vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती

जागतिक तंबाखू नकार दिनानिमित्त जिल्हा रुग्णालयाकडून जनजागृती

 

अमरावती, प्रतिनिधी: येत्या ३१ मे २०२६ च्या जागतिक तंबाखू नकार दिनाचे औचित्य साधून अमरावती जिल्हा आरोग्य विभागामार्फत तंबाखूच्या दुष्परिणामांबाबत व्यापक जनजागृती मोहीम हाती घेण्यात आली आहे. ‘व्यसनाला नकार, आरोग्याचा स्वीकार’ हा निर्धार करीत १ मे महाराष्ट्र दिनी जिल्ह्यातील सर्व आरोग्य संस्थांमध्ये अधिकारी, कर्मचारी आणि रुग्णांना तंबाखू मुक्तीची सामूहिक शपथ देण्यात आली.

तंबाखू उत्पादनात भारत दुसऱ्या क्रमांकावर असला, तरी तोंडाच्या कॅन्सरमध्ये जगात पहिल्या क्रमांकावर आहे. टाटा कॅन्सर हॉस्पिटलच्या अहवालानुसार, ८० ते ९० टक्के तोंडाच्या कॅन्सरचे कारण तंबाखू आहे. भारतामध्ये दरवर्षी तब्बल १३.५० लाख लोक यामुळे प्राणाला मुकतात. तंबाखूमुळे मुख, फुफ्फुसाचा कॅन्सर, हृदयविकार, लकवा आणि गरोदर महिलांमध्ये गर्भपातासारखे गंभीर धोके निर्माण होतात,अशी माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. बिनोद पवार यांनी दिली.

आरोग्य विभागाच्या राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत वर्षभर समुपदेशन केंद्र चालवले जाते. तरीही व्यसन करणाऱ्यांनी दर महिन्याला स्वतःच्या तोंडाची तपासणी करावी. तोंडात पांढरे-लाल चट्टे दिसणे, तोंड कमी उघडणे किंवा १५ दिवसांपेक्षा जास्त काळ जखम न भरणे ही कर्करोगपूर्व लक्षणे असू शकतात. अशी लक्षणे आढळल्यास तत्काळ शासकीय रुग्णालयात तपासणी करावी, कारण सुरुवातीच्या टप्प्यात उपचार झाल्यास रुग्णाचा जीव वाचू शकतो.

कोटपा (COTPA) कायदा २००३ अंतर्गत सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान व थुंकणाऱ्यांवर कलम ४ नुसार २०० रुपये दंडात्मक कारवाई केली जात आहे. तसेच, कलम ६(ब) नुसार शाळा-महाविद्यालयांच्या १०० मीटर परिसरात तंबाखू विक्रीवर कडक बंदी आहे. नागरिकांनी भुलथापांना बळी न पडता तंबाखूमुक्त व्हावे आणि आपले कुटुंब सुरक्षित ठेवावे, असे आवाहन डॉ. पवार यांनी केले आहे.

*****

संबंधित पोस्ट

भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकर जयंती महोत्सव विद्यापीठाच्या सेवेत ’रुग्णवाहिका’दाखल

राज्य कामगार विमा योजनेतील रुग्णालये होणार अत्याधुनिक- सार्वजनिक आरोग्य मंत्री प्रकाश आबिटकर

गडचिरोली जिल्हा रुग्णालयाची मोठी कामगिरी! दोन गुंतागुंतीच्या ओव्हेरियन ट्युमर शस्त्रक्रिया यशस्वी! 

जिल्हा कारागृहात क्षयरोग दुरीकरण मोहिम; बंद्यांची तपासणी व जनजागृती कार्यक्रम

एच.आय.व्ही. बाधित रूग्णांनी नियमितपणे ए.आर.टी. औषधोपचार घ्यावा – निवासी उपजिल्हाधिकारी ज्योती पाटील

vishwatmaklokswamivarta

नागपूरमध्ये अतिविशेषोपचार वैद्यकीय अभ्यासक्रमांसह ६१५ खाटांचे रुग्णालय

vishwatmaklokswamivarta