vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देशातच..? गृहविभागाला मात्र ठावठिकाणी नाही

 माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंग देशातच..? गृहविभागाला मात्र ठावठिकाणी नाही

मुंबईची प्रतिनिधी : अँटिलिया स्फोटक प्रकरण  आणि मनसुख हिरेन  हत्या प्रकरणात एनआए  तपास करत आहे. याप्रकरणात चौकशीसाठी एनआयएने मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह  यांना अनेकेवळा समन्स पाठवला आहे. पण आजपर्यंत एकही समन्स परमबीर सिंह यांना डिलिव्हर झालेलं नाही. त्यामुळे अटकेच्या भीतीने परमबीर सिंह परदेशात गेल्याची चर्चा सुरु आहे.

पण परमबीर सिंह देशातच असण्याची शक्यता असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली आहे. परमबीर सिंग यांच्या विरुद्ध ठाणे पोलिसांनी (Thane Police) लूक आऊट नोटीस जारी केली आहे. त्यामुळे विमानतळावरुन परमबीर सिंग बाहेर जाऊ शकत नीत, त्यांना विमानतळावर अडवलं जाऊ शकतं, असं सूत्रांचं म्हणणं आहे. परमबीर सिंग यांच्या रजेचा कालावधी संपला आहे, पण रजेचा कालावधी वाढवण्याबाबत मात्र त्यांनी अर्ज केलेला नाही. त्यामुळे परमबीर सिंग नेमके कुठे आहेत याबाबत संभ्रम कायम आहे.

गृहमंत्री दिलीप-वळसे पाटील  यांनी परमबीर सिंग यांचा शोध सुरु असल्याचं म्हटलं आहे. सरकारी अधिकारी असल्यामुळे परदेशात जायच्या आधी सरकारची परवानगी घेणे बंधनकारक आहे, जर ते गेले असले तरी ती चांगली गोष्ट नाही. मंत्री असो कुणीही अधिकारी असो वा मुख्यमंत्री असो त्यांना केंद्र सरकारची परवानगी घेतल्याशिवाय बाहेर जाण्यास परवानगी नाही, असं गृहमंत्र्यांनी म्हटलं आहे.

राज्य सरकारची सावध भूमिका

परमबीर सिंग यांच्याबाबत राज्य सरकारने सावध भूमिका घेतली आहे. राज्य सरकार सर्व कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्यानंतर निलंबनाची कारवाई सुरू करणार असल्याची माहिती आहे. परमवीर सिंग प्रकरणी एकीकडे चांदीवल आयोगाची प्रक्रिया सुरू आहे, तर दुसरीकडे त्यांनी अर्ज केलेली रजा संपून 30 दिवस पूर्ण झाले आहेत, पण त्यानंतरही परमबीर सिंग यांनी मेडिकल सर्टिफिकेट दिलेलं नाही. त्यामुळे परमवीर सिंग यांना मेडिकल बोर्ड समोर हजर राहावे लागण्याची शक्यता आहे. एकूणच सर्व कायदेशीर बाबी तपासून नंतर सरकार निलंबनाची प्रक्रिया करणार असल्याची माहिती गृहविभागातील सूत्रांनी दिली आहे.

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरील ठराव बहुमताने मंजूर होईल- देवेंद्र फडणवीस

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्राला प्रगतीच्या शिखरावर नेणाऱ्या योजनांना गती द्यावी – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निर्देश मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या अध्यक्षतेखाली शंभर दिवसांच्या कार्यक्रमातील प्रलंबित विषयांचा आढावा

vishwatmaklokswamivarta

प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचा १२ जानेवारी रोजी महाराष्ट्र दौरा; नाशिक येथे २७ व्या राष्ट्रीय युवा महोत्सवाचे होणार उद्घाटन

vishwatmaklokswamivarta

पंतप्रधान नरेंद्र मोदी दिल्लीतील राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या आरएसएस शताब्दी समारंभात प्रमुख पाहुणे म्हणून …

मुंबई महापालिकेची पर्यावरणपूरक विजेकडे वाटचाल…

vishwatmaklokswamivarta

प्रवेश नियामक प्राधिकरणाच्या ऑनलाईन पुनर्विलोकन अर्ज प्रणालीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते उद्घाटन

vishwatmaklokswamivarta