
ठाणे जिल्ह्यातील युवक, महिला व इच्छुक उद्योजकांसाठी डोंबिवली येथे मोफत उद्योजकता विकास प्रशिक्षण (EDP) कार्यक्रम
ठाणे, प्रतिनिधी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), महाराष्ट्र शासनाच्यावतीने अमृतच्या लक्षित गटातील नागरिकांसाठी लघुउद्योजक उद्योजकता विकास (EDP) प्रशिक्षण या पूर्णतः मोफत प्रशिक्षण दि.२० जुलै २०२६ पासून सुरू होत आहे. कार्यक्रमासाठी ऑनलाइन अर्ज प्रक्रिया सुरू झाली आहे.
या प्रशिक्षणामध्ये व्यवसायाची निवड, उद्योग सुरू करण्याची प्रक्रिया, व्यवसाय नियोजन (Business Plan), आर्थिक व्यवस्थापन, बँक कर्ज व शासकीय योजनांची माहिती, विपणन (Marketing), डिजिटल व्यवसाय, उद्योग नोंदणी, जीएसटी, ग्रुप डिस्कशन, तसेच यशस्वी उद्योजकांचे मार्गदर्शन अशा विविध विषयांवर तज्ज्ञांकडून सविस्तर मार्गदर्शन करण्यात येणार आहे.
स्वतःचा उद्योग सुरू करण्याची इच्छा असलेल्या किंवा विद्यमान व्यवसाय अधिक सक्षम करण्याचा विचार करणाऱ्या इच्छुकांनी या प्रशिक्षणाचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांनी केले आहे. प्रशिक्षणाद्वारे उद्योजकीय कौशल्य विकसित करून रोजगारनिर्मितीला चालना देण्याचा उद्देश आहे.
अधिक माहितीसाठी व नोंदणीसाठी संपर्क :
स्वतःचा व्यवसाय सुरू करू इच्छिणारे तसेच सुरू असलेल्या व्यवसायाचा विस्तार करू इच्छिणाऱ्या अमरावती जिल्ह्यातील पात्र लाभार्थ्यांनी www.mahaamrut.org या पोर्टलवर जाऊन आपला ऑनलाइन अर्ज भरावा. या उपक्रमामुळे ठाणे जिल्ह्यात नव्या उद्योजकांची निर्मिती होऊन स्थानिक स्तरावर रोजगाराच्या संधी वाढण्यास मदत होणार आहे. इच्छुकांनी आपली नोंदणी करून या प्रशिक्षणात सहभागी व्हावे, असे आवाहन अमृततर्फे करण्यात येत आहे. ऑनलाइन अर्जासाठी आवश्यक कागदपत्रे :-आधार कार्ड – पॅन कार्ड – वार्षिक उत्पन्न प्रमाणपत्र (₹8 लाखांपर्यंत) – अधिवास (Domicile) प्रमाणपत्र – शाळा सोडल्याचा दाखला (TC) / जात नमूद असलेला दाखला – इयत्ता 10 वीची गुणपत्रिका – पासपोर्ट आकाराचे 2 फोटो – स्वघोषणापत्र (Self Declaration) – स्वाक्षरी.
अमृतच्या लक्षित गटातील सर्व पात्र नागरिकांनी या मोफत प्रशिक्षणाचा लाभ घेऊन आपला व्यवसाय अधिक सक्षम, आधुनिक व यशस्वी बनवावा. उद्योजकतेच्या माध्यमातून आर्थिक स्वावलंबन मिळविण्याची ही उत्तम संधी असून, सर्वांनी तात्काळ ऑनलाइन अर्ज करावा, असे आवाहन अमृततर्फे करण्यात येत आहे.
अमृत संस्थेविषयी : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी अर्थात अमृत ही राज्य शासनाची स्वायत्त संस्था असून, खुल्या प्रवर्गातील ज्या जातींना कुठल्याही शासकीय संस्था किंवा महामंडळाचा लाभ मिळत नाही अशा जातींमधील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटक हा अमृत संस्थेचा लक्ष्यित गट आहे. त्यामध्ये ब्राह्मण, कायस्थ, कोमटी/वैश्य, मारवाडी, पटेल, राजपूत, यलमार, अय्यंगार, राजपुरोहित, पाटीदार, नायर, नायडू, कम्मा, कानबी, सिंधी, बनिया, बंगाली, त्यागी, सेनगुनथर, गुजराथी, जाट, लोहाना, हिंदू नेपाळी व भूमिहार अशा जातींचा सद्यस्थितीत समावेश आहे. अशा जातींमधील वार्षिक उत्पन्न आठ लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या व्यक्ती अमृत संस्थेच्या विविध योजनांचा लाभ घेऊ शकतात. राज्याच्या सर्व ३६ जिल्ह्यांमध्ये अमृत संस्थेची कार्यालये असून, अधिक माहितीसाठी अमृत संस्थेच्या आपापल्या जिल्ह्यातील कार्यालयाशी संपर्क साधावा. तसेच, अमृत संस्थेचे संकेतस्थळ आणि सोशल मीडिया हँडल्स पाहावीत.
ठाणे जिल्हा अधिक माहितीसाठी संपर्क : महाराष्ट्र संशोधन, उन्नती व प्रशिक्षण प्रबोधिनी (अमृत), जिल्हा उपव्यवस्थापक, ठाणे माया रत्नपारखी-खेत्रे मो. क्र.: ९११२२२६५३३.
0000



