vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्या

महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारासाठी राज्य शासनाने 500 कोटींचा निधी द्यावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

*महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीच्या विस्तारासाठी राज्य शासनाने 500 कोटींचा निधी द्यावा ~~ केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले*

 

छत्रपती संभाजी नगर प्रतिनिधी

~~ महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांनी स्थापन केलेल्या पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विस्तार करून मेडिकला कॉलेज ; नर्सिंग कॉलेज; हॉस्टेल आदी उपक्रम राबवून महाविद्यालयांच्या जुन्या इमारतींचे नूतनीकरण करून पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा विकास करण्यासाठी राज्य सरकार ने 500 कोटींचा निधी दोन टप्प्यात द्यावा अशी मागणी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री ना रामदास आठवले यांनी केली.

छत्रपती संभाजी नगर येथे महामानव डॉ बाबासाहेब आंबेडकरांच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या नागसेन वन या भागात पी ई एस पॉलिटेक्निक महाविद्यालयात सेंटर ऑफ एक्सलंस लर्निग चे उद्घाटन पीपल्स एज्युकेशन सोसायटीचे अधिकृत चेअरमन म्हणून ना.रामदास आठवले यांच्या हस्ते करण्यात आले.या सेंटर मध्ये 100 संगणक संच उभारण्यात आले आहेत.यावेळी पी ई एस पॉलिटेक्निक चे प्रिन्सिपॉल प्राचार्य त्र्यंबक कदम; रिपब्लिकन पक्षाचे राज्य कार्याध्यक्ष बाबूराव कदम; मिलिंद शेळके; पी ई एस चे विश्वस्त ऍड बी के बर्वे; वामन आचार्य; यू एम मस्के; चंद्रशेखर कांबळे ; विजय मगरे; नागराज गायकवाड बाळकृष्ण इंगळे

आदी अनेक मान्यवर उपस्थित होते.

पी ई एस चे काही प्राचार्य आमचे ऐकत नाहीत.त्यांना दोन महिन्यांची मुदत देतो.त्यांनी जर ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करावी लागेल.पीपल्स एज्युकेशन सोसायटीचा कायदेशीर अधिकृत अध्यक्ष मीच आहे.दादागिरी काय करता …दादागिरी करीतच मी दिल्लीपर्यंत पोहोचलो आहे.मात्र आपल्याला वाद करायचा नाही.विरोधकांना काय म्हणणे मांडायचे असेल ते कायदेशीर मांडावे.तुमच्या कडे कायदेशीर काही बाजू असेल तर मांडा असा टोला न.रामदास आठवले यांनी विरोधकांना लगावला.

00000000

संबंधित पोस्ट

जिल्ह्यात शस्त्रबंदी व जमावबंदी आदेश जारी

मरोळ येथील पोलिस प्रशिक्षण केंद्रातील सतराव्या आदिवासी युवा देवाणघेवाण उपक्रमाला केंद्रीय युवा व्यवहार आणि क्रीडा मंत्र्याची उपस्थिती 2047 पर्यंत विकसित भारताच्या उभारणीत तरुण आदिवासी नेते महत्त्वाची भूमिका बजावतील: डॉ. मनसुख मांडवीय

vishwatmaklokswamivarta

राज्यात राबविण्यात येत असलेल्या महत्त्वाकांक्षी नदीजोड प्रकल्पांतील कामांना गती देण्याच्या अनुषंगाने जलसंपदा मंत्री  राधाकृष्ण विखे- पाटील आढावा 

vishwatmaklokswamivarta

पंडित दीनदयाळ उपाध्याय स्वयंम योजना नूतनीकरणासाठी अर्ज करण्याचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

पर्यावरणपूरक गणेशोत्सव साजरा करण्याचे निवासी आयुक्त आर. विमला यांचे आवाहन गणेशमूर्ती विक्री प्रदर्शनाला दिल्लीकरांचा उत्स्फूर्त प्रतिसाद

नवी मुंबईतील ‘एज्युकेशन सिटी’मध्ये आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विद्यापीठांच्या माध्यमातून शिक्षण मिळेल – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस- यांच्या उपस्थितीत ‘युनिव्हर्सिटी ऑफ वेस्टर्न ऑस्ट्रेलिया’सोबत सामंजस्य करार