vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनवाचनातून मिळते प्रत्येकाला प्रेरणा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

डॉ.ए.पी.जे. अब्दुल कलाम जयंतीनिमित्त वाचन प्रेरणा दिनवाचनातून मिळते प्रत्येकाला प्रेरणा – जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी- प्रत्येक व्यक्तिला यशस्वी होण्यासाठी वाचन खूप महत्त्वाचे आहे. वाचनातून सृजनशीलता, सहनशीलता व सकारात्मकता निर्माण होऊन नवी प्रेरणा मिळते, म्हणून प्रत्येकाने दररोज किमान एक तास वाचनासाठी द्यावा,असे आवाहन जिल्हाधिकारी दिलीप स्वामी यांनी केले .

माजी राष्ट्रपती ए.पी.जे. अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त आज जिल्हाधिकारी कार्यालयात वाचन प्रेरणा दिन साजरा करण्यात आला. नियोजन सभागृहात डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 अपर जिल्हाधिकारी संभाजी अडकूणे, निवासी उपजिल्हाधिकारी जनार्दन विधाते, उपजिल्हाधिकारी सामान्य प्रशासन संगिता राठोड, उपजिल्हाधिकारी भूसंपादन एकनाथ बंगाळे, व्याख्याते सुनील उबाळे यांच्यासह जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकारी कर्मचारी या कार्यक्रमास उपस्थित होते.

 जिल्हाधिकारी स्वामी म्हणाले की, विविध भाषा आणि धर्मांचे साहित्याचे वाचन प्रत्येकाने करावे. जीवन कल्याण हाच सर्व साहित्याचा सार आहे. माणसाला यशस्वी होण्यासाठी वाचन महत्त्वाचे असून यामधून मानवी मनाची जडणघडण होते. डॉ. ए पी जे अब्दुल कलाम यांच्या जयंतीनिमित्त १५ ऑक्टोबर हा दिवस महाराष्ट्र शासनाने वाचन प्रेरणा दिवस म्हणून साजरा करण्याचे आदेश निर्गमित केले आहेत. कलाम यांच्या जीवनातील संशोधन कार्य हे देशासाठी मुलगामी आणि महत्वपूर्ण असून त्यांच्या साहित्यातून आणि जीवनकृतीतून सर्वांना प्रेरणा मिळावी यासाठी वाचनाबरोबरच त्यांचे जीवन कार्य पाहण्यासाठी त्यांच्या जन्म ठिकाणी तसेच कन्याकुमारी येथे भेट द्यावी असेही त्यांनी मार्गदर्शनात सांगितले. व्याख्याते सुनील उबाळे यांनी नारायण सुर्वे यांच्या साहित्य वाचनातून त्यांना खचून गेलेल्या मनाला नवीन उभारी घेऊन जीवनात यशस्वी होण्याची प्रेरणा मिळाल्याचे सांगितले. ज्याप्रमाणे जगण्यासाठी भूक लागते, तसेच मेंदूची भूक भागवण्यासाठी वाचन महत्त्वाचे आहे. दिवसभरात किमान स्वतःसाठी एक तास वाचनासाठी राखून ठेवून वाचन करावे असेही त्यांनी यावेळी सांगितले. स्वतः च्या जीवनातील अनुभवातून वाचनाचे महत्त्व अधोरेखित केले.

०००००

संबंधित पोस्ट

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील बदली व सेवा-वाढ नियमांचा भंग- चौकशीची मागणी

vishwatmaklokswamivarta

आज गेट ऑफ इंडिया ते यशवंतराव चव्हाण सेंटरपर्यंत व्यसनमुक्ती दिंडी काढण्यात आली. सामाजिक न्याय मंत्री संजय शिरसाट यांनी गेटवे ऑफ इंडिया येथे या दिंडीला हिरवा झेंडा दाखवला.

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रीय आरोग्य अभियानातील १५,०१० कंत्राटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा*१० वर्षांहून अधिक सेवा असलेल्या कर्मचाऱ्यांसाठी अधिसंख्य पदे निर्माण करण्याचा शासन निर्णय जारी..

वीर बाल दिवसानिमित्त साहिबजादा जोरावर सिंग आणि साहिबजादा फतेह सिंग यांना अभिवादन

vishwatmaklokswamivarta

महानगरपालिकांच्या सार्वत्रिक निवडणुकांच्या प्रचाराची मुदत १३ जानेवारी २०२६ रोजी सायंकाळी ५.३० वाजता संपणार असल्याने त्यानंतर इलेक्ट्रॉनिक आणि मुद्रित माध्यमांसह अन्य कुठल्याही प्रसारमाध्यमांद्वारे निवडणूकविषयक जाहिराती प्रसिद्ध किंवा प्रसारित करता येणार नाहीत – राज्य निवडणूक आयुक्त दिनेश वाघमारे.

vishwatmaklokswamivarta

पॅलेस्टाईन समर्थकांच्या मोर्चाला अनुमती नाकारली;हिंदूंच्या संघटित प्रयत्नांना यश !दहशतवादाचे समर्थन करणारे असे प्रत्येक प्रयत्न हाणून पाडा !- हिंदु राष्ट्र समन्वय समिती