vishwatmaklokswamivarta
Breaking News
स्थानिक बातम्या

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी..

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अभ्यासिकांच्या विद्यार्थ्यांनी काढली पारंपारिक वेशात आषाढी दिंडी..

ठाणे : प्रतिनिधी

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली शनिवारी येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस येथून दिंडी काढण्यात आली. यावेळी अभ्यासिकेतील विद्यार्थ्यांनी मोठÎा उत्साहात पारंपारिक वेशात दिंडी सोहळा साजरा केला.

जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेचे अध्यक्ष निलेश भगवान सांबरे यांच्या मार्गदर्शनाखाली अनेक वर्षे ठाण्यातील अभ्यासिकांमधून विविध धार्मिक सण मोठÎा उत्साहात साजरे केले जातात. यंदाही येऊर अभ्यासिका आणि ठाणे स्टेशन पोलीस अकॅडमी व ठाणे स्टेशन कम्प्युटर क्लासेस, डम्पिंग अभ्यासिका, लोकमान्य नगर अभ्यासिका, घोलाई नगर अभ्यासिका, दिघा अभ्यासिका, दिवा अभ्यासिका, मापानपाडा अभ्यासिका, भोलानगर अभ्यासिका, मुंब्रा अभ्यासिका येथून दिंडी काढण्यात आली. या प्रसंगी विद्यार्थ्यांनी पारंपरिक वेशभूषेत सहभागी होत टाळ-मृदुंगाच्या गजरात “ज्ञानोबा-तुकाराम “जय हरी विठ्ठल“ आणि “पांडुरंग हरी“ यांच्या जयघोषात संपूर्ण परिसर भक्तिमय केला. या उपक्रमातून विद्यार्थ्यांना वारकरी परंपरा, संतांचे विचार, संस्कार आणि सामाजिक ऐक्याचे महत्त्व समजावून सांगण्यात आले.जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र यांच्या माध्यमातून विद्यार्थ्यांमध्ये संस्कार, शिस्त, सामाजिक बांधिलकी आणि भारतीय संस्कृतीची जपणूक करण्यासाठी सातत्याने विविध उपक्रम राबविण्यात येत आहेत.

 

संबंधित पोस्ट

गुरु स्वतःसाठी न लढता समाजासाठी लढतो; हा आदर्श येणाऱ्या पिढ्यांपर्यंत पोहोचविणार – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

पुणे, खडकी, औरंगाबाद, देवळाली, अहमदनगर, कामटी कटकमंडळांचे महापालिकांमध्ये विलिनीकरण – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस कटकमंडळ क्षेत्रात मिळणार नागरीसुविधांचा लाभ

ब्रॉडगेज प्रकल्पासाठी खाजगी जमीन खरेदी प्रक्रियेला वेग जिल्हाधिका-यांच्या हस्ते शेतकऱ्यांना धनादेश वाटप…

बॉलिवुडच्या रिॲलिटी शोच्या अभिनेत्रीला रेव्ह पार्टी भोवली,इगतपुरीत दोन बंगल्यांवर पोलिसांचा छापा.

जिल्हा युवा पुरस्कार सन 2023-24 व 2024-25 साठी अर्ज सादर करण्याकरिता दि.06 जून 2025 पर्यंत मुदतवाढ  

महाराष्ट्र दिनानिमित्त शहापूर वनविभागातील गुणवंत कर्मचाऱ्यांचा सन्मान..