vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहिती महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी

बाह्ययंत्रणेद्वारे २ हजार ८४३ पदे; अंगणवाडी सेविका व मदतनीस २ लाख २१ हजार ३२८ पदास मंजुरी – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांची माहित महिला व बाल विकास विभागाचा मोठा निर्णय; तब्बल २३ वर्षांनंतर नियमित ८ हजार ६६९ पदांच्या आकृतीबंधास मंजुरी…

मुंबई, प्रतिनिधी: महिला व बाल विकास विभागात तब्बल २३ वर्षांनंतर ८ हजार ६६९ नियमित पदे भरण्यात येणार आहेत. या निर्णयामुळे विभागाच्या सक्षमीकरणाला मोठी चालना मिळणार असल्याची माहिती महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी दिली.

विभागातील एकूण पदांचा आढावा घेण्यात आला. त्यापैकी काही पदे निरसित (रद्द) करून १६५ नव्या पदांची वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे विभागासाठी एकूण ८ हजार ६६९ नियमित पदे मंजूर करण्यात आली आहेत.

याशिवाय, विभागाच्या कामकाजासाठी २ हजार ८४३ पदे बाह्ययंत्रणेमार्फत भरण्यास मान्यता देण्यात आली आहे.

एकात्मिक बाल विकास सेवा (ICDS) योजनेअंतर्गत १ लाख १० हजार ६६४ अंगणवाडी सेविका व १,१०,६६४ अंगणवाडी मदतनीस, अशी एकूण २ लाख २१ हजार ३२८ मानधनाधारित पदे देखील मंजूर करण्यात आली आहेत.

मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की, २३ वर्षांनंतर घेतलेला हा महत्त्वपूर्ण निर्णय विभागाच्या सक्षमीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरणार आहे. यामुळे महिला व बालकल्याण योजनांची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे होईल.

 

०००

 

संबंधित पोस्ट

अनुसूचित जमातीचा सामुहिक विवाह सोहळा आयोजनासाठी स्वंयसेवी संस्थांना प्रस्ताव पाठविण्याचे आवाहन

मुंबई वर्सोवा पोलिसांची बांगलादेशी घुसखोरांविरोधातील सर्वात मोठी कारवाई. शाकुलशहा दर्गा परिसरातून २१ ट्रान्सजेंडर व्यक्तींसह एकूण २५ बांगलादेशी घुसखोरांना अटक…

केंद्रीय राज्यमंत्री यांच्या हस्ते ‘राजमाता महोत्सव’चा शुभारंभ;बचत गटांच्या उत्पादनांना बाजारपेठ मिळण्यासाठी प्रयत्नशिल – ना.प्रतापराव जाधव

शिवजयंतीनिमित्त ‘जय शिवाजी-जय भारत यात्रा’ उत्साहात;मान्यवरांचा सहभाग..

vishwatmaklokswamivarta

जुन्या वाहनांना उच्च सुरक्षा नोंदणी क्रमांक फलक बसविण्याचे आवाहन

नशामुक्तीचा लढा हा देशाच्या भविष्यासाठीचा सामूहिक लढा – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस · ‘ड्रग फ्री मुंबई’ अभियानाचा शुभारंभ; मुख्यमंत्र्यांकडून अमली पदार्थमुक्तीची शपथ

vishwatmaklokswamivarta