vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा येथील आदिवासी शासकीय वसतीगृहात प्रवेश प्रक्रिया सुरू,पात्र विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज करण्याचे आवाहन

बुलढाणा, प्रतिनिधी): शैक्षणिक सत्र २०२६-२७ साठी बुलढाणा येथील आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृहातील प्रवेश प्रक्रिया सुरू झाली असून, रिक्त जागांवर मागील शैक्षणिक वर्षातील गुणवत्तेनुसार विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येणार आहे. पात्र विद्यार्थ्यांनी विहित मुदतीत ऑनलाइन अर्ज www//swayam.mahaonlina.gov.in या वेबसाईडवर परीपुर्ण माहिती भरुन आवश्यक कागदपत्रांसह वसतीगृहात अर्ज जमा करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

इयत्ता ११ वी व १२ वी, डिप्लोमा, पदवी, पदव्युत्तर पदवी तसेच विविध व्यावसायिक अभ्यासक्रमांसाठी शिक्षण घेणाऱ्या पात्र विद्यार्थ्यांना या प्रवेश प्रक्रियेत सहभागी होता येणार आहे. प्रवेशासाठी विद्यार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज भरल्यानंतर आवश्यक कागदपत्रांसह अर्ज संबंधित वसतीगृहात कार्यालयीन वेळेत जमा करणे आवश्यक आहे.

अर्जासोबत जोडावयाची आवश्यक कागदपत्रे : शाळा सोडल्याचा दाखला, इयत्ता १० वीची गुणपत्रिका (लागू असल्यास), सन २०२६-२७ चा उत्पन्नाचा दाखला, जातीचा दाखला, मागील वर्षाची गुणपत्रिका, शासकीय रुग्णालयाचे वैद्यकीय प्रमाणपत्र, आधार कार्ड, विद्यार्थ्याच्या नावाचे बँक पासबुक, तीन पासपोर्ट आकाराचे छायाचित्र, सर्व कागदपत्रे सादर करणे अनिवार्य असून, अपूर्ण अर्जांचा विचार केला जाणार नाही.प्रवेशासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी आपला अर्ज आदिवासी मुलींचे शासकीय वसतीगृह, बुलढाणा, जि. बुलढाणा येथे कार्यालयीन वेळेत जमा करावेत, असे आवाहन वसतीगृह प्रशासनाने केले आहे.

000000

संबंधित पोस्ट

सातारा जिल्हा पोलीस क्रेडिट को-ऑप. सोसायटीतर्फे भव्य विनामूल्य आरोग्य तपासणी शिबिर संपन्न

जिल्ह्यात 2 ते 4 जुलैदरम्यान अतिमुसळधार पावसाची शक्यता नागरिकांनी सतर्क राहण्याचे आवाहन

मानसिक आरोग्य फिटनेस, मन, शरीर आणि आत्म्याचे शारीरिक आरोग्य फिटनेस प्रदान करणे हे योगाचे उद्दिष्ट आहे – प्रा. मोहन नेहरे.

सुरक्षित शहरांसाठी सीसीटीव्हीचे प्रभावी सुरक्षा कवच निर्माण करण्यात यावे- मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस • सीसीटीव्ही यंत्रणेच्या सनियंत्रणासाठी महामंडळाची निर्मिती करा• माहिती व तंत्रज्ञान विभागाची आढावा बैठक

100 दिवसांच्या कृती आराखडा अंतर्गत नवी मुंबई महानगरपालिकेत 1.50 लाखाहून अधिक संचिकांचे वर्गीकरण**कार्यालयीन स्वच्छता व सुयोग्य अभिलेख जतन पध्दतीवर भर*

ओबीसी आर्थिक विकास महामंडळाच्या विविध योजनांसाठी पुरेसा निधी उपलब्ध-मंत्री अतुल सावे