vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

मुंबई पोलिसात खळबळ,माजीआयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची तयारी

धक्कादायक मोठी बातमी  निलंबनाची टांगती तलवार माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची

मुंबई प्रतिनिधी : भ्रष्टाचारासह खंडणीप्रकरणी मुंबईसह ठाण्याच्या विविध पोलिस ठाण्यात, तसेच लाचलुचपत प्रतिबंधक विभागातही गुन्हा दाखल असलेल्या माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांच्यासह इतर २५ पोलिस अधिकाऱ्यांच्या निलंबनाची शिफारस पोलिस महासंचालकांनी राज्याच्या गृहविभागाकडे केली आहे. याबाबत पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गृहविभागाला अहवालही सादर केला आहे. यावर गृहविभागाकडून संबंधित अधिकाऱ्यांच्या सहभागाच्या पुराव्याबाबत माहिती मागविण्यात आली असून त्यानंतर या सर्व पोलिस अधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई होण्याची शक्यता आहे.

 

अहवालात चार पोलिस उपायुक्त, दोन सहाय्यक पोलिस आयुक्त, पोलिस निरीक्षक, सहाय्यक पोलिस निरीक्षक आणि पोलिस उपनिरीक्षक दर्जाच्या काही अधिकाऱ्यांचा समावेश आहे. अकोला पोलिस दलातील पोलिस निरीक्षक भीमराव घाडगे यांनी परमबीर सिंह यांच्याविरुद्ध भ्रष्टाचाराचे आरोप करून त्यांची खुली चौकशी करण्याची विनंती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली होती. हा गुन्हा ठाणे शहरात घडल्याने त्याचा तपास नंतर ठाणे पोलिसांकडे वर्ग करण्यात आला होता. त्यानंतर परमबीर सिंह यांच्यावर मुंबईसह ठाण्यात खंडणीच्या गुन्ह्यांची नोंद झाली होती. त्यांच्यासह इतर पोलिसांवरही खंडणीसह भ्रष्टाचार केल्याचा आरोप आहे. परमबीर सिंह यांच्यासह इतर पोलिसांवर मुंबईसह ठाणे आणि लाचलुचपत प्रतिबंधक विभागात वेगवेगळे गुन्हे दाखल असून या सर्व गुन्ह्यांची चौकशी सुरू आहे. या सर्व गुन्ह्यांची पोलिस महासंचालक संजय पांडे यांनी गंभीर दखल घेत संबंधित पोलिसांवर निलंबनाची शिफारस करण्याची विनंती गृहविभागाकडे केली आहे. त्यावर या पोलिस अधिकाऱ्यांची खंडणीसह भ्रष्टाचाराच्या गुन्ह्यांत नेमकी काय भूमिका होती,त्यांचा कुठपर्यंत सहभाग होता याबाबतची माहिती गृह विभागाने मागविली आहे. त्यानुसार त्यांच्यावर कारवाई केली जाण्याची शक्यता आहे. त्यामुळे या पोलिस अधिकाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

संबंधित पोस्ट

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवात ‘पद्मश्री’प्रमाणे ४ जणांना ‘हिंदु राष्ट्ररत्न’ व २० जणांना ‘सनातन धर्मश्री’ पुरस्कार *हिंदु राष्ट्ररत्न-आचार्य गणेश्वर शास्त्री द्रविड, डॉ. सच्चिदानंद शेवडे;- सनातन धर्मश्री : आमदार टी. राजा सिंह, अधिवक्ता विष्णु जैन, प्रमोद मुतालिक..

गुणरत्न सदावर्ते हाजीर हो!!! शिक्षा की सुटका.. लवकरच निर्णय….

जिल्हा नियोजनच्या निधीचा विनियोग दर्जेदार कामासाठी करावाशाळा, अंगणवाडीच्या दुरुस्तीला प्राधान्याने निधी देणार-पालकमंत्री दिलीप वळसे पाटील

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सरकारचा मोठा निर्णय, सचिवांना दिलेले विशेष अधिकार पुन्हा मंत्र्यांकड…

vishwatmaklokswamivarta

हिंदू, टी सिरीज कंपनीचे मालक,गुलशन कुमार हत्या प्रकरण,अब्दुल रौफ दाऊद मर्चंटची जन्मठेपेची शिक्षा कायम.

vishwatmaklokswamivarta

प्रशासनाने नागरिकांच्या समस्यांचे तत्परतेने निवारण करावे- पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे