vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

जिजाऊ च्या समाजाभिमुख उपक्रमांमुळे प्रेरित हजारो विद्यार्थी व नागरिकांकडून मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना गुरुपौर्णिमेनिमित्त शुभेच्छा!

झडपोली (विक्रमगड) | प्रतिनिधीगुरुपौर्णिमेच्या पावन पर्वानिमित्त जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्था, महाराष्ट्र राज्यचे संस्थापक मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना हजारो विद्यार्थी, शिक्षक, पालक, कार्यकर्ते आणि नागरिकांनी भेटून गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या. झडपोली येथील जिजाऊ नगरीमध्ये दिवसभर शुभेच्छा देण्यासाठी आलेल्या विद्यार्थी आणि नागरिकांची मोठी गर्दी पाहायला मिळाली.

मोफत शिक्षण, मोफत आरोग्यसेवा, महिला सक्षमीकरण, रोजगारनिर्मिती, शेती विकास आणि सामाजिक परिवर्तन या क्षेत्रांत जिजाऊ संस्थेमार्फत गेल्या अनेक वर्षांपासून सातत्याने राबविण्यात येणाऱ्या लोकहिताच्या उपक्रमांमुळे हजारो विद्यार्थी व कुटुंबांचे जीवन बदलले आहे. या कार्यातून लाभ घेतलेल्या अनेक विद्यार्थ्यांनी आणि नागरिकांनी गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने मा. श्री. निलेश भगवान सांबरे यांना प्रत्यक्ष भेटून कृतज्ञता व्यक्त केली.

यावेळी विद्यार्थ्यांनी “गुरु केवळ शिक्षण देत नाही, तर आयुष्याला दिशा देतो,” अशी भावना व्यक्त करत सांबरे यांच्याप्रती आदर व्यक्त केला. अनेक विद्यार्थ्यांनी त्यांना आपल्या जीवनातील प्रेरणास्थान असल्याचे सांगत आशीर्वाद घेतले.या प्रसंगी विविध क्षेत्रांतील शिक्षक, मार्गदर्शक आणि गुरुजनांचाही सन्मान करण्यात आला. गुरु-शिष्य परंपरेचा गौरव करत ज्ञान, संस्कार आणि सामाजिक बांधिलकीचा संदेश या कार्यक्रमातून देण्यात आला.

गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने हजारो विद्यार्थी आणि कार्यकर्त्यांनी व्यक्त केलेला हा स्नेह, आदर आणि कृतज्ञतेचा भाव जिजाऊ संस्थेच्या समाजाभिमुख कार्याचीच पोचपावती असल्याची भावना उपस्थितांनी व्यक्त केली.

 

संबंधित पोस्ट

शेतकऱ्यांना मोठा दिलासा ; दोन लाखांपर्यत शेती किंवा पीक कर्जावरील मुद्रांक शुल्क पुर्णपणे माफ 

सनातन राष्ट्र शंखनाद’ महोत्सवासाठी २० हजार भाविकांची उपस्थित !**हिंदु राष्ट्राची स्थापना ही समष्टी साधनाच !* – सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले, संस्थापक, सनातन संस्था

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…

जिल्हा महिला, बाल विकास सनियंत्रण समिती बैठकबालकामगार ,बालभिक्षेकरी व शाळाबाह्य मुलांचे सर्वेक्षण करा-जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

3000 हून अधिक नागरिक सहभागातून नवी मुंबई परिसरामध्ये महा स्वच्छता अभियान

स्वच्छता ही सेवा अभियानांतर्गत नवी मुंबईतील धार्मिक स्थळांची विशेष स्वच्छता मोहीम..

vishwatmaklokswamivarta