vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम-एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण…

नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रम-एनएमएमटीच्या ताफ्यात दाखल नवीन 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण…

 

     नवी मुंबई प्रतिनिधी      नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या अर्थात एनएमएमटी बससेवेच्या ताफ्यात नव्याने समाविष्ट होत असलेल्या 150 सीएनजी बसेसचे लोकार्पण महाराष्ट्र राज्याचे वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, महापौर श्रीम. सुजाता पाटील व उपमहापौर श्री दशरथ भगत यांच्या प्रमुख उपस्थितीत घणसोली आगारात संपन्न झाले. याप्रसंगी स्थायी समितीचे सभापती श्री अशोक पाटील, परिवहन समितीचे सभापती श्री विकास झंजाड, आरोग्य समितीचे सभापती डॉ. जयाजी नाथ, पाणीपुरवठा समितीचे सभापती श्री रविकांत पाटील, प्रभाग समितीच्या अध्यक्ष श्रीम. ललिता मढवी आणि इतर नगरसेवक, परिवहन समिती सदस्य आणि अधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

          पर्यावरणपूरक, आधुनिक व प्रवासी सुविधांनी सुसज्ज अशा सीएनजी बसेसचा समावेश एनएमएमटीच्या ताफ्यात झाल्यामुळे परिवहन उपक्रमामार्फत पुरविण्यात येणाऱ्या प्रवासी सेवेत मोठी भर पडणार आहे. सध्या नवी मुंबई महानगरपालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 416 बसेस कार्यरत आहेत. उपक्रमाच्या ताफ्यात नव्याने एकूण 150 सीएनजी बसेस समाविष्ट करण्यात आल्या असून, त्यापैकी पहिल्या टप्प्यात 65 बसेस उपक्रमास प्राप्त झालेल्या आहेत. उर्वरित 85 बसेस नजीकच्या कालावधीत उपक्रमास प्राप्त होणार आहेत. लोकार्पण समारंभप्रसंगी 51 सीएनजी बसेसचे लोकार्पण करण्यात आले.

          याप्रसंगी वनमंत्री ना.श्री. गणेश नाईक यांनी नव्या सीएनजी बसेसच्या माध्यमातून प्रवाशांना अधिक सुरक्षित, आरामदायी व पर्यावरणपूरक प्रवास सुविधा उपलब्ध होणार असून, सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेची गुणवत्ता आणि कार्यक्षमता वाढण्यास मदत होणार असल्याबद्दल समाधान व्यक्त केले. यामुळे इंधन खर्चात बचत होऊन पर्यावरण संवर्धनालाही हातभार लागणार आहे याचाही विशेष उल्लेख त्यांनी केला.

          नवी मुंबईच्या महापौर श्रीम.सुजाता पाटील यांनी नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील ४०० महिलांना नवी मुंबई महानगरपालिका समाजविकास विभागामार्फत बसचालक प्रशिक्षण देण्याची कार्यवाही सुरु असल्याचे सांगितले, ज्या माध्यमातून एनएमएमटी बसेस चालवण्यासाठी आगामी काळात महिला बस चालक उपलब्ध होतील असे त्या म्हणाल्या. नवी मुंबईकरांना एनएमएमटी मार्फत चांगली व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून दिली जात असल्याबद्दल त्यांनी प्रशंसा केली.

          परिवहन समितीचे सभापती श्री. विकास झंजाड यांनी परिवहन उपक्रमाच्या प्रगतीसाठी व उपक्रम स्वयंपूर्ण होण्यासाठी घेतल्या जात असलेल्या विविध निर्णयांची माहिती देत परिवहनच्या वाहक, चालक व कर्मचाऱ्यांच्या हिताचे अनेक निर्णय घेतले असल्याचे सांगितले.

          यावेळी उपस्थित मान्यवरांनी व नागरिकांनी परिवहन उपक्रमाच्या कार्याचे कौतुक करून भविष्यातही अधिक गुणवत्तापूर्ण व सुरक्षित प्रवासी सेवा उपलब्ध करून देण्याच्या शुभेच्छा दिल्या. यावेळी सर्व परिवहन समिती सदस्य तसेच परिवहन व्यवस्थापक श्री उमाकांत जंगले, मुख्या लेखा व वित्त अधिकारी श्री तुषार दौंडकर, कार्यकारी अभियंता श्री.विवेक अचलकर तसेच वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

00000

संबंधित पोस्ट

नंदूरबार जिल्ह्यातल्या देवगुई घाट परिसरात आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस दरीत कोसळून झालेल्या अपघातात एका विद्यार्थ्याचा मृत्यू तर ५३ विद्यार्थी जखमी झाले आहेत. अपघातानंतर स्थानिक नागरिकांनी मदतकार्य सुरु केलं. जखमी विद्यार्थ्यांना अक्कलकुवा प्राथमिक रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. 

vishwatmaklokswamivarta

आश्रमशाळेतील प्रश्नांवर आदिवासी मंत्र्यांशी सकारात्मक चर्चा,आमदार सुधाकर अडबाले यांच्या पुढाकाराने मंत्री, सचिव, आयुक्तांसोबत सहविचार सभा…

कोकण विभागातील अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर मुंबई, मुंबई (उपनगर), पालघर, ठाणे, रायगड रत्नागिरी, सिंधुदुर्ग या जिल्ह्यांचा दूरदृश्यप्रणालीद्वारे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतला आढावा

vishwatmaklokswamivarta

नागरिकांनी आयुष्मान भारत आणि महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजनेचा लाभ घ्यावा-राज्य आरोग्य हमी सोसायटीचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या तीव्र विरोधामुळे अहिल्यानगरमधील ‘व्हॅलेंटाईन डे’निमित्त आयोजित ‘कॉफी रेव्ह पार्टी’ रद्द !

vishwatmaklokswamivarta

ठाणे येथे उपमुख्यमंत्र्यांकडून एसटीच्या स्मार्ट बसची पाहणी सुरक्षित प्रवासासाठी आता ‘एआय’ तंत्रज्ञानावर आधारित सुरक्षा प्रणाली असलेल्या स्मार्ट बसेस- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे