vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेशस्थानिक बातम्या

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणीदुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात यशस्वी अंमलबजावणीदुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता- जिल्हाधिकारी संतोष पाटील

सातारा द प्रतिनिधी :- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेची जिल्ह्यात पारदर्शक व गतीने अंमलबजावणी सुरू असून योजनेची दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी प्रसिद्ध होण्याची शक्यता आहे, अशी माहिती जिल्हाधिकारी संतोष पाटील यांनी

जिल्हाधिकारी कार्यालयात पत्रकार परिषदेत आयोजन करण्यात आले होते. या पत्रकार परिषदेला जिल्हा उपनिबंधक संजयकुमार सुद्रिक उपस्थित होते.

जिल्हाधिकारी श्री. पाटील म्हणाले, योजनेअंतर्गत आतापर्यंत जिल्ह्यातील 52 हजार 662 शेतकऱ्यांची माहिती पोर्टलवर अपलोड करण्यात आली आहे. यापैकी पहिल्या यादीत 31 हजार 556 पात्र शेतकऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. उर्वरित पात्र शेतकऱ्यांसाठी दुसरी यादी 15 ऑगस्टपूर्वी जाहीर केली जाण्याची शक्यता आहे. कर्जमुक्ती योजनेत शेतकऱ्यांच्या कर्जाच्या रकमेपेक्षा माफीची रक्कम कमी असणार नाही. या योजनेअंतर्गत नियमानुसार एकरकमी सेटलमेंट करून शेतकऱ्यांना दिलासा दिला जाणार आहे.

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कर्जमुक्ती योजनेबाबत कोणतीही अस्पष्टता राहू नये यासाठी जिल्ह्यातील सर्व बँकांच्या अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांच्या शंकांचे निरसन करण्यात आले आहे. तसेच शेतकऱ्यांच्या मार्गदर्शनासाठी सर्व बँकांमध्ये योजनेचे माहिती फलक लावण्यात आले आहेत. ज्या मयत शेतकऱ्यांच्या नावावर कर्ज होते, त्यांच्या वारसांना योजनेचा लाभ मिळवून देण्यासाठी कर्ज खाती वारसांच्या नावावर वर्ग करण्याचे काम वेगाने सुरू आहे.

बँकांना शेतकऱ्यानं नव्याने कर्ज वितरणासाठी पात्र करण्याच्या बँकांना सूचना दिल्या आहेत. तसेच वारसाना कर्ज मुक्तीचा लाभ होण्यासाठी वारसा प्रमाणपत्र तातडीने देण्याच्या तलाठी यांना निर्देशही देण्यात आले आहेत.

जिल्ह्यात आतापर्यंत ९० टक्के ॲग्रीस्टॅक पूर्ण झाले असून अजूनही सुमारे 4 हजार 812 शेतकऱ्यांचा ॲग्रीस्टॅक झालेला नाही. शासकीय योजनांचा लाभ सुरळीत आणि थेट मिळण्यासाठी जिल्ह्यातील उर्वरित शेतकऱ्यांनी लवकरात लवकर ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण करावी, असे आवाहनही जिल्हाधिकारी श्री. पाटील यांनी केले आहे.

0000

संबंधित पोस्ट

मसकऱ्या गणेशोत्सव नागपूरची वैभवशाली सांस्कृतिक ओळख – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्र्यांनी घेतले मसकऱ्या गणपतीचे दर्शन

पशुपालकांना आवाहन

नेपाळ-तिबेट पूर आपत्ती : महाराष्ट्रातील नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी २४X७ समन्वय,बेपत्ता नागरिकांच्या शोध व ओळखीसाठी केंद्र व राज्य यंत्रणांशी सातत्याने समन्वय…

vishwatmaklokswamivarta

जलशुद्धीकरण सयंत्राच्या देखभाल दुरुस्तीचे धोरण आणणार पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री गुलाबराव पाटील

स्वच्छ संकल्प अभियानास त्र्यंबकेश्वर येथून प्रारंभ

पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जन्मदिनाच्या त्रिशताब्दी वर्षाचे औचित्य साधून, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखाली जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्या संकल्पनेतून ‘गोदा ते नर्मदा – पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा’ आयोजित