vishwatmaklokswamivarta
Breaking News
खेळ प्रतिनिधी

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…

राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालन्याचे १५ कराटेपटू दिल्लीला रवाना; सेन्साई रूपेंद्र पारचा यांच्याकडे महाराष्ट्र संघाचे टीम मॅनेजरपद तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियमवर २३ व २४ जुलैला होणार राष्ट्रीय स्पर्धा; जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची अपेक्षा…

जालना | प्रतिनिधी – स्टेअर्स युथ गेम्स राष्ट्रीय कराटे स्पर्धा २०२५-२६ अंतर्गत दिल्ली येथील तालकटोरा इंटरनॅशनल स्टेडियममध्ये २३ व २४ जुलै २०२६ रोजी होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेसाठी जालना जिल्ह्यातील १५ गुणवान कराटेपटू महाराष्ट्र संघाचे प्रतिनिधित्व करण्यासाठी दिल्लीला रवाना झाले आहेत. विशेष म्हणजे, या स्पर्धेसाठी महाराष्ट्र संघाच्या टीम मॅनेजरपदी जालना येथील सेन्साई रूपेंद्र गोपाल पारचा यांची नियुक्ती झाल्याने जिल्ह्याच्या क्रीडा क्षेत्रासाठी हा अभिमानाचा क्षण ठरला आहे.

जालना जिल्ह्यातील कराटेपटूंनी राज्यस्तरीय स्पर्धांमध्ये सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरी करत राष्ट्रीय स्तरावर आपले स्थान निर्माण केले आहे. त्याच यशाच्या बळावर यंदा तब्बल १५ खेळाडूंना महाराष्ट्र संघातून राष्ट्रीय स्पर्धेसाठी निवड मिळाली आहे. त्यामुळे या स्पर्धेत जालन्याच्या खेळाडूंकडून पदकांची मोठी अपेक्षा व्यक्त होत आहे.

राष्ट्रीय स्पर्धेत महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या जालना जिल्ह्यातील खेळाडूंमध्ये कु. निवांशी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. अनुष्का किशोर म्हेत्रे (नवयुवक गणेश माध्यमिक विद्यालय), कु. तन्वी नितीन खरटमल (राजश्री शाहू इंग्लिश स्कूल), कु. आरुषी नवीनकुमार वलकट्टी (नारायणा ई-टेक्नो स्कूल), कु. वैष्णवी बाबासाहेब लोखंडे (पोद्दार इंटरनॅशनल स्कूल), कु. आकांक्षा शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन विद्यालय), कु. वैष्णवी संतोष लुटे (राष्ट्रीय हिंदी विद्यालय इंग्लिश मीडियम), कु. दिव्यता अजितराज कोठारी (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), कु. लावण्या किशोर गुडला (जे.ई.एस. कॉलेज), कु. पूर्वा सुजित माने (श्रीमती इंदिरा गांधी कॉलेज, रामनगर), ऋषिकेश गणेश श्रीराम (नारायणा ई-टेक्नो स्कूल), यशवर्धन शंकर चिल्का (श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूल), नयन धनराज गोमतीवाले (जे.ई.एस. कॉलेज), शेलमॉन योहान गुडेकर (जे.ई.एस. कॉलेज) आणि ओंकार गुट्टे (जे.ई.एस. कॉलेज) यांचा समावेश आहे.

या सर्व खेळाडूंना जालना जिल्ह्याचे चीफ को-ऑर्डिनेटर सेन्साई रूपेंद्र पारचा तसेच प्रशिक्षक सेन्साई अमन पारचा यांचे सातत्यपूर्ण मार्गदर्शन लाभले आहे. त्यांच्या मेहनतीमुळे आणि नियोजनबद्ध प्रशिक्षणामुळे जालना जिल्ह्यातील कराटेपटूंनी राज्य व राष्ट्रीय स्तरावर उल्लेखनीय कामगिरीची परंपरा निर्माण केली आहे.

स्पर्धेसाठी निवड झालेल्या खेळाडूंचे स्टेअर्स जालना जिल्ह्याचे अध्यक्ष दीपक शेळके, उपाध्यक्ष गणेश श्रीराम, उपाध्यक्ष प्रशांत पेम्बरती, जालना महानगरपालिकेचे उपमहापौर राजेश राऊत, नगरसेवक महावीर ढक्का, राहुल मांडोत, संजय भगत, रितेश अग्रवाल, तसेच श्री म. स्था. जैन इंग्लिश स्कूलच्या मुख्याध्यापिका श्रीमती कुलकर्णी, श्री म. स्था. जैन विद्यालयाचे मुख्याध्यापक वानगोता सर, श्री म. स्था. जैन प्राथमिक विद्यालयाच्या मुख्याध्यापिका श्रीमती पोरवाल, नारायणा ई-टेक्नो स्कूलच्या मुख्याध्यापिका जॉन वेसली, व्यंकट राजू गुडला, यादव बापू, आशिष उपाध्याय, रितेश जयस्वाल आणि पालकवर्ग यांनी अभिनंदन करून राष्ट्रीय स्पर्धेत उत्कृष्ट कामगिरीसाठी शुभेच्छा दिल्या.

जालना जिल्ह्यातील कराटे क्षेत्रासाठी ही मोठी उपलब्धी मानली जात असून, राष्ट्रीय स्तरावर महाराष्ट्राचे प्रतिनिधित्व करणाऱ्या या खेळाडूंकडून सुवर्णपदकांसह उल्लेखनीय यशाची अपेक्षा व्यक्त केली जात आहे. त्यांच्या यशामुळे जिल्ह्यातील इतर विद्यार्थ्यांनाही कराटेकडे प्रेरणा मिळेल, असा विश्वास क्रीडाप्रेमींनी व्यक्त केला आहे.

 

 

संबंधित पोस्ट

राज्यस्तरीय आदिवासी आश्रमशाळा क्रीडा स्पर्धांचे 5 ते 7 जानेवारी दरम्यान आयोजन

vishwatmaklokswamivarta

भारतीय क्रिकेट संघाचा न्युझीलंड क्रिकेट संघावर चित्तथरारक विजय,चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ स्पर्धेच्या उपांत्य फेरीत टीम इंडियाचा दिमाखदार प्रवेश….

क्रीडा व युवक कल्याण मंत्री दत्तात्रय भरणे यांच्या हस्ते कडबनवाडी येथे जिप्सी सफारी उपक्रमाचे उद्घाटन

खेलो इंडिया ट्रायबल गेम्स: 13 जानेवारीला अमरावतीत निवड चाचणी

नमुंमपा जिल्हास्तरीय शालेय टेबल टेनिस स्पर्धेमध्ये 93 संघांचा उत्स्फुर्त उत्साही सहभाग…

vishwatmaklokswamivarta

रक्षामंत्र्यांनी स्टार भालाफेकपटू नीरज चोप्रा यांना प्रादेशिक सैन्यात लेफ्टनंट कर्नलच्या मानद दर्जाचे सन्मान चिन्ह केले प्रदान लेफ्टनंट कर्नल (मानद) नीरज चोप्रा हे चिकाटी, देशभक्ती आणि उत्कृष्टतेसाठी प्रयत्नशील असलेल्या भारतीय भावनेचे प्रतीक: राजनाथ सिंह

vishwatmaklokswamivarta