vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

क्षेत्रपाल धनगरवाडीतील 26 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य दरड कोसळल्यानंतर तातडीची कार्यवाही; वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू

क्षेत्रपाल धनगरवाडीतील 26 नागरिकांचे सुरक्षित स्थलांतर; प्रशासनाकडून युद्धपातळीवर मदतकार्य दरड कोसळल्यानंतर तातडीची कार्यवाही; वीजपुरवठा पूर्ववत करण्याचे काम सुरू

 

रायगड-अलिबाग, प्रतिनिधी- अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर क्षेत्रपाल धनगरवाडी परिसरात दरड कोसळण्याची घटना घडल्यानंतर जिल्हा प्रशासनाने तातडीने मदत व बचावकार्य हाती घेतले. संभाव्य धोका लक्षात घेऊन येथील ९ महिला आणि १७ पुरुष अशा एकूण २६ नागरिकांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर करण्यात आले आहे. स्थलांतरित नागरिकांची राहण्याची व आवश्यक सोयी-सुविधांची व्यवस्था क्षेत्रपाल धनगरवाडी येथे करण्यात आली असून, त्यांच्या सुरक्षिततेसाठी प्रशासनाकडून आवश्यक ती सर्व खबरदारी घेतली जात आहे.

ही घटना दि. 6 जुलै 2026 रोजी पहाटे सुमारे 4.30 वाजण्याच्या सुमारास घडली. परिसरात अंदाजे 800 मीटर क्षेत्रात दरड कोसळल्याची माहिती मिळताच महसूल विभागासह संबंधित सर्व यंत्रणा घटनास्थळी दाखल झाल्या. मदत व बचावकार्याला तातडीने सुरुवात करण्यात आली.

या घटनेत जखमी झालेल्या नागरिकांना तातडीने वैद्यकीय मदत उपलब्ध करून देण्यात आली. प्रशासनाने घटनास्थळाची पाहणी करून परिसरातील नागरिकांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत संभाव्य धोक्याच्या क्षेत्रातील कुटुंबांचे सुरक्षितस्थळी स्थलांतर केले.

मदत व बचावकार्यामध्ये महसूल यंत्रणा, पोलीस विभाग, सार्वजनिक बांधकाम विभाग (जिल्हा परिषद), विद्युत विभाग, जव्हार रेस्क्यू टीम तसेच एनडीआरएफ यांच्यासह संबंधित विभागांचे पथक सहभागी झाले आहे. गावातील नागरिकांच्या मदतीसाठी एनडीआरएफ व इतर यंत्रणा आवश्यक साधनसामग्रीसह सज्ज ठेवण्यात आल्या आहेत.

घटनास्थळी काही ठिकाणी जमिनीला व डोंगरभागाला भेगा पडल्याचे निदर्शनास आले आहे. त्यामुळे संबंधित भागावर प्रशासनाकडून बारकाईने लक्ष ठेवण्यात येत आहे. संभाव्य धोका लक्षात घेऊन नागरिकांना धोकादायक परिसरात न जाण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.

दरड कोसळल्यामुळे बाधित झालेला परिसर सुरक्षित करण्याचे काम सुरू असून, वीजपुरवठा पूर्ववत करण्यासाठी विद्युत विभागाकडून तातडीने कार्यवाही करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी दरड व माती हटविण्याचे कामही हाती घेण्यात आले आहे. पावसाचे पाणी ओसरल्यानंतर परिस्थितीचा आढावा घेऊन पुढील कार्यवाही करण्यात येत आहे.

सुरक्षितस्थळी हलविण्यात आलेल्या नागरिकांमध्ये ज्येष्ठ नागरिक, महिला, युवक आणि लहान मुलांचा समावेश आहे. प्रशासनाकडून स्थलांतरित नागरिकांच्या निवास, भोजन, पिण्याचे पाणी, आरोग्य तपासणी आणि अन्य मूलभूत गरजांची व्यवस्था करण्यात येत आहे.

जिल्हा प्रशासनाने सर्व संबंधित यंत्रणांना सतर्क राहण्याचे निर्देश दिले असून, परिस्थितीवर सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. अतिवृष्टीच्या काळात डोंगर उतार, दरडप्रवण भाग आणि भेगा पडलेल्या परिसरापासून दूर राहावे तसेच प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन नागरिकांना करण्यात आले आहे.

0000

संबंधित पोस्ट

पालकमंत्री पंकजा मुंडे यांचा जालना जिल्हा दौरा कार्यक्रम  

संस्कृती, प्रेम, शांती व सद्भावना राज्य अभियानाचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन समाजात प्रेम, शांतता व सद्भावना निर्माण करण्याचे ब्रह्मकुमारींचे कार्य प्रशंसनीय- राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन

vishwatmaklokswamivarta

छत्रपती ताराराणींचा आदर्श ठेवून रणरागिणी बनण्यास तयार व्हा _१ हजारपेक्षा अधिक युवतींना विनामूल्य प्रशिक्षण !_*युवतींना सुरक्षित आणि स्वावलंबी बनवण्यासाठी ७ डिसेंबरला कोल्हापूर येथे ‘शौर्य जागृती प्रशिक्षण शिबिर’ !*

vishwatmaklokswamivarta

आताची मोठी बातमी -बीड जिल्ह्याचे चे सरपंच संतोष देशमुख आणि सोमनाथ सूर्यवंशी हत्याप्रकरणी पैठणमध्ये आक्रोश मोर्चा चे आयोजन

पुण्यातील मालधक्का चौकातील जागेबाबत प्रस्ताव सादर करावा – उपसभापती डॉ. नीलम गोऱ्हे

vishwatmaklokswamivarta

महिला बचत गटांच्या उत्पादनांचे सांगलीत २८ मार्चपासून तीन दिवसीय प्रदर्शन