vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ला उत्स्फूर्त प्रतिसाद

 

नवी मुंबई, प्रतिनिधी : महाराष्ट्र शासनाच्या उद्योग विभागांतर्गत महाराष्ट्र स्मॉल स्केल इंडस्ट्रीज डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन (MSSIDC) मार्फत जागतिक बँक व केंद्र शासनाच्या सहकार्याने राबविण्यात येणाऱ्या RAMP कार्यक्रमांतर्गत आयोजित “महाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६” हा भव्य कार्यक्रम आज सीआयडीसीओ एक्झिबिशन अँड कन्व्हेन्शन सेंटर, वाशी, नवी मुंबई येथे उत्साहपूर्ण वातावरणात यशस्वीरित्या संपन्न झाला.

संकल्पातून सिद्धीकडे – From Resolution to Accomplishment” या संकल्पनेवर आधारित या परिषदेला राज्यभरातून २,५०० हून अधिक सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग (MSME) उद्योजक, निर्यातदार, स्टार्टअप्स, हस्तकला कारागीर, उद्योग संघटना, वित्तीय संस्था, तंत्रज्ञान क्षेत्रातील प्रतिनिधी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

कार्यक्रमास महाराष्ट्र राज्याचे उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांची प्रमुख उपस्थिती लाभली. यावेळी महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाचे उपाध्यक्ष जयदीप कवाडे, प्रधान सचिव (उद्योग) डॉ. पी. अन्बलगन, विकास आयुक्त (उद्योग) डॉ. कादंबरी बलकवडे, सह-मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. कुणाल खेमनार तसेच MSSIDCचे व्यवस्थापकीय संचालक विकास पानसरे यांच्यासह उद्योग क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.जागतिक MSME दिनाचे औचित्य साधून आयोजित करण्यात आलेल्या या परिषदेत महाराष्ट्रातील विविध जिल्ह्यांतील ४२ MSMEs, GI टॅग उत्पादने, पारंपरिक हस्तकला कारागीर आणि उद्योग सहाय्यक सेवा प्रदाते यांनी सहभाग घेतला. या प्रदर्शनातून स्थानिक उत्पादनांना बाजारपेठ विस्तार, ब्रँडिंग आणि व्यवसाय वृद्धीच्या नव्या संधी उपलब्ध झाल्या.

राष्ट्रीय संस्थांसोबत सामंजस्य करार,परिषदेदरम्यान महाराष्ट्र लघु उद्योग विकास महामंडळाने Pension Fund Regulatory and Development Authority (PFRDA), National Small Industries Corporation (NSIC), National Test House (NTH) आणि Export Promotion Council for Handicrafts (EPCH) यांच्यासोबत सामंजस्य करार (MoU) केले. या करारांमुळे राज्यातील MSMEs ना विपणन सुविधा, तंत्रज्ञान उन्नतीकरण, गुणवत्ता चाचणी व प्रमाणन, निर्यात प्रोत्साहन, बाजारपेठ उपलब्धता, कौशल्य विकास आणि क्षमता वृद्धी यांसारख्या सेवांचा लाभ मिळणार आहे. तसेच महाराष्ट्रातील हस्तकला कारागीर व उद्योजकांसाठी राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय बाजारपेठांचे नवे दरवाजे खुलणार आहेत.

महाराष्ट्राच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचे दर्शन घडवणारा पैठणी, नारायणपेठ आणि करवती काठ साड्या, गोधडी तसेच विविध हस्तकला व One District One Product (ODOP) उत्पादनांचा विशेष रॅम्प वॉक कार्यक्रमाचे प्रमुख आकर्षण ठरला. या माध्यमातून महाराष्ट्राच्या पारंपरिक कौशल्यांना आणि स्थानिक उत्पादनांना राष्ट्रीय स्तरावर प्रभावी व्यासपीठ मिळाले

चार महत्त्वपूर्ण परिसंवादांचे आयोजनपरिषदेत उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञांच्या सहभागातून खालील विषयांवर परिसंवाद आयोजित करण्यात आले :* एमएसएमई निर्यातीसाठी वित्तीय सुविधा व व्यापार सुलभीकरण* जागतिक विस्तार, मुक्त व्यापार करार (FTA) आणि एमएसएमई विकास* महिला उद्योजकांसाठी जागतिक व्यवसाय संधी* डिजिटल व कृत्रिम बुद्धिमत्ता (AI) आधारित एमएसएमई परिवर्तनGoogle, Microsoft, Jio, Amazon आणि इतर अग्रगण्य संस्थांच्या तज्ज्ञांनी डिजिटल तंत्रज्ञान, कृत्रिम बुद्धिमत्ता, क्लाउड सोल्यूशन्स आणि जागतिक स्पर्धात्मकतेबाबत मार्गदर्शन केले.

महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदानराज्यातील उत्कृष्ट उद्योजक, निर्यातदार आणि हस्तकला कारागिरांच्या उल्लेखनीय कार्याचा गौरव करण्यासाठी महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ प्रदान करण्यात आले.

राज्य हस्तकला उत्कृष्टता, हस्तकला MSME, NextGen MSME, डिजिटल व AI MSME, सेवा क्षेत्र MSME, उत्पादन क्षेत्र MSME, हरित MSME, महिला MSME, निर्यात MSME आणि Champion MSME अशा विविध श्रेणींमध्ये पुरस्कार प्रदान करण्यात आले.

RAMP कार्यक्रमांतर्गत राबविण्यात येणाऱ्या फ्लॅटेड फॅक्टरी भाडे अनुदान योजनेअंतर्गत पात्र ठरलेल्या चार MSME उद्योजकांना प्रत्येकी ₹३०,००० पर्यंतच्या अनुदानाचे धनादेश उद्योग मंत्र्यांच्या हस्ते वितरित करण्यात आले.

या प्रसंगी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी पाठविलेल्या संदेशात महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ चे सर्व पुरस्कार विजेते उद्योजक, निर्यातदार, महिला उद्योजिका आणि हस्तकला कारागिरांचे अभिनंदन केले. आपल्या संदेशात त्यांनी नमूद केले की, “महाराष्ट्रातील सूक्ष्म, लघु व मध्यम उद्योग क्षेत्र हे राज्याच्या आर्थिक विकासाचे, रोजगारनिर्मितीचे प्रमुख केंद्र आहे. पुरस्कार विजेत्यांनी केलेली उल्लेखनीय कामगिरी राज्यातील नव्या उद्योजकांसाठी प्रेरणादायी असून महाराष्ट्राला उद्योग, निर्यात आणि आत्मनिर्भरतेच्या दिशेने अधिक सक्षम करण्यासाठी त्यांचे योगदान महत्त्वपूर्ण आहे.”

मार्गदर्शन करताना उद्योग मंत्री डॉ. उदय सामंत यांनी सांगितले की, “महाराष्ट्रातील एमएसएमई क्षेत्र हे राज्याच्या औद्योगिक प्रगतीचे आधारस्तंभ आहे. राज्यातील उद्योग अधिक स्पर्धात्मक, तंत्रज्ञानसक्षम आणि निर्यातक्षम करण्यासाठी शासन सातत्याने विविध उपक्रम राबवत आहे. RAMP कार्यक्रम, कौशल्य विकास, डिजिटल परिवर्तन आणि बाजारपेठ उपलब्धता यांसारख्या उपक्रमांमुळे राज्यातील उद्योजकांना नवी ऊर्जा मिळत आहे.” तसेच राज्या मध्ये MSME commissionrate स्थापन करण्याची घोषणा त्यांनी केली.

त्यांनी महाराष्ट्र एमएसएमई पुरस्कार २०२६ अंतर्गत गौरविण्यात आलेल्या सर्व उद्योजक, निर्यातदार आणि हस्तकला कारागिरांचे अभिनंदन करून त्यांच्या कार्यामुळे राज्याच्या आर्थिक विकासाला, रोजगारनिर्मितीला आणि जागतिक स्तरावर महाराष्ट्राची ओळख अधिक बळकट होत असल्याचे नमूद केले.

यावेळी उपस्थित वरिष्ठ अधिकाऱ्यांनीही शासनामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध उद्योग प्रोत्साहन योजनांची माहिती देत उद्योग, तंत्रज्ञान, कौशल्य विकास आणि निर्यात वाढ यांचा समन्वय साधून महाराष्ट्राला देशातील अग्रगण्य औद्योगिक राज्य म्हणून अधिक सक्षम करण्याचा संकल्प व्यक्त केकेलाlमहाराष्ट्र एमएसएमई समिट व पुरस्कार २०२६ ने शासन, उद्योग, वित्तीय संस्था, तंत्रज्ञान क्षेत्र आणि उद्योजक यांना एकाच व्यासपीठावर आणत राज्यातील MSME क्षेत्राच्या सर्वांगीण विकासासाठी नवी दिशा आणि नवी ऊर्जा प्रदान केली.

0000

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र विधान परिषदेच्या १६ स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघांसाठी निवडणुकांची घोषणा. भारतीय निवडणूक आयोगानं जाहीर केलेल्या कार्यक्रमानुसार येत्या १८ जूनला मतदान होणार असून, २२ जूनला मतमोजणी होईल. 

नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रात स्वच्छ व पिण्यायोग्य पाणीपुरवठा…

मिसिंग लिंक प्रकल्पातील बोगद्याचा जगातील सर्वाधिक रुंद बोगदा म्हणून विक्रम मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे गिनिज वर्ल्ड रेकॉर्ड प्रमाणपत्र सुपूर्द

पाकिस्तानी समाज माध्यमांद्वारे चुकीची माहिती पसरवण्याची एक सुनियोजित मोहीम राबविली जात आहे. जाणीवपूर्वक पसरवलेल्या चुकीच्या माहितीला बळी पडू नका. सावधान राहा सतर्क राहा!

उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांना भावपूर्ण श्रद्धांजली

vishwatmaklokswamivarta

चिखलदरा महोत्सवात महिला बचतगट प्रदर्शन, विक्री केंद्र स्थापन करून व्यापकता निर्माण कराव-पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे*सायन्स कोर मैदान येथे विभागीय मिनी सरस वैदर्भीय महोत्सव जिल्हा प्रदर्शन व विक्री – 2026