vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

विभागीय आयुक्तांचा अंबाळा येथील आदिवासी बांधवांशी संवादआदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसेच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश..

विभागीय आयुक्तांचा अंबाळा येथील आदिवासी बांधवांशी संवादआदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसेच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश..

 

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी: विभागीय आयुक्त दिलीप गावडे यांनी कन्नड तालुक्यातील अंबाळा गावाला भेट देऊन आदिवासी बांधवांच्या अडीअडचणी बाबत माहिती जाणून घेत आदिवासी बांधवांसाठीच्या योजना तसेच सोईसुविधांबाबत योग्य त्या उपाय योजना करण्याचे निर्देश दिले.

अंबाळा ग्रामस्थांनी गावाचा रस्ता, प्रलंबित वनहक्क दावे, जलजीवन मिशन पाणी पुरवठा योजना, शिक्षण, शाळेसाठी संरक्षण भींत, ग्रामविकास, जन्मप्रमाणपत्र, बिबट्यांचा त्रास आदीं बाबत आपल्या अडचणी मांडल्या, जल जीवन मिशन योजने अंतर्गत पाणीपुरवठा करण्यासोबतच योजना मंजूर असून अर्धा किलोमीटर या ठिकाणी भूमिगत पाईपलाईनचे काम करण्यासाठी वन विभागाची मंजुरी मिळण्याबाबतही चर्चा झाली. तसेच प्रधानमंत्री किसान योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी गतीने काम करावे, अशा सूचना विभागीय आयुक्त श्री गावडे यांनी दिल्या.

गावातील आदिवासी बांधव ऊसतोडणीसाठी बाहेरगावी जात असल्याने मुलांचे जन्म वेगवेगळ्या गावात होतात त्यामुळे जन्म नोंदणी करण्यासाठी विलंब होतो. विलंबाने नोंदी घेण्याबाबत सक्षम अधिकाऱ्यांना अधिकार असल्यामुळे याबाबतची कारवाई होतानाही विलंब होतो. मुलांना शाळेत प्रवेशासाठी अडचणी निर्माण होतात. याबाबत योग्य त्या उपाययोजना करा, अशा सूचना श्री गावडे यांनी दिल्या.

गावामध्ये स्मशानभूमी उपलब्ध करून देणे, रात्रीच्या वेळी गावामध्ये बिबट्यांचा वावर असण्याच्या शक्यतेने भीतीयुक्त वातावरण असते म्हणून गावास कुंपण करणे. आदिवासी बांधव वेगवेगळ्या ठिकाणी स्थलांतरित होतात. वेगवेगळ्या ठिकाणी नवीन मोबाईल क्रमांक घेतात व तो नंतर तो क्रमांक बंद होतो. आधार कार्डशी संलग्न करण्यात आलेला मोबाईल क्रमांक बंद झाल्यामुळे विविध योजनांचा लाभ घेण्यासाठी अडचणी निर्माण होतात. याबाबत प्रशासकीय यंत्रणांनी पुढाकार घेत यामध्ये सुसुत्रता निर्माण करावी, असे निर्देश श्री गावडे यांनी यंत्रणेला दिले. बिरसा मुंडा योजना, ठक्कर बाप्पा योजना, जिल्हा वार्षिक योजनांसह आदिवासी बांधवासांठी असलेल्या योजनांचा लाभ आदिवासी बांधवांपर्यंत गतीने पोहचला पाहीजे, असेही ते म्हणाले.

आदिवासी विकास प्रकल्प अधिकारी चेतना मोरे यांनी आदिवासी जल जंगल जमिनीची काळजी घेतात जंगलांशी नाते घट्ट करण्यासाठी वनहक्क कायदा असल्याचे नमूद केले, आदिवासी विकास विभागा मार्फत बिरसा मुंडा योजनेतून स्मशानभूमी, वनपट्टयातील आदिवासी शेतकऱ्यांना विहिर व इतर कामांसाठी मदत करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. आदिवासी बांधवांनी आपल्या मुलांना चांगल्या प्रकारचे शिक्षण द्यावे. यासाठी आश्रमशाळा, वसतीगृहांत मुलांना पाठविण्याचे आवाहन केले.

यावेळी नायब तहसिलदार दिलीप सोनावणे, मंडळ अधिकारी रमेश चव्हाण, विस्तार अधिकारी श्री दारकुंडे, वनहक्क शाखेचे अभिजीत पानठ, ग्रामसेवक श्री शेख, सरपंच सखाराम भुतांबरे यांच्यासह ग्रामस्थ् उपस्थित होते.

*****

संबंधित पोस्ट

पहिल्याच तिमाहीत ४३४ कोटींच्या मालमत्ता कर संकलनाव्दारे नवी मुंबईने महसूल व्यवस्थापनात नोंदविला नवा इतिहास*अदायगीच्या ऑनलाइन सुविधांना नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद; डेटा विश्लेषण आणि तंत्रज्ञानाच्या प्रभावी वापरामुळे ऐतिहासिक यश*

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta

रायगड जिल्ह्यातील ७ शासकीय वसतिगृहांमध्ये सन २०२६-२७ साठी मोफत प्रवेश प्रक्रिया सुरू

अंबड येथे छत्रपती शिवाजी महाराज महाराजस्व समाधान शिबिर उत्साहात संपन्न     महाराजस्व समाधान शिबिरास आ. नारायण कुचे, विभागीय आयुक्त जी. श्रीकांत, जिल्हाधिकारी आशिमा मित्तल यांची प्रमुख उपस्थिती  • 78 भिल्ल कुटुंबांना घराचे पट्टेचे वितरण

कृषी सखींचे ५ दिवसीय निवासी प्रशिक्षण कार्यक्रमास सुरुवात

मदरशांचे ५० लाखांचे अनुदान थांबवून त्यांचे सामान्य शाळांत रूपांतर करा!- हिंदु जनजागृती समितीची राज्यशासनाकडे मागणी,उत्तर प्रदेशाच्या धर्तीवर मदरशांचे सर्वेक्षण करा; अन्यथा राज्यभर जनआंदोलन छेडण्याचा इशारा