vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंतीनिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वतीने विविध सामाजिक उपक्रम : शेख महेमूद

जालना – प्रतिनिधी शिव शाहू फुले आंबेडकर विचारांचे प्रणेते विकासाभिमुख नेतृत्व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री स्वर्गीय अजित दादा पवार यांच्या जयंती दिनानिमित्त विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आलेे असल्याचे जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शेख मेहमूद यांनी सांगितले आहे.

        जालना शहरांमध्ये स्वर्गीय अजितदादा पवार यांच्या जयंती निमित्त सेवा सत्ता म्हणून राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष तथा माजी आ. अरविंदराव चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली दिनांक 24 जुलै 2026 ते 26 जुलै 2026 दरम्यान विविध सामाजिक उपक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे , याप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे मराठवाड्याचे नेते आ. विक्रम काळे , अल्पसंख्यांक विभागाचे प्रदेशाध्यक्ष एडवोकेट नाजेर काझी आदी मान्यवरांची विशेष उपस्थिती राहणार आहे .

      दिनांक २४ जुलै 2026 शुक्रवार रोजी सकाळी दहा वाजता जिल्हा महिला बाल रुग्णालय येथे फळ वाटपाचा कार्यक्रम ( संयोजक – अण्णासाहेब चितेकर ) दिनांक 25 जुलै 2026 शनिवार रोजी सकाळी दहा वाजता ह. मियासाहाब दर्गा शरीफ येथे वृक्षारोपण ( संयोजक – शिवराज जाधव , शेख मुजम्मिल ) दिनांक 26 जुलै 2026 रविवार रोजी सकाळी साडेनऊ वाजता जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी कार्यालय येथे रक्तदान शिबिर ( संयोजक – मिर्झां अन्वर बेग ) दिनांक 26 जुलै रविवार सकाळी 11 वाजता क्रीडा प्रबोधिनी गांधी चमण जुना जालना येथे कबड्डीपटूंचा सत्कार व कीट वाटप ( संयोजक – सोपानराव तेलगड , प्रशांत तेलगड ) सदरील कार्यक्रमास पक्षाचे प्रदेश पदाधिकारी , महिला प्रदेश पदाधिकारी , जिल्हा पदाधिकारी व सर्व सेलचे जिल्हाध्यक्ष व पक्षाचे मान्यवर नेते प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणार आहेत यावेळी पक्षाच्या सर्व पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी उपस्थित राहावे असे आवाहन जालना शहर जिल्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष शेख मेहमूद , प्रदेश युवक राष्ट्रवादी काँग्रेसचे सरचिटणीस धैर्यशील चव्हाण , शहा आलम खान , प्रभाकर घेवंदे , मंगलताई पाटील , सतीश वाहुळे ,विजय सोनवणे , रिंकल तायड , शितल बारोटे , पद्माकर हांडे , संतोष ढेंगळे , सुनील सोनवणे , अजीम बागवान ,ललीत कुचेकर , पप्पु खान , मनोज गुडेकर , आणि सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे

00000

संबंधित पोस्ट

नौसेनेमधून निवृत्त झालेल्या माजी सैनिकांसाठी 23 जुलै रोजी मेळाव्याचे आयोजन

भिवंडी येथील मुलांमुलींचे शासकीय वसतिगृह येथे रिक्त जागेवर मोफत प्रवेश देणे सुरु

मारवाडी गल्लीतील रस्त्याची डागडूजी : नागरिकांत आनंदशिवसेना शहरप्रमुख दुर्गेेश काठोठीवाले यांच्या मागणीला यश..

आत्महत्याग्रस्त शेतकऱ्यांच्या वारसांना मदतीसाठी २० कोटींचा निधी-मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील

नवी मुंबई महानगरपालिका प्रसिध्दीकरिता-घणसोली विभागात अनधिकृत बांधकामावर धडक कारवाई

vishwatmaklokswamivarta

जिल्ह्यात 15 डिसेंबरपर्यंत प्रतिबंधात्मक आदेश लागू

vishwatmaklokswamivarta