vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

माजी सैनिक, पत्नी, पाल्यांना विशेष गौरव पुरस्कार; अर्ज मागविले

छत्रपती संभाजीनगर, प्रतिनिधी – राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर विविध क्षेत्रात उल्लेखनीय कामगिरी बजावलेल्या माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, पाल्य यांना विशेष गौरव पुरस्कार देण्यात येतो. जिल्ह्यातील पात्र इच्छुकांकडून अर्ज मागविण्यात आले आहेत, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी यांनी कळविले आहे.

माजी सैनिक, त्यांच्या पत्नी, विधवा, पाल्य यांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवर क्रीडा, साहित्य, संगित, गायन, वादन नृत्य आदी क्षेत्रात तसेच उद्योग, संगणक, पुर, अग्नितांडव, अपघात अशा आपत्तीत मोलाची कामगिरी बजावली असल्यास त्यांना पुरस्कार देण्यात येतो. पुरस्काराचे स्वरुप याप्रमाणे-

राष्ट्रीय पातळीवरील कामगिरी- २५ हजार रुपये, आंतरराष्ट्रीय पातळीवरील कामगिरी-५० हजार रुपये, १० वी, १२ वी परिक्षांमध्ये ९० /८५ टक्क्यांपेक्षा जादा गुण-२० जार रुपये, पदवी पदव्युत्तर परीक्षेत प्रथम क्रमांक-२५ हजार रुपये, आयआयटी, आयआयएम, एआयआयएमएस सारख्या संस्थेत प्रवेश मिळालेले पाल्य-एक लक्ष रुपये.

पात्र व इच्छुक व्यक्तिंनी आपले अर्ज जिल्हा सैनिक कल्याण कार्यालय, नंदनवन कॉलनी, छत्रपती संभाजीनगर येथे दि.२० सप्टेंबर पर्यंत जमा करावे, असे जिल्हा सैनिक कल्याण अधिकारी, छत्रपती संभाजीनगर यांनी कळविले आहे. संपर्क-२४०-२३७०३१३.

०००००

संबंधित पोस्ट

महाराष्ट्र महापर्यटन उत्सव, महाबळेश्वर-महापर्यटन उत्सवात मॉर्निंग रागाज, सायक्लथाॅन, फन रन मध्ये नागरिकांचा उत्स्फूर्त सहभाग

समाज परिवर्तनाचे माध्यम म्हणून डॉ.आंबेडकर महाविद्यालयाने कार्य करावे     -मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस विद्यार्थ्यांनी डॉ.आंबेडकरांच्या विचाराचा अंगीकार करत ध्येय गाठावे-सरन्यायाधीश न्यायमूर्ती भूषण गवई § डॉ.आंबेडकर महाविद्यालयाचा हीरक महोत्सवी सोहळा उत्साहात..

विशेष लेख- कोल्हापूर चित्रनगरी विकासाच्या वाटेवर-

डॉ गोविंदराज यांनी केला क्षेत्रीय पाहणी दौरा, शेतकरी, क्षेत्रीय अधिकारी यांच्याशी साधला संवाद.

vishwatmaklokswamivarta

महाराष्ट्र शासनाचे १० वर्षे व २६ वर्षे मुदतीचे एक हजार कोटी रुपयांचे तर, २१ वर्षे मुदतीचे ५३० कोटी रुपयांचे रोखे विक्रीस

पवई येथील भूखंडसंदर्भात दाखल निवेदनाबाबत अभ्यासानंतर कार्यवाही – विधानसभा उपाध्यक्ष अण्णा बनसोडे

vishwatmaklokswamivarta