vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

दिवेआगर येथील सुपारी संशोधन केंद्राची कामे लवकरात लवकर सुरू करा- कृषीमंत्री दत्तात्रय भरणे

     मुंबई, प्रतिनिधी : रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथील प्रस्तावित १४ कोटी रु.ची तरतुद असलेल्या सुपारी संशोधन केंद्राचे काम लवकरात लवकर सुरू करण्याची कार्यवाही कृषी विभागाने करावी, असे निर्देश कृषिमंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिले.           रायगड जिल्ह्यातील दिवेआगर येथे सुपारी संशोधन केंद्र सुरू करण्याबाबत मंत्रालयात आयोजित बैठकीत कृषीमंत्री दत्तात्रय भरणे बोलत होते. यावेळी महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, कृषी विभागाचे प्रधान सचिव विकासचंद्र रस्तोगी, महाराष्ट्र कृषी शिक्षण व संशोधन परिषदेच्या वर्षा लड्डा-उंटवाल, दापोली कृषी विद्यापीठाचे कुलगुरू संजय भावे, सहसंशोधक कल्पेश शिंदे, कृषी विभागाच्या उपसचिव प्रतिभा पाटील यासह इतर अधिकारी या उपस्थित होते.   कृषिमंत्री दत्तात्रय भरणे म्हणाले की,रायगड जिलह्यातील दिवेआगर (ता.श्रीवर्धन) येथे होणाऱ्या प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्रामुळे स्थानिक शेतकऱ्यांना उत्कृष्ट दर्जाची सुपारीची रोपे मिळून या भागाला त्याचा चांगला फायदा होईल. या सुपारी संशोधन केंद्राच्या माध्यमातून सुपारीच्या बुटक्या तसेच दर्जेदार व अधिकचे उत्पन्न देणाऱ्या जाती विकसित करणे, दिवेआगर व परिसरातील हवामानाचा विचार करून आंतरपिके घेण्याचे तंत्रज्ञान विकसित करणे, अत्याधुनिक तंत्रज्ञान शेतकऱ्यांपर्यंत पोचविण्यासाठी कार्यक्रमांचे आयोजन, रोजगार निर्मिती, रोपवाटिका उभारणे, कलमे विकसित करणे, परिसरातील गावांचा ग्रामविकास आराखडा तयार करणे असे विविध उपक्रम राबविण्यात येतील असे नियोजन करावे. सुपारी संशोधन केंद्रासाठी निधी मंजुर असून प्रस्तावित बांधकाम आणि इतर अनुषंगिक बाबीं पूर्ण होण्यासाठी दापोली कृषी विद्यापीठाने निविदा प्रक्रिया गतीने पूर्ण करून कामे सुरू करण्याची कार्यवाही करावी, असे निर्देश त्यांनी दिले.i: दिवेआगर संशोधन केंद्र पर्यटनाला चालना देणारे ठरेल- महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे    महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे म्हणाल्या की,दिवेआगार हे पर्यटनदृष्ट्या अत्यंत महत्वाचे ठिकाण असून येथे निर्माण होणारी रोठासुपारी अत्यंत उत्कृष्ट दर्जाचा वाण आहे. हे वाण जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत पोहोचण्यासाठी हे नवीन सुपारी संशोधन केंद्र महत्वाची भुमिका बजावेल. तसेच पर्यटक देखील सुपारी संशोधन केंद्राला भेट देतील अशा दृष्टीने प्रस्तावित सुपारी संशोधन केंद्र तयार करावे असे निर्देश मंत्री आदिती तटकरे यांनी दिले.

संबंधित पोस्ट

जिल्हा परिषद व पंचायत समिती सार्वत्रिक निवडणूक-2026मतमोजणी केंद्राच्या ठिकाणी मनाई आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

वाहन हस्तांतरण व ना हरकत प्रमाणपत्रासाठी आधार प्रमाणीकरणाची सुधारित प्रक्रिया..

गडचिरोलीचे स्वतंत्र व्हिजन ठरवा; राष्ट्रीय सरासरीपेक्षा पुढे जाण्याचे लक्ष्य ठेवा”*सहसचिव प्राजक्ता लवंगारे-वर्मा यांचेकडून प्रधानमंत्री धनधान्य किसान योजनेचा आढावा*

vishwatmaklokswamivarta

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

डाक विभागाची सांगलीत 6 जुलैला पेंशन अदालत

राज्यातील आरोग्यसेवा बळकट करण्यासाठी केंद्रीय आरोग्यमंत्री जे. पी. नड्डा यांच्यासोबत आरोग्यमंत्री प्रकाश आबिटकर यांची दिल्लीत बैठक जनऔषधी, क्षयरोग निर्मूलनाला व राष्ट्रीय आरोग्य अभियानाच्या कामाला गती देणार