vishwatmaklokswamivarta
Breaking News
प्रदेश

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

शेतकऱ्यांनी देशाबाहेर अभ्यास दौऱ्यासाठी अर्ज करण्याचे आवाहन

सातारा द प्रतिनिधी :- राज्यातील शेतकऱ्यांना विविध प्रगत देशातील विकसित आणि आधुनिक तंत्रज्ञानाची माहिती होण्यासाठी तसेच शेतमालाची निर्यात, कृषी मालाचे पणन व बाजारपेठेतील मागणी, कृषीमाल प्रक्रिया याबरोबरच त्या देशांमध्ये उपयोगात येत असलेले अद्यावत तंत्रज्ञान अवगत करून त्याचा वापर राज्यातील शेतकऱ्यांनी त्यांच्या शेतीमध्ये करण्यासाठी सहाय्य करणे, विविध देशांनी विकसित केलेले शेती तंत्रज्ञान व अनुषंगिक बाबी यांची माहिती त्या देशातील शेतकऱ्यांशी प्रत्यक्ष चर्चा करून तसेच क्षेत्रीय भेटी, संबंधित संस्थाना भेटी इत्यादीद्वारे शेतकऱ्यांचे ज्ञान आणि क्षमता उंचावण्याकरिता कृषी विभागाकडून राज्यातील शेतकऱ्यांचे देशाबाहेर अभ्यास दौरे सन २०२६-२७ ही योजना राबविण्यात येत आहे.

शेतक-यांनी देशाबाहेरील अभ्यास दौऱ्यासाठी २४ ऑगस्ट २०२६ पर्यंत संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयात अर्ज दाखल करावेत, असे आवाहन जिल्हा अधीक्षक कृषि अधिकारी भाग्यश्री फरांदे यांनी केले आहे. तरी शेतकरी बांधवांनी अधिक माहितीसाठी संबधित तालुका कृषी अधिकारी कार्यालयाशी संपर्क करावा तसेच महाराष्ट्र शासन कृषी विभागाच्या www.krishi.maharashtra.gov.in संकेतस्थळला भेट द्यावी.

 

0000

संबंधित पोस्ट

दहावी, बारावी शालांत परीक्षा; परीक्षाकेंद्र परिसरात प्रतिबंधात्मक आदेश जारी

vishwatmaklokswamivarta

रेणापूर मध्यम प्रकल्पातून रेणा नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू

जिल्ह्यातील अकरा पंचायत समिती सभापती पदांचे आरक्षण जाहीर* 

करजगीतील अल्पवयीन मुलीवरील अत्याचार व खून प्रकरणात आरोपीला मरेपर्यंत फाशीची शिक्षा- पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांनी आरोपीला लवकरात लवकर शिक्षा देण्याची दिली होती ग्वाही- उमदी पोलिस ठाण्याच्या तपासाला यश..

नांदेड महानगरपालिकेची खडकपुरा-वाघी रोडवर मोठी कारवाई; अडथळा आणणाऱ्यांवर गुन्हे दाखल*

उद्योग प्रतिनिधींची बैठक -सामाजिक उत्तरदायित्व निधीची माहिती सादर करा- जिल्हाधिकारी दिलीप स्वामी

vishwatmaklokswamivarta