vishwatmaklokswamivarta
Breaking News
आरोग्य

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत 85% इतके उल्लेखनीय काम महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस29 जूनपासून घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना करणार लसीकरण

राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेत 85% इतके उल्लेखनीय काम महापौर आणि आयुक्त यांनी बालकांना पाजले पोलिओ डोस29 जूनपासून घरोघरी जाऊन उर्वरित बालकांना करणार लसीकरण

     नवी मुंबई प्रतिनिधी-     नवी मुंबई महानगरपालिका आरोग्य विभागाच्या वतीने दिनांक २८ जून २०२६ रोजी राष्ट्रीय पल्स पोलिओ लसीकरण मोहीम प्रभावीपणे राबविण्यात आली. नवी मुंबई महानगरपालिकेच्या २६ नागरी आरोग्य केंद्रांमार्फत खाजगी वैद्यकीय व्यावसायिकांचे दवाखाने, सोसायटी कार्यालये, रूग्णालये, रेल्वे स्टेशन, बस डेपो, बाजारपेठ, मॉल अशा विविध ठिकाणी ६१५ स्थायी, ७४ ट्रान्झिट व २७ फिरते मोबाईल असे एकूण ७१६ पोलिओ लसीकरण बूथ स्थापन करण्यात आले होते. या प्रत्येक बुथवर पालकांनी आपल्या बालकांसमवेत येऊन बालकांना पोलिओचे डोस पाजले.

          नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील आणि महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांनी कुकशेत नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र या ठिकाणी भेट देऊन काही बालकांना पोलिओ डोस पाजले. यावेळी वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉ राजेश म्हात्रे आणि इतर वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.

          ‘दोन थेंब प्रत्येक वेळी, पोलिओवर विजय दरवेळी’ – या घोषवाक्यास अनुसरून घरोघरी जाऊन नागरी आरोग्य केंद्रांमार्फत पोलिओ लसीकरण मोहीमेची जनजागृती करून पोलिओ लसीकरणाची माहिती पोहचविण्यात आली होती.

           लसीकरण बूथवरील कर्मचारी, स्वयंसेवक यांच्यामार्फत बालकांना पोलिओ लस पाजण्यात आली. नमुंमपा आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आलेल्या सुयोग्य नियोजनामुळे नमुंमपाचे ८५% इतके उल्लेखनीय काम झालेले आहे.

          नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील १०० % लाभार्थींना पल्स पोलिओ लस मिळावी याकरिता दि २९.०६.२०२६ ते ०३.०७.२०२६ या कालावधीत घरोघरी जाऊन पल्स पोलिओ डोस देण्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यानुसार ज्या बालकांना आज रविवारी बूथवर जाऊन डोस घेता आलेला नाही, अशा बालकांसाठी विशेष मोहीम राबविली जात असून यासाठी घरांना भेट देणा-या नमुंमपामार्फत येणाऱ्या स्वयंसेवकांना संपूर्ण सहकार्य करण्याचे आवाहन महापौर श्रीम. सुजाता सुरज पाटील व महापालिका आयुक्त डॉ. कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

विशेष लेख-उष्माघात (Heat Stroke)#उष्माघात 

अमरावती जिल्हा उष्णतेच्या लाटेचा सामना करण्यासाठी सज्ज; ‘इन-क्रिस’ प्रकल्पांतर्गत उपाययोजनांना वेग..

जिल्ह्यातील एचपीव्ही आणि बीसीजी लसीकरणाचे उद्दिष्ट शंभर टक्के पूर्ण करा- जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.

टीबी मुक्त ग्रामपंचायतींना 28 कास्य, 136 रोप्य मानांकनाने सन्मानित  टीबी मुक्त जिल्हा करण्यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहा- जिल्हाधिकारी अशोक शिनगारे..

राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रमांतर्गत मोफत ह्रदय शस्ञक्रियेसाठी 29 बालके मुंबईला रवाना..

हिवताप, डेंग्यू, साथरोग विषयक जाहीर जनजागृती शिबिरांचा नागरिकांनी घेतला लाभ