vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

गडचिरोलीच्या औद्योगिक विकासासाठी जिल्हा उद्योग मित्र समितीची बैठक १७ जुलैला

स्टील हब’च्या दिशेने रोडमॅपसह उद्योगवाढ, रोजगार आणि नवउद्योजकतेवर होणार सविस्तर चर्चा,उद्योग क्षेत्राशी संबंधित घटकांनी उपस्थित राहण्याचे आवाहन

 

गडचिरोली, प्रतिनिधी : गडचिरोली जिल्ह्यात औद्योगिक विकासाला गती देण्यासाठी तसेच आगामी काळात जिल्हा ‘स्टील हब’ म्हणून विकसित करण्याच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण पावले उचलण्यात येत आहेत. या पार्श्वभूमीवर जिल्हा उद्योग केंद्र, गडचिरोली यांच्या वतीने जिल्हा उद्योग मित्र समिती व इतर समन्वय समितीची संयुक्त बैठक शुक्रवार, दि. १७ जुलै २०२६ रोजी दुपारी १.३० वाजता जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृह येथे आयोजित करण्यात आली आहे.

जिल्ह्यातील उद्योगांना चालना देणे, नवउद्योजकांना शासकीय योजनांची माहिती व मार्गदर्शन उपलब्ध करून देणे, उद्योग क्षेत्रातील अडचणी सोडविणे आणि भविष्यातील औद्योगिक विकासाचा प्रभावी रोडमॅप तयार करणे हा या बैठकीचा प्रमुख उद्देश आहे. विशेषतः गडचिरोलीमध्ये उभारणी होत असलेल्या मोठ्या औद्योगिक प्रकल्पांच्या पार्श्वभूमीवर स्थानिक उद्योगांना पूरक संधी निर्माण करणे, ॲन्सिलरी उद्योगांचा विकास आणि स्थानिक युवकांसाठी रोजगारनिर्मिती यावर बैठकीत विशेष भर दिला जाणार आहे.

बैठकीत जिल्ह्यातील उद्योग क्षेत्राच्या विकासासंदर्भातील विविध विषयांवर सविस्तर चर्चा करण्यात येणार असून, उद्योजकांच्या अडी-अडचणी, सूचना आणि अपेक्षा जाणून घेतल्या जाणार आहेत. तसेच उद्योग उभारणीसाठी उपलब्ध असलेल्या विविध शासकीय योजना, बँक कर्ज सुविधा, औद्योगिक गुंतवणुकीच्या संधी आणि विविध विभागांमधील समन्वयातून उद्योगांना आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

यावेळी जिल्ह्यातील विद्यमान उद्योगांच्या समस्या व त्यावरील उपाययोजना, आगामी उद्योगविषयक कार्यक्रमांचे नियोजन, ॲन्सिलरी डेव्हलपमेंट रोडमॅप, ॲडव्हान्टेज विदर्भ अभियानाअंतर्गत उपलब्ध संधी, आजारी उद्योगांचे पुनरुज्जीवन, स्थानिक नागरिकांना रोजगार उपलब्ध करून देण्याबाबतचा आढावा तसेच जिल्हा निर्यात प्रचालन समितीची सभा यांसारख्या महत्त्वपूर्ण विषयांवर चर्चा होणार आहे.

00000

संबंधित पोस्ट

दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

सांगलीच्या स्मृती सदैव स्मरणात राहतील- मावळते जिल्हाधिकारी डॉ. राजा दयानिधी

vishwatmaklokswamivarta

जालना मनपाच्या विभागांना जिल्हाधिकारी तथा आयुक्त आशिमा मित्तल यांनी दिला कालबद्ध कार्यक्रम

vishwatmaklokswamivarta

राज्यात ‘अपना भांडार’च्या माध्यमातूनखरेदी विक्रीची साखळी उभारणार- पणन मंत्री जयकुमार रावल

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उद्योजक श्लोका अंबानी यांच्या पुढाकाराने गडचिरोलीत ‘सोलर शाळा’ उपक्रम

vishwatmaklokswamivarta

अल्पसंख्याकांसाठीच्या योजनांचा पात्र गरजूंना लाभ द्यावा- अध्यक्ष प्यारे जिया खान