vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन

मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शिष्यवृत्ती; अर्ज करण्याचे आवाहन

छत्रपती संभाजीनगर, l प्रतिनिधी -साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळातर्फे (मर्यादित) मांतग समाजातील गुणवंत विद्यार्थ्यांसाठी शैक्षणिक शिष्यवृत्ती योजना जाहीर करण्यात आली आहे. इयत्ता १० वी, १२ वी, पदवी, पदव्युत्तर, वैद्यकीय व अभियांत्रिकी अशा विविध अभ्यासक्रमांमध्ये शिक्षण घेणाऱ्या आणि सरासरी ६०% किंवा त्यापेक्षा जास्त गुण मिळवलेल्या विद्यार्थ्यांनी २४ जुलै २०२६ पर्यंत जिल्हा व्यवस्थापक कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, खोकडपुरा येथे अर्ज सादर करण्याचे आवाहन आहे.

 

इच्छुक मांतग/मांग समाज व तत्सम १२ पोटजातींमधील पात्र विद्यार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह आपले अर्ज दि. २४ जुलै २०२६ पर्यंत ‘साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे विकास महामंडळ (मर्या.) जिल्हा कार्यालय, डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक न्याय भवन, तळ मजला, शिवाजी हायस्कूलच्या बाजूला, खोकडपुरा, छत्रपती संभाजीनगर’ या पत्त्यावर सादर करावेत. अर्जाचा नमुना कार्यालयात विनामूल्य उपलब्ध आहे.अर्जदारांना अर्जासोबत

 जातीचा दाखला, उत्पन्नाचा दाखला, गुणपत्रिका (मार्क मेमो), पुढील वर्षात प्रवेश घेतल्याबाबतची रजिस्ट्रेशन पावती किंवा बोनाफाईड प्रमाणपत्र,मतदान कार्ड, आधार कार्ड आणि रेशन कार्ड,पासपोर्ट साईज फोटो द्यावेत.पात्र विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन महामंडळाच्या जिल्हा व्यवस्थापकांनी प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.

00000

संबंधित पोस्ट

मुंबईतील वांद्रे ते कुर्ला #पॉडटॅक्सी चा प्रकल्प देशातील एकमेव असून तो मॉडेल प्रकल्प म्हणून राबविण्यात यावा. या प्रकल्पाच्या कामाला गती देण्याचे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

vishwatmaklokswamivarta

ग्रामविकासासाठी लोकसहभाग व शाश्वत नियोजन आवश्यक– जिल्हाधिकारी डॉ. मैनाक घोष- विकसित भारत – जी-राम-जी मिशनचा जिल्हास्तरीय शुभारंभ विविध विकासकामांचाही शुभारंभ

आदिवासी कलाकार, लेखक, पर्यावरण कार्यकर्ते यांना लोकभवन येथे घेऊन या – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

भेसळयुक्त अन्नपदार्थांची विक्री आढळल्यास ग्राहकांनी टोल फ्री क्रमांकावर माहिती द्यावी- सहायक आयुक्त (अन्न) रा. अ. समुद्रे- अन्न पदार्थ विक्री करणाऱ्या आस्थापनांची धडक तपासणी मोही- 9 अन्न व्यावसायिकांचे परवाने निलंबित, 51 जणांना सुधारणा नोटीस- आतापर्यंत पावणेचार लाखाहून अधिक किंमतीचा खाद्यतेलाचा साठा जप्त

vishwatmaklokswamivarta

प्रतिस्पर्ध्यांना आसमान दाखवत पै.शिवराज राक्षे, हर्षवर्धन सदगिर ठरले जलसम्राट केसरीचे मान—-जवळपास एक हजार मल्लांचा सहभाग @ बक्षिसापोटी लाखो रुपयांची लयलूट @ कुस्तीप्रेमिंच्या डोळ्याचे फिटले पारणे

vishwatmaklokswamivarta

उद्योगमंत्री उदय सामंत यांची अतिवृष्टी नुकसानग्रस्त भागाची पाहणी…

vishwatmaklokswamivarta