vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

अमृततर्फे संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा (पूर्व) परीक्षा-2026पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी अर्थसहाय्य…

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी- महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत) संस्थे तर्फे राज्यातील खुल्या प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील, अमृतच्या लक्षित गटातील (ब्राह्मण, कायस्थ, कोमटी, मारवाडी, पाटील, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, वैश्य, नायर, नायडू, कम्मा, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुंथर, गुजराती, जाट, हिंदू नेपाळी, भूमिहार, लोहारणा, कानबी, इत्यादी) उमेदवारांना संघ लोकसेवा आयोगाच्या (UPSC) नागरी सेवा मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी उत्तीर्ण उमेदवारांना प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य (सन 2026-27) योजना राबविण्यात येत आहे. या योजनेंतर्गत पात्र उमेदवारांना मुख्य परीक्षेच्या पूर्वतयारीसाठी रु. 50 हजार व मुलाखतीच्या पूर्वतयारीसाठी रु. 25 हजार फक्त) इतके प्रोत्साहनात्मक अर्थसहाय्य देण्यात येणार आहे.

या योजनेविषयी भविष्यातील सर्व माहिती/सूचना केवळ अमृतच्या संकेतस्थळावरच प्रसिद्ध करण्यात येतील. योजनेच्या अधिक माहितीसाठी व ऑनलाईन अर्ज भरण्यासंबंधी काही शंका असल्यास संबंधित जिल्हा अमृत कार्यालय रायगड जिल्हाधिकारी कार्यालय ( भूसंपादन) उपजिल्हाधिकारी कार्यालयाचा बाजूला,हिराकोट तलाव समोर,अलिबाग येथे अथवा 9112228759 या क्रमांकावर संपर्क साधावा.

सन 2026-27 मध्ये (UPSC) नागरी सेवा पूर्व परीक्षा-2026 उत्तीर्ण झालेल्या आणि आर्थिक सहाय्याचा लाभ घेण्यास इच्छुक असलेल्या उमेदवारांकडून ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत असून इच्छुक उमेदवारांनी mahaamrut.org.in/amrut-new/login या संकेतस्थळावर ऑनलाईन पद्धतीने अर्ज करावा. या योजनेसाठी ऑनलाईन/संकेतस्थळावर अर्ज सादर करण्याचा अंतिम दि.17 जुलै 2026 आहे. पात्र विद्यार्थ्यानी या योजनेचा लाभ घ्यावा असे आवाहन अमृत रायगड जिल्हा कार्यालय शैलेश मराठे यांनी केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

दिल्ली–सोनीपत विभागावर देशातील पहिल्या हायड्रोजन रेल्वेची यशस्वी चाचणी ..

लातूर जिल्हा-तावरजा धरणाच्या पाणलोट क्षेत्रातील येणारा येवा लक्षात घेऊन पाणी पातळी नियंत्रित करण्याचे दृष्टीने

vishwatmaklokswamivarta

जागतिक काविळ दिनानिमित्त रॅली उत्साहात साजरी

मुंबईतील धारावीत महिलेवर गोळीबार..

मोतीगव्हाण येथील राष्ट्रवादी (अजित पवार गट) मधून अनेक युवकांचा भाजपामध्ये जाहीर प्रवेशविश्वास दिलात तर विकास हमखास – रावसाहेब पाटील दानवे विकास कामे केली म्हणूनच जनता आमच्यासोबत – आ. बबनराव लोणीकर

vishwatmaklokswamivarta

गडचिरोलीत ‘ट्रॅक्टर टेक’ कौशल्य विकास कार्यक्रम सुरू होणार – महिंद्रा अँड महिंद्रा व राज्य शासनाचा सामंजस्य करार*

vishwatmaklokswamivarta