नवी मुंबई महानगरपालिका पाणी बचतीबाबतचे नियोजन• नागरिकांमध्ये विविध माध्यंमाद्वारे पाणी बचतीवाचत आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबई प्रतिनिधी-• वाहन वॉशिग सेंटर्स करीताचा पाणी पुरवठा तात्काळ बंद येत आहे व त्यानंतरही पिण्याचा पाण्याचा पर आढळल्यास प्रथमतः रु.25 हजार दंड लावण्यात येईल. दुस-यांदा आढळल्यास रु.50 हजार व तिस-यांदा आढळल्यास रु.1 लक्ष दंड फौजदारी कार्यवाही करण्यात येईल.
• गृहनिर्माण संस्थांमधील छतावरील पाण्याच्या टाक्या ओसंडून वाहणार (ओव्हर फ्लो) नाहीत, याकरीता प्रत्येक विभाग क्षेत्रात महानगरपालिकेच्या कर्मचा-यांची देखरेख वाढविण्यात आलेली आहे.
• ज्या-ज्या विकाणी पाण्याचा मोठ्या प्रमाणावर वापर होतो, त्या सर्व व्यावसायिक वाणिज्य आस्थापनांची 20 टक्के पाणी कपात करण्यात येत असून पाण्याचा अपव्यय टाळून बचत करणेकरीता आवाहन करण्यात येत आहे.
नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील सर्व 100 विहिरीमधील गाळ काढणे, दुरुस्ती व स्वच्छाता करण्याची कामे 1 मे 2026 ते 31 मे 2026 दरम्यान करण्यात आलेली आहेत. सदर विहिरींना जाळ्या बसविण्यात आलेल्या आहेत. सदर विहिरींमधील पाण्याचा वापर पिण्याव्यतिरिक्त इतर वापरासाठी करण्याचे नियोजन करण्यात आलेले आहे. सदर विहिरींमधील पाणी वापर करण्यासाठी पंप बसवून पुढील 4 दिवसात पाण्याचा उपसा करुन विहिरी पुनश्यः साफ करण्यात येतील
• नवी मुंबई महानगरपालिकेच्या क्षेत्रामधील 166 कुपनलिकांची दुरुस्ती करण्यात आली असून त्यांचा वापर शौचालयांसाठी तसेच काही झोपडपट्टी भागामध्ये कुपनलिकेवर RO बसवुन पिण्याच्या पाण्यासाठी करण्यात येत आहे.
• नवी मुंबई महानगरपालिकेच्या नेरुळ भाग, कोपरखैरणे, घणसोली व ऐरोली भाग या विभागातील एकूण 449 उद्याने, मोकळया जागा, ट्री बेल्ट, रस्ता दुभाजक, चौक याठिकाणी प्रक्रियाकृत सांडपाण्याचा वापर होतो.• नेरुळ भाग, सानपाडा, तुर्भे, याशी व ऐरोली भाग या विभागातील एकूण 154 उद्याने, मोकळ्या जागा, ट्री बेल्ट, रस्ता दुभाजक, चौक यांना देण्यात आलेल्या पिण्याच्या पाण्याचा पुरवठा बंद करुन त्याठिकाणी टँकरद्वारे प्रक्रियाकृत सांडपाणीचा वापर करण्यात येणार आहेबांधकाम वापरासाठी देण्यात येणान-या नळजोडण्या बंद करुन फक्त प्रक्रीयाकृत पाण्याचा वापर करण्याचे सक्ती करण्यात येईल.• बांधकामासाठी अनधिकृतरित्या करण्यात येणारा पाण्याचा वापर बंद करण्यात येत आहे. • NMMT बस डेपो मध्ये गाड्या धुण्यासाठी पाण्याचा वापर बंद करुन मालप्रक्रिया केंद्रामधील प्रक्रियाकृत पाण्याचा वापर करण्यात येणार आहे.• एरीअेटेड वॉटर व पॅकेज बॉटर बॉटलिंग प्लॅंन्टला दिलेल्या नळजोडण्यातुन पाणी पुरवठा बंद करण्यात येत आहे.• जलतरण तलावास होणारा पाणी पुरवठा तात्परत्या स्वरुपात स्थगित करण्यात येत आहे.
• पिण्याच्या पाण्याचा गैरवापर व अपव्यय आढळून आल्यास संबंधितांवर कठोर कारवाई करण्यात येईल• पाणी पुरवठा वाहिन्यांमध्ये गळती झाल्यास सदर गळती शोधून जलवाहिनीची तात्काळ दुरुस्ती करण्यात येत आहे.• सर्व अनधिकृत नळजोडण्या खंडीत करण्याची कारवाई मिशन मोडवर करण्यात येईल. सद्यस्थितीत देण्यात येणारा दरडोई 220 प्रतिदिन प्रति माणसी (LPCD) पाणी पुरवठा कमी करुन दरडोई 175 प्रतिदिन प्रति माणसी (LPCD) करण्याचे नियोजन करण्यात येईल.
• पावसाचे पाण्याचे संकलन (Rain Water Harvesting) बंधनकारक :- सर्व शासकीय/ निमशासकीय इमारती, सर्व गृहनिर्माण संस्था व व्यावसायिक इमारती यांच्यासाठी पावसाचे पाण्याचे संकलन (Rain Water Harvesting) बंधनकारक करण्यात येत आआहे