vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

महाटेट 2025 परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण सुरू

    अमरावती, प्रतिनिधी : महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा 2025 उत्तीर्ण झालेल्या उमेदवारांचे परीक्षेचे प्रमाणपत्र वितरण दि. 19 मे पासून सुरू करण्यात आले आहे. पात्र उमेदवारांना हे प्रमाणपत्र 8 जून पर्यंत कार्यालयीन वेळेत प्राप्त करून घेता येणार आहे.   उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी अर्ज सादर केल्यानंतर त्यांच्या कागदपत्रांची रीतसर तपासणी केली जाईल. त्यानंतर तीन दिवसांनी उमेदवारांना प्रमाणपत्र वितरित केले जाईल. प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना उमेदवारांनी मूळ कागदपत्रांसह छायांकित प्रती आणणे आवश्यक आहे.

   उमेदवारांनी प्रमाणपत्र घेण्यासाठी येताना महाराष्ट्र शिक्षक पात्रता परीक्षा प्रवेशपत्राची प्रत, महाटेट परीक्षेच्या गुणपत्रिकेची प्रत, डी. टी. एड. किंवा बी. एड. उत्तीर्ण गुणपत्रिका अथवा प्रमाणपत्र, राखीव प्रवर्गातील उमेदवारांसाठी जात प्रमाणपत्र, लागू असल्यास दिव्यांगत्वाचे प्रमाणपत्र, माजी सैनिक असल्यास त्याबाबतचा अधिकृत पुरावा, आधार कार्ड, पॅन कार्ड, ड्रायव्हिंग लायसन्स किंवा निवडणूक ओळखपत्र यांपैकी कोणतेही एक ओळखपत्र, या कागदपत्रांच्या प्रती आणि मूळ कागदपत्रे सोबत आणणे आवश्यक आहे, असे प्राथमिक शिक्षणाधिकारी यांनी कळविले आहे.

 

0000000

संबंधित पोस्ट

जिल्हास्तरीय मुख्यमंत्री सहाय्यता निधी कक्षातून दोन महिन्यात 14 लाख 45 हजार रुपयांची मदत.. – जिल्हा स्तरावरच मदत मिळत असल्याने रूग्णांना दिलासा

जगात ज्ञान हीच संपत्ती- उच्च व तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील*

vishwatmaklokswamivarta

रसायने व साहित्य खरेदीसाठी दरपत्रके मागविण्यात येत आहेत

राज्यातील ७५,००० प्रशिक्षणार्थ्यांना मिळणार नव्या युगातील कौशल्यांचे प्रशिक्षण– मंत्री मंगलप्रभात लोढा· पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते महाराष्ट्रात सुरू होणार ‘अल्पमुदतीचे रोजगारक्षम अभ्यासक्रम’ नवा अध्याय· उद्घाटन कार्यक्रमात होणार विश्वकर्मांचा सन्मान.

शिवाजी कोण होता?’ पुस्तकावर बंदीसाठी कोल्हापुरात हिंदुत्वनिष्ठांचे तीव्र आंदोलन!चुकीचा वा धार्मिक भावना दुखावणारा इतिहास मांडणाऱ्या या पुस्तकावर तात्काळ बंदी आणावी या मागणीसाठी समस्त हिंदुत्वनिष्ठांनी पोलीस अधीक्षक कार्यालयात निवेदन..

vishwatmaklokswamivarta

बातमीचा राग- राग करून पोलिसांत खोटी तक्रार करणाऱ्या प्रियंका राजपूतची हकालपट्टी करा; पत्रकारांची मुख्यमंत्र्यांकडे मागणी-अन्यथा राज्यभर आंदोलन करण्याचा ईशारा पत्रकारांचा जिल्हाधिकारी,पोलीस अधीक्षक,महापालिका आयुक्तांना ईशारा