vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी-शिवजयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..

शिवजयंती दिनी जिल्ह्यात ड्राय डे जाहीर- जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश जारी-शिवजयंती उत्सवाच्या पूर्वतयारीचा जिल्हाधिकाऱ्यांनी घेतला आढावा..

 

बुलढाणा, प्रतिनिधी : यंदा जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव मोठ्या उत्साहाने साजरा करण्यात येणार आहे. या उत्सव कालावधीत बुलढाणा जिल्ह्यातील कायदा व सुव्यवस्था तसेच सार्वजनिक शांतता आबाधित राहावी यासाठी छत्रपती शिवाजी महाराज जयंती दिनी बुधवारी दि. 19 फेब्रुवारी रोजी संपूर्ण बुलढाणा जिल्ह्यातील सर्व देशी-विदेशी मद्य विक्री दुकाने, परवाना कक्ष व बीअर बार विक्री दुकाने बंद अर्थात कोरडा दिवस (ड्राय डे) ठेवण्याचे आदेश जिल्हाधिकारी डॉ. किरण पाटील यांनी जारी केले आहे.

छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सवाच्या पार्श्वभूमीवर कायदा व सुव्यवस्था व पूर्वतयारीबाबत आज जिल्हाधिकारी डॉ. पाटील यांनी जिल्ह्यातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक जिजाउ सभागृहात घेतली. या बैठकीला मुख्य कार्यकारी अधिकारी गुलाब खरात, पोलीस अधीक्षक विश्व पानसरे, निवासी उपजिल्हाधिकारी डॅा. जयश्री ठाकरे, उपजिल्हाधिकारी समाधान गायकवाड, अपर पोलीस अधीक्षक बी.बी. महामुनी, उपविभागीय अधिकारी शरद पाटील आदी विविध विभागाचे प्रमुख उपस्थित होते.

या बैठकीत छत्रपती श्री शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समितीच्या वतीन आयोजित कार्यक्रमांबाबत आढावा जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी घेतला. बुलढाणा जिल्ह्यात शिवजयंतीचा एकच भव्य कार्यक्रम साजरा व्हावा. शिव छत्रपतींचा जयंती उत्सव मोठ्या उत्साहात व शांततेत पार पाडण्यासाठी कायदा व सुव्यवस्थेच्या दृष्टीने प्रशासन सज्ज झाले आहे. शिवजयंतीच्या दिवशी संपूर्ण जिल्ह्यात मद्य विक्री बंद अर्थात ड्राय डे जाहीर करण्यात आला आहे. त्याचे तंतोतंत पालन करावे व या आदेशाचे उल्लंघन करणाऱ्या अनुज्ञप्तीधारकाविरुध्द कडक कारवाई करावी. तसेच कर्कश आवाजांचे डिजे, डॅाल्बी मर्यादित आवाजात वाजवण्यात येईल, याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी डॅा. पाटील यांनी दिले.

धार्मिक भावना दुखाणारे कृत्य करु नका,जिल्ह्यात शिव जयंती मोठ्या उत्साहात साजरी होते. या दिवशी आपल्या कृत्यातून कोणत्याही धार्मिक, सामाजिक भावना दुखावणार नाही, याची दक्षता घ्यावी. तसेच अफवांवर विश्वास न ठेवता प्रशासनाच्या सुचनांचे पालन करुन सहकार्य करण्याचे आवाहन जिल्हाधिकारी डॅा. किरण पाटील आणि पोलीस अधीक्षक विश्व पानसरे यांनी नागरिकांना केले आहे.

यावेळी वरिष्ठ पत्रकार राजेंद्र काळे यांनी छत्रपती शिवाजी महाराज सार्वजनिक जयंती उत्सव समिती, बुलढाणा यांच्या वतीने आयोजित कार्यक्रमांचे माहिती या बैठकीत दिली.

00000

संबंधित पोस्ट

बीड जिल्ह्यातील मस्साजोगचे सरपंच-संतोष देशमुख हत्येच्या निषेधार्थ बीडमध्ये आज आक्रोश मोर्चा…

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यात 385 रुग्णांना सुमारे 3.35 कोटींची मदत**मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या दूरदृष्टीतून आरोग्यसेवेला गती*

सनातन संस्थेचे संस्थापक सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या ८३ व्या जन्मोत्सवानिमित्त…गोव्यात ‘सनातन राष्ट्र शंखनाद महोत्सवा’चे भव्य आयोजन!संत-महंत, मंत्री यांच्यासह २० हजारांहून अधिक साधक-धर्मनिष्ठ उपस्थित रहाणार!

राज्यातील खासगी शाळेतील शिक्षकांच्या वेतनासाठी९७०.४२ कोटीच्या खर्चास मान्यताशालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांचे विधानसभेत निवेदन

मराठा आरक्षण प्रश्नी उच्च न्यायालयात हस्तक्षेप याचिका दाखल डॉ. संजय लाखेपाटील यांची मािहती

vishwatmaklokswamivarta

दहावी बारावीच्या विद्यार्थ्यांसाठी स्थापन होणार दक्षता समिती शिक्षण मंडळाचा निर्णय

vishwatmaklokswamivarta