vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

30 वर्षापेक्षा जुन्या इमारतींचे स्ट्रक्चरल ऑडिट करून घेण्याचे आवाहन

 

      नवी मुंबई प्रतिनिधी-   नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामधील धोकादायक इमारतीचे सन 2024-25 या वर्षासाठी सर्वेक्षण करण्यात आले आहे. सर्वेक्षणानंतर एकूण 513 इमारती महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 264 पोटकलम (1) (2) (3) (4) अन्वये धोकादायक इमारती म्हणून घोषित करण्यात आलेल्या आहेत.

          महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 265(अ) नुसार ज्या इमारतींचा वापर सुरू होऊन 30 वर्षापेक्षा अधिक काळ लोटला आहे, अशा इमारतींचे नवी मुंबई महानगरपालिकेकडे नोंदणी केलेल्या बांधकाम अभियंत्याकडून किंवा संरचना अभियंत्याकडून संरचना परीक्षण (Structural Audit) करून घेणे अनिवार्य आहे.

          30 वर्षापेक्षा जास्त काळ इमारतीचा वापर हा इमारतीस भोगवटा प्रमाणपत्र (पूर्ण अथवा अंशत:) क्षेत्रफळ वापराखाली आणले गेले अशा दिवसापासून मोजवयाचा आहे. नेमलेल्या संरचना अभियंत्याने शिफारस केलेली दुरूस्तीची कामे पूर्ण झाल्याचे व ते बांधकाम सुस्थितीत असल्याचे प्रमाणपत्र नवी मुंबई महानगरपालिकेकडे सादर करावयाचे आहे.

          या प्रकारे संरचना परीक्षण करण्याचे उत्तरदायित्व जी संस्था / मालक / भोगवटादार पार पाडण्यास टाळाटाळ करतील त्यांना रूपये 25,000/- अथवा सदर मिळकतीच्या वार्षिक मालमत्ता कराची रक्कम यातील जी जास्त असेल तितक्या रक्कमेचा दंड ठोठविण्याची तरतूद महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम कलम 398 (अ) खाली अंतर्भूत करण्यात आली आहे.

          नवी मुंबई महानगरपालिकेने संरचनात्मक परीक्षक (स्ट्रक्चरल इंजिनियर) यांची यादी नवी मुंबई महानगरपालिकेच्या www.nmmc.gov.in संकेतस्थळावर (website) उपलब्ध करून दिलेली आहे.

          30 वर्षापेक्षा जास्त काळ झालेल्या इमारतीचे संरचनात्मक परीक्षण दिनांक 31 मार्च 2026 पूर्वी पूर्ण करून त्याबाबतचा अहवाल संबधित विभागाचे सहाय्यक आयुक्त तथा विभाग अधिकारी किंवा सहाय्यक संचालक नगररचना, नवी मुंबई महानगरपालिका यांचेकडे सादर करावयाचा आहे.

          धोकादायक झालेल्या इमारतींचा / घरांचा वापर करणे हे संकट ओढवून घेण्यासारखे आहे. त्यामुळे जिवीत व वित्त हानी होऊ शकते. म्हणूनच नागरिकांनी धोकादायक इमारतींचा / घराचा रहिवास / वापर तात्काळ थांबविण्यात यावा असे आवाहन करण्यात येत आहे. अन्यथा दुर्दैवी अपघात घडल्यास त्याची सर्वस्वी जबाबदारी संबधितांची राहील याची नोंद घेण्यात यावी असे नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने सूचित करण्यात येत आहे.

00000

संबंधित पोस्ट

नांदेड जिल्ह्यातील ‘मथुरा-लभान’ गोवंश : महाराष्ट्राचा अभिमानडॉ. पंडित नांदेडकर यांना राष्ट्रीय स्तरावर तृतीय पारितोषिक

जनगणना प्रक्रियेत प्रत्येक अधिकारी- कर्मच्याऱ्यांनी आपली जबाबदारी अचूकपणे पार पाडावी-जिल्हाधिकारी राहुल कर्डीले जनगणना २०२७ प्रशिक्षण कार्यशाळेस सुरुवात; नागरिकांना स्व-गणनेची सुविधा

भुवनेश्वर येथे पार पडलेल्या ज्युनिअर नॅशनल चॅम्पियनशिपमध्ये ठाण्याच्या साईशा पवारने हर्डल्स शर्यतीत पटकाविले ‘रजत पदक’भारताचे प्रतिनिधित्व करण्याची आणि ऑलिम्पिकमध्ये उत्कृष्ट कामगिरी करण्याची इच्छा-साईशा पवार

vishwatmaklokswamivarta

गुरुवारी(दि.6)जिल्हास्तर युवा महोत्सवाचे आयोजन

vishwatmaklokswamivarta

बृहन्मुंबई महानगरपालिकेतील बदली व सेवा-वाढ नियमांचा भंग- चौकशीची मागणी

vishwatmaklokswamivarta

राज्यमंत्री मेघना साकोरे-बोर्डीकर यांना प्रतिष्ठेचा आंतरराष्ट्रीय पुरस्कार जाहीर अमेरिकेतील ‘आउटस्टँडिंग व्हिजनरी लीडर अँड ट्रू चेंजमेकर’ पुरस्कार