vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

शहर विकास आराखड्यातील आरक्षित जागेवर भव्य उद्यान, मैदान व नाट्यगृहउभारावे; आमदार अर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचानिधी उपलब्ध करू – नगरसेवक अश्विन अंबेकर

 

जालना, प्रतिनिधी (: जालना शहर विकास आराखड्यात आरक्षित करण्यातआलेल्या एसआरपीएफच्या जागेवर भव्य उद्यान, आधुनिक खेळाचे मैदान, जलतरणतलाव आणि सुसज्ज नाट्यगृह उभारण्यात यावे, तसेच या प्रकल्पासाठी आमदारअर्जुनराव खोतकर यांच्या माध्यमातून नगर विकास विभागाचा निधी मिळवूनदेण्यासाठी प्रयत्न करू व सीएसआर निधी उपलब्ध झाल्यासविकासकामे उभी राहतील असे नगरसेवक अश्विन भास्करराव अंबेकर यांनी सांगितले.या संदर्भात अश्विन अंबेकर यांनी महानगरपालिका आयुक्तांची भेट घेऊनसविस्तर चर्चा करून निवेदन सादर केले. निवेदनात त्यांनी म्हटले आहे की,

जालना शहराची लोकसंख्या पाच लाखांहून अधिक झाली असून नवीन जालना परिसरातनागरिकांसाठी एकही मोठे उद्यान किंवा खेळाचे मैदान उपलब्ध नाही. विद्यमानछत्रपती संभाजी महाराज उद्यान आकाराने लहान असून तेही नवीन जालनापरिसरातील नागरिकांसाठी दूर आहे.मंठा चौफुली येथील एसआरपीएफ पेट्रोल पंप ते सिंदखेड राजा रोड दरम्यानएसआरपीएफची सुमारे १५० ते २०० एकर मोकळी जमीन असून त्यापैकी २५ एकर जागाशहर विकास आराखड्यात उद्यानासाठी आरक्षित आहे. या जागेवर सुमारे २० एकरक्षेत्रात भव्य उद्यान, तर उर्वरित ५ एकर क्षेत्रात खेळाचे मैदान, जलतरणतलाव, सुसज्ज सभागृह व नाट्यगृह उभारण्यात यावे, अशी मागणी त्यांनी केली.या प्रकल्पासाठी नगर विकास विभागाचा निधी, आमदार अर्जुनराव खोतकर यांचेसहकार्य तसेच सीएसआर निधीचा उपयोग करून ही विकासकामे पूर्ण करता येतील,असा विश्वास अंबेकर यांनी व्यक्त केला.

प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर त्याची देखभाल मूळ जमीनमालक असलेल्याएसआरपीएफकडे सोपविल्यास उपलब्ध मनुष्यबळामुळे उद्यानाची उत्तम निगा राखलीजाईल. त्यामुळे महिला, मुली आणि नागरिकांना सुरक्षित वातावरण मिळेल. तसेचनाममात्र प्रवेश शुल्क आकारल्यास त्यातून होणाऱ्या उत्पन्नातून देखभाल वप्रशासकीय खर्च भागविता येईल, असेही त्यांनी नमूद केले.शहरात मोठ्या मैदानांचा अभाव असल्याने खेळाडूंना सरावासाठी तसेच विविधक्रीडा स्पर्धांच्या आयोजनासाठी योग्य सुविधा उपलब्ध नाहीत. तसेच मा.कृष्णाराव फुलंब्रीकर नाट्यगृह बंद असल्याने या ठिकाणी आधुनिक नाट्यगृह उभारल्यास शहराच्या सांस्कृतिक विकासालाही चालना मिळेल. हा प्रस्ताव सभागृहासमोर आल्यास सर्वपक्षीय नगरसेवक त्यास निश्चितच पाठिंबा देतील आणिया प्रकल्पामुळे जालना शहराच्या वैभवात मोलाची भर पडेल, असेही अश्विनअंबेकर यांनी सांगितले.दरम्यान, महानगरपालिका आयुक्तांनी या निवेदनास सकारात्मक प्रतिसाद देतआरक्षणाची माहिती तपासून लवकरच सविस्तर प्रकल्प अहवाल तयार करून तो मंजुरीसाठी सभागृहासमोर ठेवण्यात येईल, असे आश्वासन दिले.यावेळी माजी नगरसेवक तथा माजी शहरप्रमुख बाला परदेशी, नगरसेवक दुर्गेशकाठोटीवाले यांनीही विविध विकासकामांबाबत सूचना मांडल्या. प्रसंगी हर्षदखाकीवाले, गणेश लाहोटी, नरेश जांगडे, अजय म्हस्के, अर्जुन भगत, बंडूकेळकर, परमेश्वर वाघमारे यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

संबंधित पोस्ट

मुंबईतील मोनोरेल तांत्रिक बिघाडामुळे अडकलेल्या सुमारे ४४२ पेक्षा अधिक प्रवाशांची  मुंबई अग्निशमन दलाने स्नॉर्केल (शिडी) वाहनांच्या साहाय्याने सुटका…

आयकर विवरण सुधारणा करण्यास ३१ मार्चपर्यंत मुदत

खेलो इंडिया युवा स्पर्धेत महाराष्ट्राचा सलग तिसरा विजय क्रीडा मंत्री दत्तात्रय भरणे यांच्याकडून विजेत्यांचे अभिनंदन

नवी मुंबई महानगरपालिकेस पर्यावरण क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीबद्दल ‘हरित यशोगाथा सर्वांगीण उत्कृष्टता’ पुरस्कार*

vishwatmaklokswamivarta

जालना शहरातील रस्ते आणि चौकप्रायोगिक तत्वावर विकसीत करणार-जिल्हाधिकारी आशिमा मित्तल-   

vishwatmaklokswamivarta

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा