vishwatmaklokswamivarta
Breaking News
ठळक बातम्याप्रदेश

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…

उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याकडून मंत्रालयातील आपत्कालीन कार्य केंद्रातून राज्यातील पूर परिस्थितीचा आढावा…

        मुंबई प्रतिनिधी : राज्यात सुरू असलेल्या मुसळधार पावसाच्या पार्श्वभूमीवर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मंत्रालयातील राज्य आपत्कालीन कार्य केंद्रास भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी नियंत्रण कक्षातील अधिकाऱ्यांकडून मुंबई शहर व उपनगर, ठाणे, पालघर, रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग तसेच राज्यातील पावसाने प्रभावित झालेल्या इतर भागातील परिस्थितीची सविस्तर माहिती घेतली.

 हवामान विभागाने वर्तविलेल्या अंदाजानुसार येत्या काही दिवसांत पावसाचा जोर कायम राहण्याची शक्यता असल्याने जिल्हा प्रशासन, आपत्ती व्यवस्थापन यंत्रणा तसेच स्थानिक स्वराज्य संस्थांनी सतर्क रहावे. पूरस्थिती किंवा भूस्खलनामुळे धोक्यातील नागरिकांना तातडीने सुरक्षित स्थळी स्थलांतरित करावे, बचाव व मदत कार्यासाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफच्या पथकांना सज्ज ठेवावे, अशा सूचना त्यांनी दिल्या.

पावसामुळे शेतपिके, घरांची हानी किंवा इतर नुकसानाचे तत्काळ पंचनामे करून अहवाल शासनाकडे सादर करावे. तसेच रुग्णालये, शाळा, निवारा केंद्रे, रस्ते, पूल, वीज व पाणीपुरवठा यासारख्या आवश्यक सेवा खंडित होऊ नयेत, यासाठी सर्व विभागांनी समन्वयाने काम करावे, असे निर्देशही उपमुख्यमंत्री श्री.पवार यांनी यावेळी दिले.

0000

संबंधित पोस्ट

महाराजस्व अभियानात सर्व विभागाने पुढाकार घ्यावा- संजय केनेकर.

कोकण रेल्वे प्रशासनाने यंदा पहिल्यांदाच खासगी कारसाठी रेल्वेद्वारे वाहतूक करण्याची सेवा सुरू

विकसित महाराष्ट्र- २०४७’ सर्वेक्षणात सहभागी होण्यासाठीvनागरिकांना प्रोत्साहित करावे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे विधानसभेत निवेदनाद्वारे आवाहन

स्थानिक स्वराज्य निवडणूकीच्या अनुषंगाने जिल्हास्तरीय कायदा व सुव्यवस्था बैठक संपन्न…

vishwatmaklokswamivarta

पुरी’ गावच्या महिला बचत गटांची पंढरीची वाटघोंगटा उत्पादनातून आर्थिक कमाई आणि पुण्य संचितही

देशाची राजधानी दिल्लीत विधानसभा निवडणूकीच्या 70 जागांसाठी  मतदान सुरुवात सकाळी सात वाजल्या पासून सुरू झाले आहे सायंकाळी सहा वाजेपर्यंत मतदान करता येईल

vishwatmaklokswamivarta