vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशव्यवसाय

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

पदवीधरांसाठी गडचिरोलीत 28 ला रोजगार मेळावा; 40 कंपन्यांचा सहभाग,गोविंदराव वंजारी फाऊंडेशनचे आयोजन : 10 हजारांवर बेरोजगार सहभागी होण्याची शक्यता..

 

गडचिरोली प्रतिनिधी : विपुल खनिज संपदेने समृद्ध असलेल्या आणि आता स्टील निर्मितीचा जिल्हा म्हणून नावारूपास येणाऱ्या गडचिरोली जिल्ह्यातील पदवीधर बेरोजगारांसाठी गोविंदराव वंजारी फाऊंडेशनच्या वतीने 28 मार्चला सकाळी 10 ते 6 या वेळेत येथील महाराजा सेलिब्रेशन हॉल, धानोरा रोड येथे भव्य रोजगार मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. या मेळाव्यात महाराष्ट्रातील नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार असून गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे 10 हजारांवर बेरोजगार पदवीधर यामध्ये सहभागी होणार असल्याची शक्यता आहे.

नागपूर विभाग पदवीधर मतदारसंघाचे आमदार ॲड. अभिजित वंजारी यांच्या पुढाकारातून होत असलेल्या या मेळाव्यात मोठ्या प्रमाणात रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. सदर मेळाव्यात निर्मिती, आय.टी. ऊर्जा, ऑटोमोबाईल, बँकिंग क्षेत्रातील राज्यभरातील सुमारे 40 नामांकित कंपन्यांचा सहभाग राहणार आहे. पदवी शिक्षण घेत असलेले आणि पदवीधर या मेळाव्यात सहभागी होऊ शकतात. उमेदवारांचे शिक्षण ज्या क्षेत्रातील आहे, त्या क्षेत्राशी संबंधित कंपनी उमेदवारांच्या मुलाखती घेतील. थेट मुलाखतीच्या माध्यमातून त्याच ठिकाणी उमेदवारांची निवड करून त्यांना नियुक्ती पत्र प्रदान करण्यात येणार आहे.

सदर रोजगार मेळाव्यात गडचिरोली जिल्ह्यातील प्रत्येक तालुक्यातील पदवीधर बेरोजगार सहभागी होऊ शकतील. तत्पूर्वी त्यांना ऑनलाईन नोंदणी करावी लागेल. abhijitwanjari.com या वेबसाईटवर जाऊन ही नोंदणी करता येईल. ऑनलाईन नोंदणी सुरू असून आतापर्यत गडचिरोली जिल्ह्यातील सुमारे तीन हजारांवर पदवीधर बेरोजगार आणि पदवी शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांनी नोंदणी केलेली आहे. नोंदणी झालेल्या उमेदवारांनी 28 मार्च रोजी नियोजित ठिकाणी शैक्षणिक पात्रतेचे सर्व कागदपत्रे घेऊन उपस्थित राहणे बंधनकारक आहे. संबंधित उमेदवारांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार संबंधित कंपनीना देण्यात आलेल्या क्रमांकाचे टोकण उमेदवारांना देण्यात येईल. त्यानुसार, संबंधित क्रमांकाच्या दालनात त्यांची मुलाखत होईल. निवड झालेल्या उमेदवारांना मेळाव्यातच नियुक्तीपत्र देण्यात येईल.

गोविंदराव वंजारी फाऊंडेशन आयोजित पदवीधर रोजगार मेळाव्याचे उद्‌घाटन सकाळी 10 वाजता आ. अभिजित वंजारी, जिल्ह्यातील अधिकारी आणि मान्यवरांच्या उपस्थितीत होईल. यावेळी रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या दृष्टीने विविध क्षेत्रातील मान्यवरांचे मार्गदर्शन लाभणार आहे. मेळाव्याच्या ठिकाणी विद्यार्थी आणि पालकांसाठी अभ्यागत कक्ष, नोंदणी कक्ष, माहि

संबंधित पोस्ट

पहिल्या प्रकाश पर्वानिमित्त महाआरोग्य शिबिर; १ हजार १५७ नागरिकांना मोफत आरोग्यसेवा

vishwatmaklokswamivarta

जलव्यवस्थापन कृती पंधरवडा अंतर्गत जलसंपदा विभागामार्फत कृत्रिम बुध्दीमत्ता प्रशिक्षण 

चाकण एमआयडीसीतील रस्ते व पायाभूत सुविधांची उद्योगमंत्री उदय सामंत यांनी केली पाहणी रस्ते, वाहतूक, पावसाच्या पाण्याचा निचरा, अतिक्रमणे व पार्किंगच्या प्रश्नांचा घेतला आढावा; कालबद्ध उपाययोजनांच्या सूचना

नरडवे मध्यम पाटबंधारे प्रकल्पातील १५२ प्रकल्पबाधित कुटुंबांना ६.८३ कोटी रुपयांचे स्वेच्छा पुनर्वसन अनुदान मंजूर – मंत्री मकरंद जाधव-पाटील

vishwatmaklokswamivarta

अमली पदार्थांविरोधात कठोर कारवाई करा – निवासी उपजिल्हाधिकारी दादासाहेब गिते-जिल्हास्तरीय नार्को को-ऑर्डिनेशन सेंटर समितीची बैठक संपन्न

मॅग्नेट’ प्रकल्पांतर्गत 32 शेतकऱ्यांचा राज्यस्तरीय अभ्यास दौरा