vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

कुरखेड्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराजस्व समाधान शिबिर; नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ**रक्तदान शिबिराला नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

*कुरखेड्यात सेवा संकल्प अभियानांतर्गत महाराजस्व समाधान शिबिर; नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ**रक्तदान शिबिराला नागरिक, अधिकारी व कर्मचाऱ्यांचा उत्स्फूर्त प्रतिसाद*

गडचिरोली, प्रतिनिधी : सेवा संकल्प अभियानांतर्गत कुरखेडा तहसील कार्यालयात आज ‘छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर’ आयोजित करण्यात आले. उपविभागीय अधिकारी किरण वागस्कर यांच्या उपस्थितीत झालेल्या या शिबिरात विविध विभागांच्या समन्वयातून नागरिकांना शासकीय सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून देण्यात आला. यावेळी आयोजित रक्तदान शिबिरालाही नागरिक, अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.

शिबिराला तहसीलदार शशिकांत जाधव, नायब तहसीलदार वैभव आंबेकर, सत्यनारायण अनमदवार, प्रदीप शिंदे, कुरखेडा उपजिल्हा रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. अमित ठमके आणि तालुका आरोग्य अधिकारी डॉ. सुजिता वाढिवे उपस्थित होते. तसेच महसूल, कृषी, ग्रामपंचायत, वन व आरोग्य विभाग आणि महावितरणचे अधिकारी व कर्मचारी सहभागी झाले होते.

नागरिकांपर्यंत शासकीय सेवा सुलभपणे पोहोचविण्याच्या उद्देशाने आयोजित या शिबिरात सहभागी विभागांनी परस्पर समन्वय साधून सेवा व योजनांचा लाभ उपलब्ध करून दिला. विविध विभागांचा एकाच ठिकाणी सहभाग असल्याने नागरिकांना संबंधित सेवांसाठी सोय झाली.

सेवा संकल्प अभियानांतर्गत तहसील कार्यालयात रक्तदान शिबिराचेही आयोजन करण्यात आले. नागरिकांसह अधिकारी व कर्मचाऱ्यांनी या उपक्रमात उत्स्फूर्त सहभाग नोंदवून सामाजिक बांधिलकी जपली.

कुरखेडा तहसील प्रशासनाच्या वतीने आयोजित या दोन्ही उपक्रमांतून नागरिकांना शासकीय सेवांचा लाभ देण्यासोबतच रक्तदानासाठी लोकसहभागाला चालना देण्यात आली.

संबंधित पोस्ट

जागतिक नेत्रदान दिनानिमित्त बुलढाण्यात ‘नेत्रदान-जीवनदान’ जनजागृती मोहीम

मलेरिया निर्मूलनासाठी आरोग्य विभाग सज्ज; जिल्हा सामान्य रुग्णालयात पूर्वतयारी आढावा बैठक संपन्न*

vishwatmaklokswamivarta

वरवंड येथे समग्र प्राथमिक आरोग्य सेवेवरील दोन दिवसीय कार्यशाळा संपन्न

जागतिक महिला दिनानिमित्त उपक्रम;किशोरवयीन मुलींना एचपीव्ही (HPV) मोफत लस जिल्ह्यातील २१ हजार मुलींना होणार लाभ

जागतिक महिला दिनानिमित्त जिल्हास्तरीय ‘एचपीव्ही’ (HPV) लसीकरण मोहिमेचे उत्साहात उद्घाटन

वटपौर्णिमेच्या दिवशी महिलांमध्ये हिवताप / डेंग्यूबाबत जनजागृती