vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

आर्थिक विकास महामंडळाच्या विविध कर्ज योजना,इच्छुकांनी योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा

 

रायगड-अलिबाग,द प्रतिनिधी ): उद्योजकांकरीता वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) व उपकंपन्या राजे उमाजी नाईक आर्थिक विकास महामंडळ, पैलवान कै.मारुती चव्हाण-वडार आर्थिक विकास महामंडळ, श्रीकृष्ण आर्थिक विकास महामंडळ, ब्रह्मलिन आचार्य दिव्यानंद पुरीजी महाराज आर्थिक विकास महामंडळ, विणकर समाज आथिक विकास महामंडळ, श्री. शिव गोरक्षनाथ नाथपंथी समाज आर्थिक विकास महामंडळ या महामंडळाच्या विविध कर्ज योजना असून इच्छुक, गरजु विजाभज व वि.म. प्रवर्गातील व्यक्तींना योजनेच्या अधिक माहितीकरीता संपर्क साधावा, असे आवाहन जिल्हा व्यवस्थापक संदिप चव्हाण यांनी केले आहे.

राज्यातील विमुक्त जाती, भटक्या जमाती व विषेश मागास प्रवर्गातील समाजाच्या दुर्बल घटकांच्या सर्वागीण विकासासाठी शासनांने वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) व इतर उपकंपने या महामंडळाच्या स्थापना केली आहे. तसेच समाजातील आर्थिक उन्नतीसाठी महामंडळामार्फत स्वयंरोजगारांच्या विविध कर्ज योजना राबविण्यात येतात. छोटे व्यावसायीक व स्वयंरोजगारांकरीता रु.1.00 लाख थेट कर्ज योजना ( नियमित परतफेड करणा-या लाभार्थीना व्याज नाही), 25 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना (रु.15.00 लाख) व गट कर्ज व्याज परतावा योजना (रु.10.00 ते रु. 50.00 लाख) आहे.

 

रु.1.00 लाख थेट कर्ज योजनासाठी लगणारी सर्व साधारण कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, तहसिलदार / नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला. (ग्रामीण व शहरी भागासाठी कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 1.00 लाख), सक्षम अधिका-यांने दिलेले जातीचा दाखला ( विजाभज व वि.म.प्र). दरपत्रक (कोटेशन), आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका, स्थानिक स्वराज संस्थेचे (ग्रामपंचायत नगरपालिका) व्यवसाय करण्याबाबतचे ना हरकत दाखला, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंग केलेल्या बैंक पासबुक, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे दाखला / जन्म तारखेचा दाखला, भाडेकरार किंवा सबंधित जागामालकांचे संमतीपत्र व व्यवसायाच्या जागेचा अॅसेसमेंट उतारा इ. कागदपत्रे लागतात.

 

25 टक्के बीज भांडवल योजना, वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना व गट कर्ज व्याज परतावा योजनांसाठी लगणारी सर्व साधारण कागदपत्रे पासपोर्ट साईज फोटो, तहसिलदार/नायब तहसिलदार यांनी दिलेला उत्पन्नाचा मुळ दाखला, कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न मर्यादा रु. 8.00 लाख), सक्षम अधिकाऱ्याने दिलेले जातीचा दाखला, दरपत्रक (कोटेशन), आधारकार्ड, पॅनकार्ड, शिधापत्रिका, डोमिसाईल, रहिवासी दाखला, आधारकार्ड लिंग केलेल्या बैंक पासबुक, वयाच्या पुराव्यासाठी शैक्षणिक अर्हतेचे दाखला/जन्म तारखेचा दाखला, व्यवसायचा परवाणे जोडलागते. यासाठी कर्ज अर्ज करण्यासाठी विजाभज व वि. म.प्रवर्गतील असावी, महामंडळाच्या www.vjnt.org, या वेबपोर्टलद्रवारे ऑनलाईन पध्दतीने कर्ज अर्ज भरणे आवश्यक आहे. महामंडळाच्या अटी व शर्तीनुसार संगणीकृत सशर्त हेतुपत्र (Letter of Intent) दिले जातात.

वसंतराव नाईक विमुक्त जाती व भटक्या जमाती विकास महामंडळ (मर्या) जिल्हा कार्यालय: श्रीराम समर्थ गृहनिर्माण संस्था मर्या, सदनिका क्र. 1, तळ मजला, मारुती मंदिराच्या मागे, चेंढरे, अलिबाग, ता.अलिबाग, येथे संपर्क साधावा. श्री संदीप शिवराम चव्हाण जिल्हा व्यवस्थापक (अ.का) मो.क्र.8291600903, दुरध्वनी क्र. 02141-221307, Email-vnvjntdcraigad3@gmail.com, येथे संपर्क साधावा, अधिक माहितीसाठी www.vjnt.org, या संकेत स्थळाला भेट द्यावी.

संबंधित पोस्ट

पाणी टंचाईः प्रत्यक्ष पाहणी करुन प्रस्ताव-सादर करावा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta

स्वच्छ जालना, सुंदर जालना! 🧹✨

पुणे–मुंबई एक्सप्रेस वेवर झालेल्या टँकर अपघातामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी..

vishwatmaklokswamivarta

एसटीमध्ये डिझेल बचतीसाठी राज्यव्यापी मोहीम राबविणार-परिवहन मंत्री प्रताप सरनाईक· डिझेल बचतीत उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या चालकांना प्रोत्साहन· आगारनिहाय उद्दिष्टे निश्चित करण्याचे निर्देश

vishwatmaklokswamivarta

कल्याण डोंबिवली महानगरपालिका निवडणुकीच्या अनुषंगाने आज कल्याण पूर्व येथे #शिवसेना विजय निर्धार सभा मोठ्या उत्साहात आणि कल्याणकरांनी दिलेल्या उदंड प्रतिसादात संपन्न

vishwatmaklokswamivarta

राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात ‘कृषी मॉल’ उभारणार – कृषिमंत्री ॲड. माणिकराव कोकाटे