vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतर

महाराजस्व अभियानात नागरिकांनी विविध योजनाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.सातबारा विलगीकरण करून ६८ सातबारा प्रमाणपत्र वितरण

महाराजस्व अभियानात नागरिकांनी विविध योजनाचा लाभ घ्यावा-जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी.सातबारा विलगीकरण करून ६८ सातबारा प्रमाणपत्र वितरण

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी जिल्ह्यात छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबीर अंतर्गत शासनाच्या विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी आवश्यक कागदपत्रांचे वितरण शिबिराच्या माध्यमातून केले जात आहे . नागरिकांनी या शिबिराचा लाभ घेण्याचे आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा जी. सी यांनी केले.

कांचनवाडी महसूल मंडळाच्या अंतर्गत तिसगाव येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

कार्यक्रमास उपविभागीय अधिकारी व्यंकट राठोड, छत्रपती संभाजी नगरचे तालुक्याचे अपर तहसीलदार उमेश पाटील, तिसगावच्या सरपंच श्रीमती शकुंतला कस्तुरे तसेच विविध योजनांच्या पात्र लाभार्थ्यांची उपस्थिती होती.

महसूल विभागाअंतर्गत मंडळ स्तरावर महाराजस्व शिबिर आयोजित केले जात आहे. यामध्ये शेतकऱ्यांना सातबारा उतारा ,आधार कार्ड दुरुस्ती, प्रलंबित फेरफार निकाली काढण्याबरोबरच वाद नसलेल्या फेरफार नोंदणी, रहिवाशी ,उत्पन्न प्रमाणपत्र, अकर्षक प्रमाणपत्र, जमीन अधिकृत झाल्याचे प्रमाणपत्र, एकत्रित झालेला सातबारा विलगीकरण करून स्वतंत्र सातबारा नोंद,शेतीची मोजणी, घरकुल या संदर्भात असणाऱ्या विविध प्रमाणपत्राचे वितरण केले जात आहे. या शिबिरामध्ये नागरिकांनी जास्तीत जास्त सहभाग घेऊन शासनाच्या विविध विभागाच्या योजनांचा लाभ घ्यावा. तसेच एक मे पासून जनगणनेची सुरुवात होणार असून नागरिकांनी स्वतःही जनगणनेमध्ये सहभाग नोंदवून आपली नोंदणी करण्याबाबतही आवाहन जिल्हाधिकारी विनय गौडा यांनी केले.

छत्रपती संभाजीनगर तालुक्यातील प्रलंबित फेरफार दोन दिवसाच्या आत निकाली काढून याचा अहवाल सादर करण्याचे निर्देश उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांना दिलm गेवराई येथील गावातील स्मशानभूमीचा सातबारा ज्ञानेश्वर मुळे व गावकरी यांना जिल्हाधिकारी विनय गौडा यांच्या हस्ते वितरित केले . द्वारकादास रतन शेलार यांना कृषी यांत्रिकीकरण योजनेअंतर्गत ट्रॅक्टरचे कागदपत्र आणि चावी सुपूर्त केली. शिबिरात एकूण ६६९ लाभार्थ्यांना विविध प्रमाणपत्रांच्या तसेच योजनांचे लाभ वितरित करण्यात आले

मराठवाडा विभागात प्रथमच शेती आणि बिगर शेती सातबारा विलगीकरण

छत्रपती संभाजीनगर तहसील अंतर्गत एकूण ६८ प्लॉट आणि भूखंडाचे वेगळे सातबारा करून लाभार्थ्यांना स्वतंत्र सातबारे वितरित करण्यात आले आहेत. शेती आणि बिगर शेती अशा क्षेत्राचे वेगवेगळे सातबारा वर्गीकरण करून इथून पुढेही एकत्रित सातबारा विलगीकरण करून स्वतंत्र सातबारा निर्गमित करण्याचे नियोजन तहसीलदार उमेश पाटील यांनी सांगितले. स्वतंत्र सातबारा केल्यामुळे सातबारा मधील दुबार नोंदी होण्याचे तसेच गैरप्रकार होण्याचे प्रमाण नियंत्रणात येईल असेही त्यांनी सांगितले.

00000

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय शालेय बॉक्सिंग स्पर्धेचे उद्घाटनमहिला व बालविकास मंत्री कु.आदिती तटकरे यांच्याहस्ते संपन्न

vishwatmaklokswamivarta

महालक्ष्मी सरस २०२६’ प्रदर्शनाचे बीकेसीत शनिवारी उद्घाटन

जिल्हा प्रशासनातील वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत परीक्षा मार्गदर्शन शिबिर व सत्कार सोहळा संपन्न,स्पर्धा परीक्षेची तयारी करताना स्वयंप्रेरणा महत्त्वपूर्ण  -जिल्हाधिकारी आशिष येरेकर

मुंबईचे तापमान ३६.३ अंश

🌞🌹आज चे पंचांग 🌹🌝

vishwatmaklokswamivarta

एमएमआरडीएच्या माध्यमातून ठाणे-कल्याणचा कायापालट – उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे