vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सर्व शाळा-महाविद्यालयांना २९ जुलै रोजी सुटी,विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकाऱ्यांचे आदेश

गडचिरोली, प्रतिनिधी: भारतीय हवामान विभागाच्या नागपूर प्रादेशिक केंद्राने गडचिरोली जिल्ह्यासाठी दिनांक २९ जुलै २०२६ रोजी रेड अलर्ट तसेच ३० जुलै रोजी ऑरेंज अलर्ट जारी केला असून जिल्ह्यात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे. वैनगंगा, गोदावरी, प्राणहिता, बांडिया, इंद्रावती आदी नद्यांच्या पाणीपातळीत वाढ होण्याची तसेच नाले-नाल्यांना पूर येण्याची शक्यता लक्षात घेऊन विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीने जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष अविश्यांत पंडा यांनी बुधवार, दिनांक २९ जुलै २०२६ रोजी संपूर्ण गडचिरोली जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्थांना सुटी जाहीर केली आहे.या आदेशानुसार जिल्ह्यातील सर्व अंगणवाड्या, शासकीय व खासगी प्राथमिक व माध्यमिक शाळा, जिल्हा परिषद शाळा, नगरपालिका शाळा, अनुदानित व विनाअनुदानित शाळा, आश्रमशाळा, सर्व महाविद्यालये तसेच औद्योगिक प्रशिक्षण संस्था व इतर व्यावसायिक प्रशिक्षण संस्थांनाही ही सुटी लागू राहणार आहे.

जिल्हाधिकाऱ्यांनी नागरिकांना हवामान विभागाच्या सूचनांचे पालन करण्याचे, अनावश्यक प्रवास टाळण्याचे तसेच नदी-नाल्यांच्या परिसरात जाणे टाळण्याचे आवाहन केले आहे. आदेशाचे उल्लंघन करणाऱ्यांविरुद्ध आपत्ती व्यवस्थापन अधिनियम, २००५ तसेच लागू असलेल्या कायद्यांनुसार कारवाई करण्यात येणार असल्याचेही आदेशात नमूद करण्यात आले आहे.

 

#गडचिरोली #शाळासुटी #रेडअलर्ट #मुसळधारपाऊस #आपत्तीव्यवस्थापन #सतर्कराहा

संबंधित पोस्ट

सैनिकी मुलांच्या वसतिगृहात भाडेतत्वावर भोजनकक्ष, उपहारगृहासाठी 25 मार्चपर्यंत अर्ज आमंत्रित

एकलव्य रेसिडेंशियल पब्लिक स्कूल प्रवेश स्पर्धापरीक्षा १ मार्च रोजी

vishwatmaklokswamivarta

विशेष लेख / ५ जून जागतिक पर्यावरण दिन  पर्यावरणाचा जागर घराघरातून वाढवूया ! 

राज्यपालांच्या हस्ते अटल बिहारी वाजपेयी यांच्यावरील ‘अटल संस्मरण’चे प्रकाशन नेतृत्वगुण शिकायचे असतील तर अटलजींचे जीवन अभ्यासावे – राज्यपाल जिष्णु देव वर्मा

जिल्ह्यात यलो अलर्ट; सोसाट्याचा वारा,पावसाची शक्यता दक्षता घेण्याचे प्रशासनाचे आवाहन

vishwatmaklokswamivarta

महापारेषणची सहाय्यक अभियंता (स्थापत्य) परीक्षा शांततेत व सुरळीत राज्यातील १११ केंद्रांवर १५ हजारांहून अधिक उमेदवारांची उपस्थिती