vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

अति.वाळूज औद्योगिक वसाहत भूसंपादन;जिल्हाधिकाऱ्यांकडे शेतकऱ्यांची बैठक

 

छत्रपती संभाजीनगर प्रतिनिधी-नियोजित अति.वाळूज औद्योगिक वसाहत क्षेत्र भूसंपादनाबाबत आज आरापूर, सुलतानाबाद, गवळी शिवरा ता. गंगापुर येथील शेतकऱ्यांची आज जिल्हाधिकाऱ्यांकडे बैठक झाली. त्यात त्यांनी आपले गाऱ्हाणे मांडले. जिल्हाधिकारी विनय गौडा जी.सी. यांनी शेतकऱ्यांचे म्हणणे ऐकून घेतले.याबाबत शासनाकडे प्रस्ताव पाठवून शेतकऱ्यांच्या मागण्या कळविण्यात येतील, असे त्यांनी आश्वस्त केले.

 जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन सभागृहात नियोजित औद्योगिक वसाहतीकरीता भूसंपादन करावयाच्या जमिन दरांच्या वाटाघाटीबाबत बैठक पार पडली. बैठकीस उपजिल्हाधिकारी (भुसंपादन)एकनाथ बंगाळे, प्रादेशीक अधिकारी महाराष्ट्र औद्योगिक वसाहत अमित भामरे, जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी दीपक गवळी तसेच अन्य अधिकारी व ग्रामस्थ शेतकरी उपस्थित होते.

 नियोजित अति. वाळूज औद्योगिक वसाहतीसाठी आरापुर येथील १७१.८० हेक्टर, सुलतानाबाद येथील १७७.६२ हेक्टर तर गवळी शिवरा येथील ४१२.६१ हेक्टर क्षेत्र असे एकूण ७६२.०३ हेक्टर क्षेत्र संपादीत करावे लागणार आहे. या क्षेत्रावरील शेतकऱ्यांना आज बैठकीसाठी बोलावण्यात आले होते.

 बैठकीत शेतकऱ्यांचा वतीने मांडण्यात आलेले प्रमुख मुद्दे याप्रमाणे होते.भूसंपादन करावयाच्या जमिनीचे मालक हे सर्वच शेतकरी आहेत. ते सध्या शेतीच करीत आहेत. त्यांची उत्पन्नाची जमिन जात असल्याने त्यांना जमिनीच्या बदल्यात जमिन आणि तिही लगतच्या क्षेत्रातच घेता यावी, इतका मोबदला मिळावा. बहुतेक शेतकरी हे शेतातच घर करुन राहतात. त्यांना घराचा स्वतंत्र मोबदला व निवासासाठी स्वतंत्र भूखंड मिळावा. येणाऱ्या उद्योगांमध्ये तसेच त्यासाठी होणाऱ्या विकास कामांमध्ये स्थानिकांना समाविष्ट करण्यात यावे. शेतकऱ्यांच्या मान्यतेशिवाय दर निर्धारण करण्यात येऊ नये असे मुद्दे शेतकऱ्यांनी मांडले.

 जिल्हाधिकारी गौडा यांनी शेतकऱ्यांना आधारभूत कमाल दराची माहिती दिली. निवासासाठी स्वतंत्र भूखंड दिले जातील. जमिन मालकांना अधिकाधिक वाजवी दर मिळावा यासाठीच या वाटाघाटी होत आहेत. वाढीव मागणी बद्दल शासनास कळविण्यात येईल व त्यामान्यतेनंतरच पुढील वाटाघाटी होतील,असेही त्यांनी सांगितले. प्रादे. अधिकारी भामरे यांनी एमआयडीसी स्थापनेनंतर होणाऱ्या लाभांची माहिती दिली.

०००००

संबंधित पोस्ट

श्री विले पार्ले केळवणी मंडळाच्या दोन नवीन इमारतींचे उद्घाटन आणि नवीन शैक्षणिक संकुलाचे भूमिपूजन मानव संसाधन विकास हीच खरी गुंतवणूक – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

एमएमआरडीएचा ४० हजार १८७ कोटींचा अर्थसंकल्प एक ट्रिलियन डॉलर अर्थव्यवस्थेच्या दिशेने महत्त्वपूर्ण पाऊल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुंबई महानगराच्या कायापालटास गती येणार

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

सुरक्षा मंत्रालायची पत्रकार परिषद,कमोडोर रघु आर नायर, विंग कमांडर व्योमिका सिंग आणि कर्नल सोफिया कुरेशी यांची भारत-पाकिस्तान संघर्षविराम करारानंतर पत्रकार परिषद 

vishwatmaklokswamivarta

राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पार्टीचे आमदार नेते: रोहित पवार तातडीने दादर कबुतरखान्यात जैनधर्मीयांच्या भेटीला, म्हणाले, ‘धार्मिक आंदोलनात भावनिक बाजू समजून घेतली पाहिजे’

शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढवण्यासाठी सक्षम – मंत्री जयकुमार रावल

vishwatmaklokswamivarta