vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य विकास काळाची गरज’  वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जागतिक युवा कौशल्य दिनानिमित्त ‘कौशल्य विकास काळाची गरज’

वक्तृत्व स्पर्धेला युवक-युवतींचा उत्स्फूर्त प्रतिसाद

जालना, प्रतिनिधी : जागतिक युवा कौशल्य दिन (15 जुलै) निमित्त जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना आणि विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर यांच्या संयुक्त विद्यमाने ‘कौशल्य विकास काळाची गरज’ या विषयावर वक्तृत्व स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. या स्पर्धेला महाविद्यालयातील युवक-युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत कौशल्य विकासाचे महत्त्व प्रभावीपणे मांडले.

स्पर्धेदरम्यान विद्यार्थ्यांनी आजच्या स्पर्धात्मक युगात केवळ पदवी प्राप्त करून चालत नसून त्यासोबत विविध कौशल्ये आत्मसात करणे अत्यावश्यक असल्याचे प्रतिपादन केले. कौशल्याच्या बळावर स्वतःची स्वतंत्र ओळख निर्माण करता येते, रोजगाराच्या संधी वाढतात तसेच स्वयंरोजगार व उद्योजकतेचे नवे मार्ग खुलतात, असे विचार विद्यार्थ्यांनी आपल्या भाषणातून व्यक्त केले.

हा कार्यक्रम सहाय्यक आयुक्त गणेश चिमणकर यांच्या मार्गदर्शनाखाली पार पडला. यावेळी कनिष्ठ कौशल्य विकास अधिकारी दत्ता जाधव यांनी समावेशक, शांततापूर्ण आणि शाश्वत सामाजिक विकासासाठी आजच्या तरुणांनी आधुनिक काळाच्या गरजेनुसार विविध कौशल्ये आत्मसात करणे आवश्यक असल्याचे सांगितले. कौशल्यसंपन्न युवकच भविष्यात देशाच्या प्रगतीत महत्त्वाची भूमिका बजावू शकतात, असेही त्यांनी नमूद केले.

कार्यक्रमात समुपदेशक डॉ. अमोल परिहार यांनी कौशल्य विकास विभागामार्फत राबविण्यात येणाऱ्या विविध योजना, प्रशिक्षण कार्यक्रम, रोजगाराच्या संधी आणि शासनाच्या उपक्रमांची सविस्तर माहिती विद्यार्थ्यांना दिली. विद्यार्थ्यांनी या योजनांचा लाभ घेऊन स्वतःच्या करिअरची भक्कम पायाभरणी करावी, असे आवाहन त्यांनी केले.

यावेळी व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीचे प्राचार्य डॉ. एच. डी. जेडगे यांनी विद्यार्थ्यांनी नियमित शिक्षणाबरोबरच उद्योगजगताच्या गरजेनुसार कौशल्ये विकसित केल्यास रोजगाराच्या संधी अधिक व्यापक होतील, असे मत व्यक्त केले. बदलत्या तंत्रज्ञानाच्या युगात कौशल्याधारित शिक्षणाला विशेष महत्त्व प्राप्त झाले असल्याचेही त्यांनी सांगितले.

कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्रा. शुभम मोहिते यांनी केले, तर उपप्राचार्य प्रा. गुलशन राठी यांनी उपस्थितांचे आभार मानले. या उपक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी जिल्हा कौशल्य विकास, रोजगार व उद्योजकता मार्गदर्शन केंद्र तथा मॉडेल करिअर सेंटर, जालना तसेच विंध्याचल शिक्षण संस्थेच्या व्ही. व्ही. एस. इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी, बदनापूर येथील अधिकारी, कर्मचारी व प्राध्यापकांनी विशेष परिश्रम घेतले.

-*-*-*-*-*-*-

संबंधित पोस्ट

पक्षकारांच्या न्यायासाठी नवोदित वकिलांनी सतत अध्ययन करावे -न्यायमूर्ती रेवती मोहिते डेरे जुन्नर येथील जुन्या न्यायालयाच्या इमारतीचा विकास आराखडा तयार करा-उपमुख्यमंत्री अजित पवार

vishwatmaklokswamivarta

गटई कामगारांना पत्र्याचे स्टॉल; पुरवठादारांकडून निविदा मागविल्या

vishwatmaklokswamivarta

पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सावंतवाडी उपविभागीय कार्यालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन संपन्न सावंतवाडी उपविभागीय कार्यालयासाठी ४.३३ कोटींचा निधी

सिंधी विस्थापितांचे पट्टे नियमित करण्याच्या धोरणाबाबत निर्णय लवकरच – महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे

vishwatmaklokswamivarta

मिशन वात्सल्य व मिशन शक्ती अंतर्गत जिल्हास्तरीय बैठक संपन्न

vishwatmaklokswamivarta

वन्यजीव, पर्यावरण रक्षणासाठी कुंडल वन प्रबोधिनीकडून जनजागृती- मध्य प्रदेशातील प्रशिक्षणार्थी अधिकाऱ्यांनी साधला शालेय विद्यार्थ्यांशी संवाद