vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

राज्य राखीव पोलीस बल शिपाई भरतीची लेखी परीक्षा 17 मे रोजी…

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी समादेशक, राज्य राखीव पोलीस बल गट क्र. 20 वरणगाव यांच्या मार्फत सशस्त्र पोलीस शिपाई भरती सन 2024-25 अंतर्गत लेखी परीक्षा शनिवार, 17 मे 2026 रोजी आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा सकाळी 11.00 ते दुपारी 12.30 या वेळेत होणार असून उमेदवारांनी सकाळी 7.00 वाजेपर्यंत परीक्षा केंद्रावर उपस्थित राहणे आवश्यक आहे.

 

 

परीक्षेसंदर्भातील सविस्तर सूचना महाराष्ट्र राज्य राखीव पोलीस बल संकेतस्थळ⁠ https://www.maharashtrasrpf.gov.in येथे उपलब्ध करून देण्यात आल्या आहेत.

ही परीक्षा महाराष्ट्र इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एमआयटी), गेट क्रमांक 01, 03, 05 व 08, बीड बायपास रोड, छत्रपती संभाजीनगर, श्रेयस इंजिनिअरिंग कॉलेज, सातारा तांडा, छत्रपती संभाजीनगर, चाटे स्कूल, गट क्रमांक 98, रेणुका माता मंदिर रोड, बीड बायपास, सातारा परिसर तसेच एंजल स्कूल, सातारा परिसर येथे आयोजित करण्यात आली आहे.

उमेदवारांनी वेळेचे काटेकोर पालन करून आवश्यक कागदपत्रांसह परीक्षा केंद्रावर उपस्थित राहावे, असे आवाहन विक्रम साळी, समादेशक तथा भरती प्रमुख, राज्य राखीव पोलीस बल गट क्र.20, वरणगाव, जि. जळगाव (कॅम्प राज्य राखीव पोलीस बल गट क्र.14, छत्रपती संभाजीनगर) यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे केले आहे.

संबंधित पोस्ट

राहुरी विधानसभा पोटनिवडणुक-उमेदवारांच्या निवडणूक खर्चावर काटेकोर लक्ष ठेवा – खर्च निरीक्षक व्ही. कुमार

पंतप्रधानांनी गोव्यात झालेल्या आयर्नमॅन 70.3 सारख्या स्पर्धांमधील युवकांच्या वाढत्या सहभागाचे स्वागत केले आयर्नमॅन ट्रायथलॉन यशस्वीरीत्या पूर्ण केल्याबद्दल अनामलाई आणि तेजस्वी सूर्या या तरुण सहकाऱ्यांचे पंतप्रधानांनी केले कौतुक

vishwatmaklokswamivarta

स्वाधार योजनेअंतर्गत अर्ज करण्यास 15 जानेवारीपर्यंत मुदतवाढ…

पोलीस विभागाने ॲट्रॉसिटी अंतर्गत दाखलप्रलंबित प्रकरणे तात्काळ निर्गत करावीत – जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष

राज्य शासनाचे पायाभूत सुविधा क्षेत्रातील सर्वोत्तम काम बँकांसाठी आश्वासक- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पायाभूत सुविधा विकासासाठी बँकांकडून नेहमीच सर्वोत्तम सहकार्य..

देशभरात ७५ ठिकाणी नमो मॅरेथॉनचे आयोजन– केंद्रीय मंत्री डॉ. मनसुख मांडविया

vishwatmaklokswamivarta