vishwatmaklokswamivarta
Breaking News
इतरठळक बातम्यास्थानिक बातम्या

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी घेतला सर्वसाधारण सभेतील मंजूर ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा

 

         नवी मुंबई प्रतिनिधी    नवी मुंबई महानगरपालिका निवडणुकांनंतर महापालिका सर्वसाधारण सभांना सुरूवात झाली असून या सभांमध्ये मंजूर झालेल्या विविध ठरावांवरील कार्यवाहीचा आढावा महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी विशेष बैठक आयोजित करीत घेतला. याप्रसंगी उपमहापौर श्री.दशरथ भगत, स्थायी समिती सभापती श्री.अशोक पाटील, सभागृह नेते श्री.सागर नाईक, आरोग्य समिती सभापती डॉ.जयाजी नाथ, नगरसेवक श्री.जयवंत सुतार, श्री.सुधाकर सोनवणे, श्री.सुरज पाटील, श्री. दत्तात्रय घरत, श्रीम. अंजनी भोईर, श्रीम.नेत्रा शिर्के, श्रीम.शुभांगी पाटील तसेच अति.आयुक्त श्री.सुनिल पवार, शहर अभियंता श्री. शिरीष आरदवाड, मुख्य लेखा व वित्त अधिकारी श्री.दिग्वीजय चव्हाण आणि इतर विभागप्रमुख उपस्थित होते.

            नवी मुंबई महानगरपालिकेची प्रथम सर्वसाधारण सभा दि. 20 फेब्रुवारी 2026 रोजी झाल्यापासून दरमहा होणा-या सर्वसाधारण सभेमध्ये विविध नागरी सुविधा कामांचे, नागरी प्रश्नांच्या सोडवणूकीचे, आर्थिक नियोजनाचे ठराव मंजूर झालेले आहेत. या ठरावांवर महापालिका प्रशासनामार्फत करण्यात आलेली कार्यवाही व त्याची सद्यस्थिती जाणून घेण्यासाठी विभागनिहाय प्रत्येक ठरावावरील कार्यवाहीची माहिती घेण्यात आली. या सर्व ठरावांवर विस्तृत चर्चा होऊन प्राधान्याने आरोग्य, शिक्षण विषयक ठरावांवर जलद कार्यवाही करण्याचे तसेच इतर ठरावांच्या अंमलबजावणीस गती देण्याचे निर्देश महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी यावेळी प्रशासनास दिले.

000

संबंधित पोस्ट

मुंबई – गोवा राष्ट्रीय महामार्गावर गणेशोत्सवादरम्यान जड वाहनांना वाहतूक बंदी..

शिर्डी परिक्रमेसाठी भाविकांच्या सुरक्षेला व आरोग्य सुविधांना सर्वोच्च प्राधान्य द्या – अपर जिल्हाधिकारी बाळासाहेब कोळेकर-डीजे व फिरती साऊंड सिस्टीम (बॅन्ड) वापरण्यास मनाई…

vishwatmaklokswamivarta

गणेशोत्सव कालावधीत राष्ट्रीय महामार्ग क्र. 66 वर 16 टनापेक्षा जास्त क्षमता असणाऱ्या सर्व वाहनांना पूर्णत: बंदी

पंतप्रधान नरेंद्र मोदी दोन दिवसांच्या  दौऱ्यावर बँकॉकला पोहोचले

विशेष सखोल पुनरीक्षण २०२६’ (SIR) मोहिमेंतर्गत माहिती घेण्यासाठी घरोघरी येणाऱ्या शासकीय प्रतिनिधींना सहकार्य करण्याचे जिल्हा प्रशासनाचे आवाहन*

सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांनी उत्कृष्ट गणेशोत्सव स्पर्धेसाठी अर्ज करावेत- जिल्हाधिकारी संतोष पाटील