vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण,प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० विभागस्तरीय प्रशिक्षण,प्रभावी अंमलबजावणीसाठी प्रशिक्षणाचा लाभ घ्या-विभागीय आयुक्त गावडे

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी विभागातील नागरी भागात प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी प्रभावीपणे करावयाची आहे. त्यासाठी हे प्रशिक्षण आयोजीत केले आहे. त्याचा यंत्रणेने लाभ घ्यावा. लोकांना परवडणारी घरे देण्याचे कार्य सुलभ व्हावे यासाठी हे प्रशिक्षण असून त्याचा लाभ घ्यावा, असे निर्देश विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी आज दिले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात प्रधानमंत्री आवास योजना (शहरी) २.० चे विभागस्तरीय- शहर्स्तरीय तांत्रिक तज्ज्ञ पायाभूत प्रशिक्षण आयोजीत करण्यात आले. या प्रशिक्षणात विभागातील ५ महानगरपालिका व ७५ नगरपालिकांचे मुख्याधिकारी, अभियंते, आवास योजनेशी संबंधित तांत्रिक सल्लागार आदी सहभागी झाले आहेत.

   जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यावेळी उपस्थित होते. प्रशिक्षक म्हणून गृहनिर्माण विभागाचे अवर सचिव रविंद्र खेतले, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे वरिष्ठ सल्लागार मुकुल बापट, राज्यस्तरीय प्रकल्प व्यवस्थापन यंत्रणेचे सल्लागार सारिम खान आदी उपस्थित होते.

  जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी सांगितले की, प्रधानमंत्री आवास योजनेची अंमलबजावणी करतांना पहिल्या टप्प्यात ज्या अडचणी आल्या त्यावर उपाययोजना शोधाव्या यासाठी प्रशिक्षणाचे आयोजन आहे. त्याचा प्रत्येकाने लाभ घ्यावा. तांत्रिक आणि प्रत्यक्ष अडचणींचे निराकरण होण्यासाठी प्रशिक्षणातून मार्गदर्शन घ्यावे. गोरगरिबांना स्वतःचे घर देण्यासाठी प्रत्येकाने संवेदनशिल, गतिमान पद्धतीने काम करावे.

 या प्रशिक्षणात योजनेचा आढावा, प्रगती, निधी वितरण, अखर्चित निधी, जिओ टॅगिंग याबाबत रविंद्र खेतले, प्रधानमंत्रीआवास योजनेची ध्येय्य, उद्दिष्टे व अंमलबजावणी याबाबत मुकुल बापट , प्रधानमंत्री आवास योजनेचे युनिफाईड पोर्टल, ऑनलाईन अर्ज भरणे याबाबत सारिम खान हे मार्गदर्शन करणार आहेत.०००००

संबंधित पोस्ट

एसटीने घडविले 9.71 लाख भाविकांचे “विठ्ठल दर्शन”; 35.87 कोटी उत्पन्नाची नोंद- परिवहन मंत्री प्रताप सरनाईक

काँग्रेसने संसदेच्या प्रतिष्ठेचा अवमान केल्याने जालन्यात भाजप आक्रमक, जोरदार निषेध आंदोलन संसदेचा अवमान हा देशाचा अपमान – भाजपा जिल्हाध्यक्ष भास्कर आबा दानवे

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे गौरवोद्गार अंदाज समिती अमृत महोत्सव राष्ट्रीय परिषदेचा समारोप.

vishwatmaklokswamivarta

नोंदणी व मुद्रांक विभागातील शिपाई पदभरती; समुपदेशनासाठी यादी संकेतस्थळावर येणार

vishwatmaklokswamivarta

इंदापूर, माणगाव बायपास रस्त्यांचे काम पूर्ण होईपर्यंत वाहतूक कोंडी टाळण्यासाठी चार पर्यायी रस्त्यांची कामे – उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निर्देश,मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावर वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी पर्यायी मार्गांचे रुंदीकरण, दुरुस्ती करुन तातडीची उपाययोजना उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अध्यक्षतेखालील बैठकीत निर्णय…

विदर्भ, तापी खोरे विकास महामंडळाअंतर्गत मान्यता मिळालेल्या सिंचन प्रकल्पांची कामे गतीने पूर्ण करा – जलसंपदा मंत्री गिरीश महाजन नियामक मंडळाच्या बैठकीत विविध विषयांना मान्यता

vishwatmaklokswamivarta