवती महिलांना मिळणाऱ्या सुविधांचा तपशील इत्यादी बाबींची माहिती गोळा करणे हा आहे. या सर्वेक्षणाअंतर्गत कुटुंबाची निवड ‘एक वर्ष किंवा एक वर्षापेक्षा कमी वयाचे मूल असणारे कुटुंब’ आणि ‘मागील ३६५ दिवसांमध्ये रुग्णालयामध्ये दाखल असणारी कुटुंबातील व्यक्ती’ यामधून करण्यात येणार आहे. नमूना तत्वावर निवडण्यात आलेल्या घटकातील कुटुंबाकडून प्राप्त माहितीवर आधारित निष्कर्ष हे राज्यातील लोकसंख्येकरिता अंदाजित केले जातील. सर्वेक्षणाकरीता घरी येणाऱ्या अधिकारी/कर्मचारी यांचेकडून कुटुंब निवडीची प्रक्रिया, सर्वेक्षणाची महत्त्वाची माहिती समजून घेण्याची आणि आरोग्यविषयक खर्चासंबंधी योग्य व परिपूर्ण माहिती देण्यासाठी सहकार्य करावे असे आवाहन जिल्हा सांख्यिकी अधिकारी यांनी केले आहे.०००००

संबंधित पोस्ट

रेवसा आश्रमशाळेत गोवर-रुबेला लसीकरण मोहिम

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र वैद्यकीय परिषदेच्या सदस्य निवडीसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर*

घाबरू नका… जीबीएस नवीन नाही.. दक्ष रहा

vishwatmaklokswamivarta

स्वस्थ नारी, सशक्त परिवार’ अभियानांतर्गत शेलगाव आटोळ येथे महिलांची आरोग्य तपासणी

मुख्यमंत्री सचिवालय (जनसंपर्क कक्ष)मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून वैद्यकीय सहाय्यता मिळविणे होणार अधिक सोपे आजारांचे पुनर्विलोकन, अर्थसहाय्याची नव्याने निश्चिती, रुग्णालय संलग्नीकरण निकष ठरविण्याकरिता समिती

vishwatmaklokswamivarta

मुख्यमंत्री सहायता कक्षातून 24 तासात होते मदत उपलब्ध रुग्णांच्या नातेवाईकांच्या प्रतिक्रिया…